मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज सप्टें. १
मत्तय २२:३७-३९ वाचा व मग असे म्हणा: “या दोन आज्ञांचे सर्वांनी पालन केले तर या जगात सर्वजण सुखासमाधानाने नांदू शकतील असे तुम्हाला वाटत नाही का? [उत्तर ऐकून घ्या, मग पृष्ठ १८ वरील लेखाकडे लक्ष वेधा.] या तत्त्वांनुसार वागण्याचा काय अर्थ होतो हे या लेखात स्पष्ट केले आहे.”
सावध राहा! जुलै-सप्टें.
“महत्त्वाकांक्षा बाळगणे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] बऱ्याच लोकांना यात काही गैर नाही असे वाटते पण बायबलमध्ये महत्त्वाकांक्षा बाळगण्यास प्रोत्साहन दिलेले नाही. उलट त्यात नम्र असण्याचे प्रोत्साहन दिले आहे. [याकोब ४:६ वाचा व पृष्ठ १६ वरील लेख दाखवा.] महत्त्वाकांक्षी वृत्तीबद्दल बायबलचा कसा दृष्टिकोन आहे आणि आपण याबद्दल कसा दृष्टिकोन बाळगावा याविषयी या लेखात चर्चा केली आहे.”
टेहळणी बुरूज ऑक्टो. १
मुखपृष्ठावरील प्रश्न वाचा. मग घरमालकाला विचारा: “येथे कोणत्या चिन्हाबद्दल सांगितले आहे तुम्हाला माहीत आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग मत्तय २४:३ वाचा.] टेहळणी बुरूजच्या या अंकात या विशिष्ट चिन्हातील पाच घटकांची चर्चा केली आहे आणि आपण हे चिन्ह का ओळखावे याविषयी यात खुलासा केला आहे.” पृष्ठ ६ वरील चौकोन दाखवा.
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“चांगल्या घरात राहण्याची आजकाल बऱ्याच लोकांची ऐपत नाही. सर्वांना चांगल्या घरात राहायला मिळेल असा काळ कधी येईल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] सावध राहा! च्या या अंकात निवास समस्येविषयी अद्ययावत वृत्त सादर केले आहे. देवाने दिलेले हे अभिवचन अवश्य पूर्ण होईल असे आपण खात्रीने का म्हणू शकतो हे या लेखांत सांगितले आहे.” यशया ६५:२१, २२ वाचा.