जागृत राहा! माहितीपत्रकाचा अभ्यास
संपूर्ण जगभरातील मंडळ्या, मे २३ ते जून २०, २००५ या दरम्यान मंडळीच्या पुस्तक अभ्यासात जागृत राहा! माहितीपत्रकाचा अभ्यास करतील. या सभेची तयारी करण्याकरता व ती संचालित करण्याकरता कृपया खालील प्रश्नांचा उपयोग करा. अभ्यासादरम्यान, छापील साहित्य वाचा आणि वेळ असल्यास उद्धृत शास्त्रवचने वाचा.
मे २३ चा आठवडा
▪ पृष्ठे ३-४: येथे उल्लेखित कोणत्या घटनांचा खासकरून तुमच्या जीवनावर परिणाम झाला आहे? या घटना, सर्वसामान्य व अधूनमधून घडणाऱ्या घटना नाहीत, हे कशावरून तुम्हाला वाटते?
▪ पृष्ठ ५: कोणत्या गोष्टीमुळे तुमची खात्री पटली आहे, की देव खरोखरच तुमची काळजी घेतो? देव काय म्हणतो आणि काय करत आहे त्याची आपल्याला किती पर्वा आहे, हे कशावरून दिसून येईल?
▪ पृष्ठे ६-८: मत्तय २४:१-८, १४ ही वचने सध्याच्या परिस्थितीचा काय अर्थ सांगतात? २ तीमथ्य ३:१-५ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण कोणत्या काळात जगत आहोत? कशाचे शेवटले दिवस आहेत हे? कोणत्या गोष्टीमुळे तुमची खात्री पटली आहे, की बायबल खरोखरच देवाचे वचन आहे? आपण ज्याचा प्रचार करतो ते राज्य काय आहे?
▪ पृष्ठे ९-१०: आपण दररोज जे निर्णय घेतो आणि जीवनात कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो यावर काळजीपूर्वक विचार का केला पाहिजे? (रोम. २:६; गलती. ६:७) पृष्ठ १० वरील प्रश्नांची उजळणी करताना, तुम्ही जे करायला पाहिजे त्याजशी संबंधित असलेली कोणती शास्त्रवचने तुमच्या मनात आली?
मे ३० चा आठवडा
▪ पृष्ठ ११: या पृष्ठावर विचारलेल्या प्रश्नांचा आपण व्यक्तिगतरीत्या विचार का केला पाहिजे? (१ करिंथ. १०:१२; इफिस. ६:१०-१८) या प्रश्नांच्या उत्तरांवरून, मत्तय २४:४४ मधील येशूचा सल्ला आपण गांभीर्याने घेतो की नाही, याविषयी काय दिसून येईल?
▪ पृष्ठे १२-१४: प्रकटीकरण १४:६, ७ मध्ये म्हटलेली ‘न्यायनिवाडा करण्याची घटिका’ काय आहे? ‘देवाची भीती बाळगून त्याचे गौरव’ करण्याचा काय अर्थ होतो? मोठी बाबेल काय आहे आणि तिचे काय होणार आहे? मोठ्या बाबेलविषयी आपण आता कोणते पाऊल उचलले पाहिजे? न्यायनिवाड्याच्या भाकीत केलेल्या घटिकेत आणखी कशाकशाचा समावेश आहे? देवाचा न्यायदंड बजावण्याचा “दिवस किंवा ती घटका” माहीत नसल्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो? (मत्त. २५:१३)
▪ पृष्ठ १५: सार्वभौमत्वाचा वादविषय काय आहे, आणि याचा आपल्या प्रत्येकावर कसा परिणाम होतो?
▪ पृष्ठे १६-१९: “नवे आकाश” व “नवी पृथ्वी” काय आहे? (२ पेत्र ३:१३) यांचे अभिवचन कोण देतो? नवे आकाश व नव्या पृथ्वीमुळे कोणते बदल होतील? व्यक्तिगतरीत्या आपल्याला याचा फायदा होईल का?
जून ६ चा आठवडा
▪ पृष्ठ २०-१: येशूने आपल्या पहिल्या शतकातील अनुयायांना, पळून जाण्याविषयी कोणती ताकीद दिली? (लूक २१:२०, २१) पलायन करणे केव्हा शक्य होते? विलंब न लावता पलायन करणे तातडीचे का होते? (मत्त. २४:१६-१८, २१) पुष्कळ लोक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष का करतात? चीन व फिलिपाईन्समधील हजारो लोकांचा, विश्वसनीय इशाऱ्यांकडे लक्ष दिल्यामुळे फायदा कसा झाला? सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी बायबलमध्ये दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देणे याहूनही महत्त्वाचे का आहे? या मोठ्या निकडीच्या परिस्थितीत आपल्यावर कोणती जबाबदारी आहे? (नीति. २४:११, १२)
▪ पृष्ठे २२-३: १९७४ साली ऑस्ट्रेलियात आणि १९८५ साली कोलंबियात अनेक लोकांनी, येऊ घातलेल्या संकटाकडे दुर्लक्ष का केले आणि याचा काय परिणाम झाला? तुम्हाला काय वाटते, या इशाऱ्यांना तुम्ही कसा प्रतिसाद दिला असता, व का? नोहाच्या दिवसांतील इशाऱ्याकडे आपण लक्ष दिले असते की नाही हे कशावरून सूचित होते? प्राचीन सदोम शहराच्या आत व जवळपास लोक का राहू इच्छित होते? सदोममध्ये जे झाले त्यावर गांभीर्याने विचार केल्याने आपला फायदा कसा होईल?
जून १३ चा आठवडा
▪ पृष्ठे २४-७: पृष्ठ २७ वरील “अभ्यासासाठी प्रश्ने” यांचा उपयोग करा.
जून २० चा आठवडा
▪ पृष्ठे २८-३१: पृष्ठ ३१ वरील “अभ्यासासाठी प्रश्ने” यांचा उपयोग करा.
या माहितीपत्रकाचा अभ्यास केल्याने आपल्याला “जागृत” व “सिद्ध” राहण्यास मदत मिळेल. आपल्या जाहीर सेवेवरून, “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे,” या देवदूताने केलेल्या घोषणेबद्दल आपल्याला निकडीची जाणीव आहे हे नेहमी दिसून येवो.—मत्त. २४:४२, ४४; प्रकटी. १४:७.