वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०५ पृ. ४
  • आपल्या सेवेतून काय निष्पन्‍न होते?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या सेवेतून काय निष्पन्‍न होते?
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • राज्याचा प्रचार करीत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • उत्साहाने सुवार्तेचा प्रचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ११/०५ पृ. ४

आपल्या सेवेतून काय निष्पन्‍न होते?

१. यहोवा आपल्या सेवेकडे कोणत्या दृष्टीने पाहतो आणि मानव याला कशाप्रकारे प्रतिसाद देतात?

१. देवाच्या वचनात ख्रिश्‍चनांचे वर्णन, एका विजयी मिरवणूकीप्रमाणे यहोवाच्या सेवेत विजयोन्मादाने चाललेल्या समूहाप्रमाणे करण्यात आले आहे. (२ करिंथ. २:१४-१६) आपण लोकांना देवाचे ज्ञान प्रकट करतो; आपली बलिदानरूपी सेवा यहोवापुढे धूप जाळण्याप्रमाणे आहे ज्यामुळे तो संतुष्ट होतो. काही जण सुवार्तेच्या माधुर्याकडे आकर्षित होतात; काहीजण ती नाकारतात. पण बहुसंख्य लोकांच्या या प्रतिकूल प्रतिसादाचा असा अर्थ होत नाही, की आपले कार्य व्यर्थ जात आहे. आपल्या सेवेतून काय निष्पन्‍न होते, त्याचा जरा विचार करा.

२. आपली सेवा आपल्याला काय प्रदर्शित करण्यास शक्य करते?

२. यहोवाचा महिमा होतो: सैतानाचे असे म्हणणे आहे, की मानव यहोवाची सेवा स्वार्थी कारणांसाठी करतात. (ईयो. १:९-११) ख्रिस्ती सेवा आपल्याला, देवाची आपण करत असलेली भक्‍ती खऱ्‍या मनाने करत आहोत हे प्रदर्शित करण्याची संधी देते. पुष्कळ प्रचारक, त्रास होत असूनही किंवा लोक उदासीन मनोवृत्ती दाखवत आहेत तरीसुद्धा प्रचार व शिष्य बनवण्याच्या आज्ञेचे पालन करत आहेत. अशाप्रकारची एकनिष्ठता पाहून यहोवाचे मन आनंदित होते.—नीति. २७:११.

३. आपण देवाचे नाव आणि त्याचा उद्देश घोषित करत राहणे महत्त्वाचे का आहे?

३. तसेच, देवाचा उद्देश पूर्ण होण्यातही आपल्या सेवेची भूमिका आहे. सैतानाच्या जगाच्या येऊ घातलेल्या नाशाच्या बाबतीत, यहोवा म्हणतो: “राष्ट्रे जाणतील की मी यहोवा . . . आहे.” (यहे. ३९:७, पं.र.भा.) राष्ट्रांना हे कळावे म्हणून, देवाच्या सेवकांनी “प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यास” त्याचे नाव आणि त्याचा उद्देश घोषित करत राहणे अगत्याचे आहे.—प्रकटी. १४:६, ७.

४. प्रचार कार्य न्यायासाठी एक आधार कसे बनते?

४. न्यायासाठी आधार मिळतो: सुवार्तेचा प्रचार हा न्यायासाठी एक आधार देखील आहे. “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा” येशू ख्रिस्त सूड उगवेल, असे प्रेषित पौलाने म्हटले. (२ थेस्सलनी. १:८, ९) सुवार्तेला लोक ज्याप्रकारे प्रतिसाद देतील त्यानुसार त्यांचा न्याय केला जाईल. तेव्हा, देवाच्या सेवकांवर किती मोठी जबाबदारी आहे! आपल्यावर रक्‍तदोष येऊ नये म्हणून आपण जीवन वाचवणारा राज्य संदेश सांगण्यापासून मागे हटू नये.—प्रे. कृत्ये २०:२६, २७.

५. देवाची दया आपल्या सेवेतून कशी प्रतिबिंबित होते?

५. देवाची स्वीकृती प्राप्त करण्यास आपल्या शेजाऱ्‍यांना मदत करण्याचे आपले अविरत प्रयत्न, यहोवाच्या दयेची अभिव्यक्‍ती आहेत. (१ तीम. २:३, ४) लोकांचे जीवन सतत बदलत असते हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण त्यांच्याकडे नेहमी नेहमी जाऊन, वेळ आहे तोपर्यंत यहोवाला शोधायची विनवणी करतो. असे करण्याद्वारे आपण, ‘देवाची परम दया’ प्रतिबिंबित करतो. “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.”—लूक १:७८; २ पेत्र ३:९.

६. यहोवाच्या सेवेत मग्न राहिल्याने कोणते फायदे मिळतात?

६. स्वतःचाही लाभ होतो: यहोवाच्या सेवेत मग्न राहिल्याने आपले देखील संरक्षण होते. आपण “देवाचा दिवस येण्याची वाट पाहत” राहतो व सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणामुळे भ्रष्ट होण्यापासून दूर राहतो. (२ पेत्र ३:११-१४; तीत २:११, १२) तेव्हा आपण ‘स्थिर व अढळ होऊ या आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असू या.’ कारण आपल्याला माहीत आहे, की ख्रिस्ती सेवेत आपण करत असलेले प्रयत्न व्यर्थ नाहीत.—१ करिंथ. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा