मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“कोणती गोष्ट लोकांना भेदभावांपासून स्वतःला मुक्त करण्यास मदत करू शकेल असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी थांबा. मग मत्तय ७:१२ वाचा.] या मासिकात भेदभावाच्या पाळ्यामुळ्यांबद्दल आणि आपण याचा विरोध कसा करू शकतो तेही सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज नोव्हें.१५
“पुष्कळ लोक, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्याची मनसा करतात. हे शक्य असते तर तुम्हाला चिरकाल जगायला आवडले असते का? [उत्तर ऐका. मग योहान १७:३ वाचा.] या मासिकात, सार्वकालिक जीवनाविषयी बायबलमध्ये असलेल्या अभिवचनाची माहिती आहे. हे अभिवचन सत्य ठरेल तेव्हा जीवन कसे असेल, याबद्दलही या मासिकात सांगितले आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“भेदभावांमुळे मोठ्या प्रमाणात कत्तली झाल्याचे वृत्त तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला निश्चित्तच धक्का बसतो. भेदभावांमुळे नेहमीच हत्या होत नसली तरी, त्यामुळे लोकांमध्ये फूटी पडतात आणि लोकांच्या मनात राग उत्पन्न होतो, याजशी तुम्ही सहमत असाल. (उत्तर ऐका.) सावध राहाच्या! या अंकातील लेखात, भेदभावाच्या गुणलक्षणांचे उच्चाटन करण्यासाठी काय करता येऊ शकते ते सांगितले आहे.”—मत्तय ७:१२ वाचा.
टेहळणी बुरूज डिसें.१
“मानवांना प्राण्यांपासून वेगळे करणारा एक स्वभावगुण म्हणजे योग्य आणि अयोग्य यांतील फरक सांगण्याची क्षमता. परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे, की आज पुष्कळ लोक वाईट कामे करतात. याचे काय कारण असावे, असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐका. मग यिर्मया १७:९ किंवा प्रकटीकरण १२:९ वाचा.] जे योग्य आहे ते ओळखण्यास व त्याप्रमाणे करण्यास आपल्याला काय मदत करू शकेल, हे या मासिकात सांगितले आहे.”