ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑगस्ट २९, २००५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जुलै ४ ते ऑगस्ट २९, २००५ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. इतरांना आपल्या आशेविषयी सांगताना, आपला “समजूतदारपणा सर्वांना कळून यावा” म्हणून आपण काय करू शकतो आणि हे महत्त्वाचे का आहे? (फिलि. ४:५, NW; याको. ३:१७, NW) [be पृ. २५१ परि. १-३, चौकोन]
२. इतरांचे म्हणणे केव्हा कबूल करावे हे ओळखल्यामुळे आपल्याला इतरांशी चांगल्याप्रकारे वागणे कसे शक्य होईल? [be पृ. २५३ परि. १-२]
३. इतरांना एखाद्या विषयावर तर्क करण्यास मदत करताना, प्रश्नांचा निपुणतेने वापर करणे का महत्त्वाचे आहे? [be पृ. २५३ परि. ३-४]
४. आपले भाषण इतरांना पटण्यासारखे वाटावे म्हणून कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत? [be पृ. २५५ परि. १-४, चौकोन; पृ. २५६ परि. १, चौकोन]
५. शास्त्रवचनांत दिलेली माहिती योग्य व वाजवी आहे हे सिद्ध करण्याकरता जर आपण बाहेरचे संदर्भ वापरायचे ठरवले तर कोणत्या गोष्टी आठवणीत ठेवल्या पाहिजेत? [be पृ. २५६ परि. ३-५, चौकोन]
नेमणूक क्र. १
६. येशू खरोखर ऐतिहासिक व्यक्ती आहे हे कोणत्या सुस्पष्ट पुराव्यावरून दिसून येते? [w०३-MR ६/१५ पृ. ४-७]
७. “सरळांचे मुख त्यांस सोडवील” आणि “धार्मिकांचे घर टिकते” हे शब्द कशाप्रकारे खरे ठरतात? (नीतिसूत्रे १२:६, ७) [w०३-MR १/१५ पृ. ३० परि. १-३]
८. बायबलमध्ये, काय करावे व काय करू नये याची यादी दिलेली नाही, मग आपण “प्रभूची इच्छा काय आहे” हे कसे ‘समजून घेऊ’ शकतो? (इफिस. ५:१७) [w०३-MR १२/१ पृ. २१ परि. ३-पृ. २२ परि. ३]
९. गरिबी अथवा इतर आर्थिक अडचणींना तोंड देण्याकरता बायबलमधील कोणत्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे एका व्यक्तीला मदत मिळू शकते? [w०३-MR ८/१ पृ. ५ परि. २-५]
१०. यहोवाच्या औदार्याच्या उदाहरणाचा आपल्यावर कसा परिणाम झाला पाहिजे? (मत्त. १०:८) [w०३-MR ८/१ पृ. २०-२]
साप्ताहिक बायबल वाचन
११. शलमोनाने बांधलेल्या मंदिराच्या देवडीजवळ उभे केलेले याखीन व बवाज नावाचे दोन खांब कशास सूचित करत होते? (१ राजे ७:१५-२२)
१२. शलमोनाने सोराचा राजा हीराम यांस गालील प्रांतातील वीस नगरांचा नजराणा दिला तो मोशेच्या नियमशास्त्रानुसार होता का? (१ राजे ९:१०-१३)
१३. ‘देवाच्या माणसाने’ केलेल्या अवज्ञेवरून आपण काय शिकू शकतो? (१ राजे १३:१-२५)
१४. यहूदाचा राजा आसा याने धैर्य कसे दाखवले आणि त्याच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? (१ राजे १५:११-१३)
१५. राजा अहाब व नाबोथ यांच्या संदर्भात घडलेल्या घटनेतून, स्वतःची कीव करत बसणे धोकेदायक ठरू शकते हे कसे दिसून येते? (१ राजे २१:१-१६)