मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज नोव्हें. १
“नम्रता म्हणजे काय? [उत्तरासाठी थांबा आणि मग नीतिसूत्रे २२:४ वाचा. त्यानंतर, पृष्ठ १८ उघडा.] या लेखात, खरी नम्रता म्हणजे काय हे समजावले आहे शिवाय हा गुण आपण कसा विकसित करू शकतो तेही सांगितले आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“तुम्हाला काय वाटतं, आपण कोणाशी मैत्री करतो यामुळे खरोखरच काही फरक पडतो का? [१ करिंथकर १५:३३ वाचा आणि मग पृष्ठ ११ वरील लेख दाखवा.] या लेखात अनेक व्यावहारिक सूचना दिल्या आहेत ज्यांमुळे आपण, चुकीच्या मित्रांबरोबर मैत्री करण्यापासून दूर राहू शकतो.”
टेहळणी बुरूज डिसें. १
“आपण देवाबरोबर कसं चालू शकतो? [उत्तर ऐका आणि होशेय १४:९ वाचा.] देवाबरोबर चालण्याचा काय अर्थ होतो आणि आपण देवाबरोबर कसं चालू शकतो, हे या अंकात सांगितलं आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“पुष्कळ लोकांना सर्व सुख-सोयी असलेलं घर परवडत नाही. तुम्हाला काय वाटतं, असा कधी काळ येईल का जेव्हा सर्वांना राहायला घरं असतील? [उत्तरासाठी थांबा.] सावध राहा! मासिकात, घरांच्या समस्येबद्दलचा अद्ययावत अहवाल दिला आहे. पण त्यात हेही सांगितले आहे, की देवाने दिलेले हे अभिवचन पूर्ण होईल असा भरवसा आपण का बाळगू शकतो.” वाचा यशया ६५:२१, २२.