विभागीय संमेलन उजळणी
या साहित्याची चर्चा, तुमची मंडळी २००६ सेवा वर्षाच्या विभागीय संमेलनाला उपस्थित राहायच्या काही काळ आधी आणि नंतर केली जाईल. आमची राज्य सेवा याच्या डिसेंबर २००४ अंकाच्या पृष्ठ ४ वर सांगितल्याप्रमाणे अध्यक्षीय पर्यवेक्षक या पूर्वझलकीची आणि उजळणीची व्यवस्था करतील. उजळणीच्या वेळी सर्व प्रश्न विचारण्यात यावेत व सादर केलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो यावर लक्ष केंद्रित करावे.
पहिला दिवस
१. आपण नवीन मनुष्यत्व कसे धारण करतो, व हे नवीन मनुष्यत्व धारण केल्यावर आपण ते टिकवून का ठेवले पाहिजे?
२. काहींनी प्रचार कार्यात अधिक वेळ खर्च करण्यास कशी सुरुवात केली?
३. आपण स्वतःची तुलना इतरांबरोबर का करू नये?
४. कौटुंबिक वर्तुळात, घरातील सर्व सदस्ये नवीन मनुष्यत्व धारण केल्याचे कसे दाखवू शकतात?
५. मंडळीत आपण एकनिष्ठपणे सहकार्य कसे देऊ शकतो?
६. क्षेत्र सेवेत आपण नवीन मनुष्यत्व धारण केले आहे हे दाखवण्याची गरज का आहे?
७. योग्य प्रकारचे मनन यांत काय गोवलेले आहे, आणि या मननाद्वारे आपल्याला फायदा कसा होतो?
८. कोणत्या गुणांमुळे आपण यहोवाच्या हातात मऊ मातीप्रमाणे होतो?
दुसरा दिवस
९. आपल्या जीभेचा उचित वापर करणे किती महत्त्वपूर्ण आहे?
१०. सहकर्मींबरोबर, शाळासोबत्यांबरोबर व इतरांबरोबर शुद्ध भाषा वापरल्याने आपल्याला कोणता फायदा होतो?
११. सहविश्वासूंबरोबरच्या आपल्या व्यवहारात आपण इफिसकर ४:२५-३२ मध्ये पौलाने दिलेला सल्ला कशाप्रकारे लागू करू शकतो?
१२. आपल्या जीभेचा सर्वात आदरणीय उपयोग कोणता आहे?
१३. दुष्टावर विजय मिळवण्याकरता आपण काय केले पाहिजे?
१४. कोणकोणत्या क्षेत्रांत आपण जगापासून निष्कलंक राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे?
१५. आपण आपल्या आतील मनुष्याचे सतत नविनीकरण का केले पाहिजे, व हे आपण कसे करू शकतो?
१६. या वर्षाच्या विभागीय संमेलनात मिळालेला कोणता सल्ला तुम्ही लागू करायचे ठरवले आहे?