वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०४ पृ. ५
  • विभागीय संमेलन उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विभागीय संमेलन उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • खास संमेलन दिवस उजळणी
    आमची राज्य सेवा—२००४
  • संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी नवीन व्यवस्था
    आमची राज्य सेवा—२००४
  • नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००४
  • विभागीय संमेलन उजळणी
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km १२/०४ पृ. ५

विभागीय संमेलन उजळणी

साल २००५ च्या सेवा वर्षाच्या विभागीय संमेलन कार्यक्रमाची एक झलक मिळण्यासाठी व उजळणीसाठी या माहितीचा उपयोग केला जाईल. या पुरवणीच्या पृष्ठ ४ वरील “संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी नवीन व्यवस्था” या लेखात, ही उजळणी कशी घ्यायची ते सांगितले आहे. उजळणीच्या वेळी, सर्व प्रश्‍ने विचारता येतील अशाप्रकारे वेळेची विभागणी करा. सादर केलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो यावर उजळणी केंद्रित असली पाहिजे.

पहिल्या दिवसाचा सकाळचा [किंवा दुपारचा] कार्यक्रम

१. कोणती गोष्ट आपल्याला देवाकडून मिळणारी बुद्धी प्राप्त करण्यास मदत करेल?

२. विभागातील बंधूभगिनींनी, अधिकाधिक लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले आहेत?

पहिल्या दिवसाचा दुपारचा [किंवा संध्याकाळचा] कार्यक्रम

३. ख्रिश्‍चनांनी अगदी मनापासून शुद्ध राहणे महत्त्वाचे का आहे? यासाठी आपल्याला काय करावे लागेल?

४. आपण आपल्या बांधवांबरोबर शांतीने नांदत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?

५. समजूतदारपणा म्हणजे काय, आणि आपण ज्याप्रकारे आपल्या वेळेचा उपयोग करतो त्यातून आपण तो कसा दाखवू शकतो?

६. शौल आणि नोहाच्या उदाहरणांतून आपण काय शिकू शकतो? आपण ‘समजूत होण्याजोगे’ अर्थात आज्ञा मानण्यास तयार आहोत हे कोणकोणत्या मार्गांनी दाखवू शकतो? (याको. ३:१७)

७. दुहेरी जीवन जगण्यापासून ख्रिस्ती सावध कसे राहू शकतात?

८. देवाच्या बुद्धीच्या गोष्टी इतरांना सांगण्यात आपण पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?

दुसऱ्‍या दिवसाचा सकाळचा कार्यक्रम

९. आपण जी कार्ये करण्यास निवडतो त्यात खबरदारी का बाळगली पाहिजे व कोणती गोष्ट आपल्याला असे करण्यास मदत करेल?

१०. विभागातील बंधूभगिनी नियमितरीत्या सभांना उपस्थित राहण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करीत आहेत आणि यामुळे त्यांना कोणता फायदा झाला आहे?

११. कुटुंब प्रमुख आपल्या घराण्याची उभारणी कशी करू शकतात?

१२. विभागाच्या कोणत्या गरजा आपल्या ध्यानात आणून देण्यात आल्या?

दुसऱ्‍या दिवसाचा दुपारचा कार्यक्रम

१३. जाहीर भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे, वरून येणाऱ्‍या ज्ञानामुळे कोणती सत्कर्मे उत्पन्‍न झाली आहेत?

१४. स्वतःवर किंवा जे देवाच्या बुद्धीनुसार चालत नाहीत अशांवर भरवसा ठेवणे मूर्खपणा का आहे? कोणकोणत्या बाबतीत आपण सावध राहिले पाहिजे?

१५. देवाकडून येणारी बुद्धी आपल्याला कोणकोणत्या खाचखळग्यांतून वाचवते?

१६. विभागीय संमेलन कार्यक्रमात दिलेला सल्ला लागू करणे महत्त्वाचे का आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा