“मनापासून” आज्ञाधारक बनण्यास इतरांना मदत करा
१. यहोवा आपल्या उपासकांकडून कशाची अपेक्षा करतो?
१. यहोवाने आपली उपासना स्वीकारण्यासाठी आज्ञाधारक असणे ही एक मुख्य अट आहे. (अनु. १२:२८; १ पेत्र १:१४-१६) लवकरच “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” अर्थात जे आज्ञाधारक नाहीत, त्यांच्यावर देवाचा न्यायदंड येईल. (२ थेस्सलनी. १:८) तेव्हा, देवाच्या वचनातील शिकवणुकींचे ‘मनापासून पालन करण्यासाठी’ आपण इतरांना कशी मदत करू शकतो?—रोम. ६:१७.
२. इतरांना दृढ विश्वास उत्पन्न करण्यास मदत करणे महत्त्वाचे का आहे?
२. विश्वास व प्रीती उत्पन्न करण्यास मदत करण्याद्वारे: शास्त्रवचनांत, आज्ञापालनाचा संबंध विश्वासाशी लावण्यात आला आहे. प्रेषित पौलाने, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेविषयी’ सांगितले. (रोम. १६:२५-२७) इब्री अध्याय ११ यात विश्वासाच्या अनेक उदाहरणांचा उल्लेख केला आहे व यातील अनेकांनी यहोवाच्या प्रकट इच्छेच्या अनुषंगाने कार्य केले. (इब्री ११:७, ८, १७) दुसरीकडे पाहता, आज्ञाभंग याचा संबंध कमकुवत विश्वासाशी लावला आहे. (योहा. ३:३६; इब्री ३:१८, १९) ज्यामुळे एका व्यक्तीला आज्ञाधारक राहण्याची प्रेरणा मिळेल अशाप्रकारचा विश्वास उत्पन्न करण्यास तिला मदत करण्यासाठी आपण देवाच्या वचनाचा योग्य वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे.—२ तीम. २:१५; याको. २:१४-१७.
३. (क) आज्ञापालनाचा प्रेमाशी काय संबंध आहे? (ख) आपण बायबल विद्यार्थ्यांना यहोवाबद्दल प्रेम उत्पन्न करण्यास कशी मदत करू शकतो?
३. देवाबद्दलचे प्रेमही आज्ञापालनाशी संबंधित आहे. (अनु. ५:१०; ११:१, २२; ३०:१६) १ योहान ५:३ यात म्हटले आहे: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” आपण बायबल विद्यार्थ्यांना यहोवावर प्रेम उत्पन्न करण्यास कशी मदत करू शकतो? अभ्यासादरम्यान यहोवाच्या गुणांबद्दल कृतज्ञता वाढवण्याची संधी शोधा. देवाबद्दलच्या तुमच्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करा. विद्यार्थ्याला यहोवासोबत वैयक्तिक नातेसंबंध जोडण्याचे प्रोत्साहन द्या. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा, यहोवाबद्दलचे प्रेमच इतरांना व आपल्यालाही मनापासून त्याच्या आज्ञा पाळण्यास प्रवृत्त करेल.—मत्त. २२:३७.
४. (क) आपला आदर्श महत्त्वाचा का आहे? (ख) “समजणारे हृदय” उत्पन्न करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
४. आपल्या आदर्शाने: इतरांना प्रोत्साहन देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे आपला स्वतःचा आदर्श. पण “समजणारे हृदय” अर्थात आज्ञाधारक हृदय विकसित करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करण्याची गरज आहे. (१ राजे ३:९, पं.र.भा.; नीति. ४:२३) यात कशाचा समावेश आहे? नियमित बायबल अभ्यास करण्याद्वारे व सभांना उपस्थित राहण्याद्वारे आपल्या हृदयाचे पोषण करा. (स्तो. १:१, २; इब्री १०:२४, २५) जे एकाग्र चित्ताने खरी उपासना करत आहेत अशा लोकांची संगत धरा. (नीति. १३:२०) क्षेत्र सेवाकार्यात नियमितरित्या सहभागी व्हा व आपल्या क्षेत्रातील लोकांना मदत करण्याची प्रांजळ इच्छा बाळगा. एक चांगले हृदय उत्पन्न करण्यासाठी यहोवाच्या मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी विनंती करा. (स्तो. ८६:११) ज्या गोष्टी तुमच्या हृदयाला भ्रष्ट करू शकतात, उदाहरणार्थ अनैतिक किंवा हिंसक करमणुकीचे प्रकार, अशा गोष्टी आवर्जून टाळा. ज्या गोष्टी तुम्हाला देवाच्या जवळ आणू शकतात व त्याच्यासोबतचा तुमचा नातेसंबंध ज्यांमुळे बळकट होईल अशा गोष्टींबद्दल आस्था बाळगा.—याको. ४:७, ८.
५. आज्ञा पाळणाऱ्यांना कशाप्रकारे आशीर्वाद मिळत आहेत?
५. यहोवाने प्राचीन काळात आपल्या लोकांना आश्वासन दिले होते, की जर ते त्याचे ऐकतील तर त्यांना अनेक आशीर्वाद लाभतील. (अनु. २८:१, २) त्याचप्रकारे, आज ‘देवाच्या आज्ञा पाळणाऱ्यांना’ तो विपुल आशीर्वाद देत आहे. (प्रे. कृत्ये ५:३२) तेव्हा, आपण ज्या पद्धतीने शिकवतो त्याद्वारे व आपल्या स्वतःच्या आदर्शाने इतरांना मनापासून आज्ञाधारक बनण्यास मदत करू या.