वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०५ पृ. ३
  • प्रचार करण्याची हीच वेळ आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रचार करण्याची हीच वेळ आहे!
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “तू एक चांगला पायनियर बनशील!”
    आमची राज्य सेवा—२०१०
  • ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ तुम्ही प्रवेश करणार का?
    आमची राज्य सेवा—२००७
  • पायनियरींग—आता जमण्यासारखे आहे का?
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ८/०५ पृ. ३

प्रचार करण्याची हीच वेळ आहे!

१. प्रचार करण्याची हीच वेळ का आहे?

१ “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.” देवदूतांच्या मार्गदर्शनाखाली आज हा संदेश “प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस” सांगितला जात आहे. का सांगितला जात आहे? “कारण न्यायनिवाडा करावयाची [देवाची] घटिका आली आहे.” आज आपण ‘न्यायनिवाडा करावयाच्या घटिकेत’ जगत आहोत. सद्य व्यवस्थीकरणाचा नाश होईल तेव्हा ही घटिका समाप्त होईल. त्यामुळे लोकांनी, “ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले, त्याला नमन” करणे अगत्याचे आहे. आणखी कोणतेही काम आज, ‘सार्वकालिक सुवार्तेचा’ प्रचार करण्याच्या किंवा घोषणा करण्याच्या कामाइतके महत्त्वपूर्ण किंवा तातडीचे असू शकत नाही. होय, प्रचार करण्याची हीच वेळ आहे!—प्रकटी. १४:६, ७.

२. यहोवाच्या सेवकांना काळाचे भान आहे, हे ते कसे दाखवत आहेत?

२ गेल्या दहा वर्षांत यहोवाच्या सेवकांनी जवळजवळ १२० कोटी तास राज्य प्रचार व शिष्य बनवण्याच्या कामात खर्च केले आहेत. आध्यात्मिक कापणीत जास्तीतजास्त सहभाग घेता यावा म्हणून पुष्कळांनी आपल्या जीवनात अनेक फेरबदल केले आहेत. (मत्त. ९:३७, ३८) उदाहरणार्थ, गेल्या वर्षी, सरासरी ८,५०,००० प्रचारकांनी दर महिन्याला पायनियर म्हणून सेवा केली. यासाठी सामान्य पायनियरांना दर महिन्याला सरासरी ७० तास प्रचार कार्यात खर्च करावे लागतात. आणि साहाय्यक पायनियरांना ५० तास.

३. पायनियरींग करण्याकरता प्रचारकांना सहसा कोणते फेरबदल करावे लागतात?

३ पायनियर कसे बनता येईल: “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” हे पायनियरांना माहीत असल्यामुळे ते आपली जीवनशैली साधीसोपी ठेवायचा प्रयत्न करतात. (१ करिंथ. ७:२९, ३१) जास्त वेळ नोकरी करण्यात घालवावा लागणार नाही म्हणून ते खर्च कसा कमी करता येईल, याचे मार्ग शोधत असतात. जसे की, काही जण लहान घरात राहायला जातात. इतर काहींनी आपल्या घरातून अनावश्‍यक भौतिक गोष्टी काढून टाकल्या आहेत. (मत्त. ६:१९-२१) अनेकदा त्यांना व्यक्‍तिगत गोष्टींच्या मागे धावणे देखील थांबवावे लागते. हे सर्व यासाठी केले जाते जेणेकरून त्यांना सेवेत अधिक वेळ आणि लक्ष घालता येईल. (इफिस. ५:१५, १६) नेटाने, आत्म-त्यागी वृत्तीने व प्रार्थनेद्वारे यहोवावर विसंबून राहिल्यामुळे अनेक प्रचारकांनी आपल्या वेळापत्रकात फेरबदल केला आहे ज्यामुळे त्यांना पायनियरींग करता येते.

४. कोणती व्यावहारिक पावले तुम्हाला पायनियरींगचे ध्येय गाठण्यास मदत करू शकतात?

४ तुम्ही पायनियरींग करू शकाल का? ज्यांनी यशस्वीरीत्या पायनियरींग केली आहे अशांना त्यांचा अनुभव विचारून पाहा. त्यांच्याबरोबर क्षेत्र सेवेत जा आणि त्यांना मिळत असलेला आनंद तुम्हीसुद्धा अनुभवा. आपल्या प्रकाशनांत, पायनियरींगवर आलेल्या लेखांचा अभ्यास करा. स्वतःसाठी व्यावहारिक ध्येये ठेवा जी पायनियरींग करण्याकरता मैलाचा दगड ठरू शकतात. सध्या तुमच्यासमोर काही अडचणी असल्यामुळे तुम्हाला पायनियरींग करता येत नसेल तर त्यांच्याविषयी यहोवाला प्रार्थना करा आणि या अडचणी कशा सोडवायच्या याबाबतीत त्याची मदत मागा.—नीति. १६:३.

५. पायनियरींगमुळे सेवेतील आपले कौशल्य सुधारण्यास कशी मदत होते?

५ आशीर्वाद आणि आनंद: पायनियरींगमुळे, देवाच्या वचनाचा वापर करण्यात आपण कुशल होतो. यामुळे आपला आनंद द्विगुणीत होतो. एका तरुण पायनियर भगिनीने म्हटले: “देवाचे सत्याचे वचन उत्तमरीत्या सांगता येणे खरोखरच खूप फायदेकारक आहे. पायनियरींग करताना आपण बायबलचा सर्रास वापर करतो. आता मी घरोघरी जाते तेव्हा प्रत्येक घरमालकाला कोणते शास्त्रवचन लागू होईल याचा विचार करू शकते.”—२ तीम. २:१५.

६. पायनियरींगमुळे आपल्याला कोणते प्रशिक्षण मिळते?

६ पायनियरींगमुळे आपण अनेक कौशल्ये शिकू शकतो ज्यांमुळे आपले जीवन सुधारू शकते. पायनियरींगमुळे तरुणांना आपल्या वेळेचा, पैशाचा सदुपयोग कसा करायचा, लोकांबरोबर कसे वागायचे हे शिकता येते. पुष्कळ बंधूभगिनी पायनियरींगमुळे जीवनाबद्दल आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित करू शकले आहेत. (इफिस. ४:१३) शिवाय, पायनियरांना सहसा त्यांच्या जीवनात यहोवाचा हात अर्थात त्याच्याकडून येणारी मदत आणि आशीर्वाद अनुभवायची एक उत्तम संधी मिळते.—प्रे. कृत्ये ११:२१; फिलिप्पै. ४:११-१३.

७. पायनियरींग आपल्याला यहोवाच्या समीप येण्यास मदत कशी करते?

७ पायनियरींगचा एक सर्वात मोठा आशीर्वाद म्हणजे पायनियरींगमुळे आपण यहोवाच्या आणखी जवळ येतो. यामुळे आपण कोणत्याही परीक्षेत टिकून राहू शकतो. अतिशय कठीण परिस्थितीतून गेलेल्या एका भगिनीने म्हटले: “पायनियरींगच्या वेळी यहोवाबरोबर जोडलेल्या जवळच्या नात्यामुळे मी माझ्यावर आलेल्या खडतर काळात टिकून राहू शकले.” ती पुढे असे म्हणाली: “मी माझं प्रौढ जीवन यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करण्यात घालवले याचा मला किती आनंद होतो. यामुळे मी, ज्याचा कधी विचारही केला नाही इतक्या अनेक मार्गांनी कामी आले आहे.” (प्रे. कृत्ये २०:३५) तेव्हा आपणही या सर्वात महत्त्वपूर्ण कार्यात आपले सर्व काही पणाला लावतो तेव्हा यहोवाकडून मिळणाऱ्‍या विपूल आशीर्वादांचा अनुभव घेऊ या.—नीति. १०:२२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा