वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०५ पृ. १
  • देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ‘देवाचे वचन धैर्याने बोला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • धैर्याने सुवार्ता घोषित करा
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km १०/०५ पृ. १

देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा

१. सर्वच लोक आपल्या प्रचारसंदेशाकडे लक्ष देतील असे नाही, हे ख्रिस्ती सेवक या नात्याने आपल्याला ठाऊक आहे. (मत्त. १०:१४) परंतु, काही लोकांच्या नकारात्मक प्रतिसादामुळे आपण सुवार्ता सांगण्याचे थांबवत नाही. (नीति. २९:२५) कोणती गोष्ट आपल्याला देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहण्यास मदत करते?

२ प्रेषित पौलाला ‘ख्रिस्त येशूविषयीच्या ज्ञानाची श्रेष्ठता’ समजली होती. त्यामुळेच तो “पूर्ण निर्धाराने” बोलत राहिला. (फिलिप्पै. ३:८; १ थेस्सलनी. १:५) तो प्रचार करीत असलेल्या संदेशात काही दम नव्हता, तो संदेश निरर्थक होता असे काहींना वाटत होते तरीपण “विश्‍वास ठेवणाऱ्‍या प्रत्येकाला . . . तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे,” हे पौलाला माहीत होते. (रोम. १:१६) म्हणूनच, विरोध होत असूनही तो ‘प्रभूविषयी निर्भीडपणे बोलत’ राहिला.—प्रे. कृत्ये १४:१-७; २०:१८-२१, २४.

३ आपल्याला शक्‍ती कोठून मिळते?: पौल स्वतःच्या बळावर निर्भीडपणे साक्ष देऊ शकला नाही. स्वतःविषयी व सीलाविषयी बोलताना पौलाने लिहिले: “पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, . . . मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.” (१ थेस्सलनी. २:२; प्रे. कृत्ये १६:१२, ३७) यानंतर रोममध्ये बंदिवासात असताना, पौलाने इतरांना अशी विनंती केली की त्यांनी, सुवार्ता धैर्याने अर्थात ‘उघडपणे बोलत’ राहण्याकरता देवाकडून शक्‍ती मिळावी म्हणून आपल्यासाठी प्रार्थना करावी. (इफिस. ६:१८-२०) स्वतःवर भरवसा ठेवण्याऐवजी देवावर भरवसा ठेवल्यामुळे पौल देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहू शकला.—२ करिंथ. ४:७; फिलिप्पै. ४:१३.

४ आजही असेच आहे. एका बांधवाला कामाच्या ठिकाणी, आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे सांगण्यास व आपल्या सहकर्मचाऱ्‍यांना अनौपचारिक साक्ष देण्यास जड वाटत होते तेव्हा त्याने याविषयी प्रार्थना केली आणि साक्ष द्यायला सुरुवात केली. बांधवाबरोबर काम करणाऱ्‍या एकाने सुरुवातीला अनास्था दाखवली, पण पुनरुत्थानाच्या आशेविषयी सांगताच तो बायबल अभ्यासाला तयार झाला. तेव्हापासून बांधवाने साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला. तो दुसऱ्‍या एका ठिकाणी कामाला लागला तेव्हा तेथे त्याने १४ वर्षांच्या कालावधीत ३४ सहकर्मचाऱ्‍यांना बाप्तिस्मा घेण्यास मदत केली. यहोवा आपल्याला देखील ‘पूर्ण धैर्याने त्याचे वचन’ सांगत राहण्याची शक्‍ती देईल, असा भरवसा आपण बाळगू शकतो.—प्रे. कृत्ये ४:३०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा