वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०५ पृ. १
  • जीवन देणारे शिक्षण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जीवन देणारे शिक्षण
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • आणखी शिक्षण घेण्याबाबतीत योग्य निर्णय कसा घेता येईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२६
  • शिक्षण—यहोवाची स्तुती करण्यासाठी त्याचा वापर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • शिक्षणासंबंधी बायबल नापसंती दर्शवते का?
    सावध राहा!—१९९८
  • देवाकडून मिळणारे शिक्षण सर्वश्रेष्ठ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km १२/०५ पृ. १

जीवन देणारे शिक्षण

१ देवाच्या वचनातून सत्य समजल्यावर लोकांच्या चेहऱ्‍यावर जो आनंद झळकतो तो पाहणे किती समाधानदायक आहे! इतरांना देवाबद्दल व मानवजातीकरता त्याच्या उद्देशाबद्दल ज्ञान देणे खरोखरच तृप्तीदायक आहे. कारण हे ज्ञान एखाद्या व्यक्‍तीला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवते.—योहा. १७:३.

२ हे ज्ञान श्रेष्ठ का?: आजच्या जगात असंख्य मार्गांनी आणि प्रत्येक विषयावर शिक्षण उपलब्ध आहे. (उप. १२:१२) पण ‘देवाच्या महत्कृत्यांशी’ या ज्ञानाची तुलना होऊ शकत नाही. (प्रे. कृत्ये २:११) जगात दिले जाणारे ज्ञान मनुष्याला त्याच्या सृष्टीकर्त्याच्या जवळ आणू शकले आहे का व सृष्टीकर्त्याचे उद्देश जाणून घेण्यास ते त्याला मदत करू शकले आहे का? मृत्यू झाल्यावर काय घडते आणि आज जगात इतके दुःख का आहे हे समजून घेण्यास या ज्ञानामुळे लोकांना साहाय्य मिळाले आहे का? त्यांना भविष्याविषयी आशा मिळाली आहे का? कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यास यामुळे हातभार लागला आहे का? नाही. जीवनाशी संबंधित असलेल्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्‍नांची खरी उत्तरे आपल्याला केवळ देवाकडील ज्ञानातून मिळू शकतात.

३ आजच्या या जगात ज्या गोष्टीची खूपच उणीव आहे ती म्हणजे नैतिकता; पण देवाकडील ज्ञानामुळे नैतिक विकास करण्यास मदत मिळते. देवाच्या वचनाचा जे लोक स्वीकार करतात आणि त्यातील शिकवणींचे पालन करतात त्यांना याच्या साहाय्याने आपल्या मनातून जातीभेद व राष्ट्रभेद समूळ काढून टाकणे शक्य होते. (इब्री ४:१२) देवाच्या वचनाने कित्येक लोकांना सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा धिक्कार करून, ‘नवा मनुष्य धारण करण्यास’ मदत केली आहे. (कलस्सै. ३:९-११; मीखा ४:१-३) शिवाय, देवाकडील ज्ञानाने लाखो लोकांना, देवाला न आवडणाऱ्‍या अशा अनेक प्रथा व सवयी सोडून देण्यास मदत केली आहे की ज्या त्यांच्या जीवनाशी अविभाज्यपणे जुळल्या होत्या.—१ करिंथ. ६:९-११.

४ आज हे निकडीचे का?: आपला महान शिक्षक आपल्याला सध्याचा हा काळ किती अर्थसूचक आहे याविषयी ज्ञान देऊन सावध करतो. त्याच्या भविष्यसूचक न्यायसंदेशांत आजच्या काळाला लागू होणारी माहिती आहे व ही माहिती सबंध पृथ्वीभर घोषित करणे अगत्याचे आहे. (प्रकटी. १४:६, ७) ख्रिस्त स्वर्गात राज्य करत आहे, खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा लवकरच नाश होणार आहे आणि देवाचे राज्य पृथ्वीवरील सर्व राज्यांचा नाश करण्यास सुसज्ज आहे. (दानी. २:४४; प्रकटी. ११:१५; १७:१६) तेव्हा, देवाने नियुक्‍त केलेल्या व सध्या राज्य करत असलेल्या राजाला लोकांनी ओळखावे, मोठ्या बाबेलमधून बाहेर पडावे आणि विश्‍वासाने यहोवाच्या नावाचा धावा करणे गरजेचे आहे. (स्तो. २:११, १२; रोम. १०:१३; प्रकटी. १८:४) लोकांना जीवनाचा मार्ग दाखवणारे ज्ञान इतरांना देण्यात आपण पुरेपूर सहभाग घेऊ या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा