वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०५ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • जुलै ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट १ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००५
km ७/०५ पृ. २

सेवा सभा आराखडा

जुलै ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! अंक आणि जुलै १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. प्रत्येक प्रात्यक्षिकात “मी सध्या कामात आहे,” असे म्हणून संभाषणाला खीळ पाडणाऱ्‍याशी कशाप्रकारे बोलता येईल हे दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान ११-१२ पाहा.

१५ मि: स्थानिक गरजा.

२० मि: “जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करणे.”a ५ व्या परिच्छेदाची चर्चा करताना, आमची राज्य सेवा याच्या जून २००५ अंकातील पृष्ठ ८ वरील स्थानिक क्षेत्राला लागू होणाऱ्‍या मुद्द्‌यांची चर्चा करा.

गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २३ (२००)

१० मि: स्थानीय घोषणा. टेहळणी बुरूज ऑगस्ट १५, २००० यातील पृष्ठ ३२ याची संक्षिप्त उजळणी करा. दररोज बायबल वाचण्याचा नित्यक्रम, आपण रजेवर असतो व इतरवेळी आपला सामान्य दिनक्रम बदलतो तेव्हाही, पाळल्यामुळे कोणते फायदे मिळतात याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधा.

१५ मि: “प्रगतिशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग ११.”b एका प्रात्यक्षिकाचा समावेश करा, ज्यात अभ्यास संचालक व नवा प्रचारक पुनर्भेटीची तयारी करत आहेत. पहिल्या भेटीत काय काय घडले याचा ते पुनर्विचार करतात आणि पुनर्भेटीत सांगण्याजोगा एक उचित मुद्दा निवडतात. तसेच, एक साधीशी प्रस्तावना व पुनर्भेटीच्या शेवटी घरमालकापुढे ठेवण्याजोगा एक प्रश्‍नही ते तयार करतात. शेवटी ते, आपण जी तयारी केली आहे त्याची तालीम करू या, असे म्हणून प्रात्यक्षिक संपवतात.

२० मि: इतरांना बायबलचे मोल समजून घेण्यास मदत करणे. देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे २४-५ वरील परिच्छेद ३-६ वर आधारित प्रश्‍नोत्तराद्वारे चर्चा. पुस्तकात पुरवलेल्या उजळणी प्रश्‍नांचा उपयोग करा. सर्व लोकांकरता असलेले पुस्तक, पृष्ठ ३२ वरील मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! व ऑगस्ट १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. एका प्रात्यक्षिकात, बाजारात किंवा इतर उचित सार्वजनिक स्थळी अनौपचारिकरित्या मासिके सादर करत असल्याचे दाखवा.

१० मि: आपल्या मुलांच्या मनावर सत्य बिंबवा. (अनु. ६:७) हे भाषण वडिलांनी टेहळणी बुरूज, ऑगस्ट १५, २००२ अंकातील पृष्ठे ३०-१ यातील मुद्द्‌यांच्या आधारावर द्यावे. ज्याचा विवाह सोबती साक्षीदार नाही अशा ख्रिस्ती पालकाने आपल्या मुलांना कशाप्रकारे प्रशिक्षण द्यावे यावर मार्गदर्शन पुरवणाऱ्‍या शास्त्रवचनीय तत्त्वांकडे लक्ष वेधा.

२० मि: “आपण इतरांचे ऋणी आहोत.”c टेहळणी बुरूज, जुलै १, २०००, पृष्ठ ११, परिच्छेद १३ यातील मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. १० (८२) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१५ मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना जुलै महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. श्रोत्यांना सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ ७० उघडण्याची विनंती करा. मग श्रोत्यांसोबत परिच्छेद १-२ व “सभांत उत्तरे कशी द्यावीत?” असे शीर्षक असलेल्या चौकोनातील माहितीवर चर्चा करा.

१५ मि: “तुमच्या मुलांना सेवाकार्यात प्रगती करण्यास मदत करा.” भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. पालक व मूल साधीशी सादरता वापरून साक्ष देत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा. सादरतेच्या शेवटी पालकाने देणग्यांची व्यवस्था थोडक्यात समजावून सांगावी.

१५ मि: आवश्‍यकतेनुसार बदलता येतील अशा प्रस्तावनांचा तुम्ही वापर करून पाहिलात का? आमची राज्य सेवा, जानेवारी २००५ अंकातील पृष्ठ ६ वर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. दिलेल्या सूचनांची उजळणी करा आणि ऑगस्ट महिन्याचे साहित्य सादर करताना अशा बदलत्या येण्याजोग्या प्रस्तावनांचा कसा वापर करता येईल हे दाखवा. एक किंवा दोन सादरता प्रात्यक्षिकाच्या रूपात दाखवा.

गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा