तुम्ही हस्तपत्रिकांचा उपयोग करता का?
एके दिवशी एका ११ वर्षीय मुलाला, नरक या विषयावर असलेल्या एका जाहीर भाषणाची जाहिरात करणारी एक हस्तपत्रिका सापडली. या मुलाने नंतर सांगितले: “या विषयाने माझं लक्ष लगेच खेचलं. मी नेहमी चुकीच्या गोष्टी करायचो. त्यामुळे मी मेल्यानंतर नरकात तर जाणार नाही, अशी मला खूप भीती वाटायची.” तो त्या जाहीर भाषणाला हजर राहिला व बायबल अभ्यासाच्या अनेक सत्रांनंतर एक वर्षाने त्याचा बाप्तिस्मा झाला. अशाप्रकारे कार्ल क्लाईन यांच्या ख्रिस्ती सेवेला वाहिलेल्या जीवनाची सुरुवात झाली. कालांतराने, कार्ल क्लाईन अनेक वर्षांसाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे एक सदस्य होते. हे सर्व एका लहानशा हस्तपत्रिकेमुळे झाले.
आजही हस्तपत्रिका प्रभावशाली साक्ष देणारी साधने आहेत. पुष्कळ प्रचारकांना, स्वतःची ओळख करून देण्यासाठी व संभाषण सुरू करण्यासाठी हस्तपत्रिका फार उपयोगी पडते. पालक आपल्या मुलांसोबत कार्य करत असताना घरोघरी हस्तपत्रिका द्यायला लावून त्यांना सेवेमध्ये भाग घेण्याचे उत्तेजन देऊ शकतात. पत्राद्वारे साक्ष देणारे प्रचारक सभांविषयीची माहिती देण्याकरता हस्तपत्रिका पाठवू शकतात. शिवाय, बायबल विद्यार्थ्यांना व इतर आस्थेवाईक लोकांना आपल्या सभांना येण्याचे आमंत्रण देण्याकरता आपण हस्तपत्रिकांचा सहज उपयोग करू शकतो.
तुमच्या सेवेत तुम्ही हस्तपत्रिकांचा उपयोग करीत आहात का?