घोषणा
▪ साहित्य सादरता एप्रिल १-१७: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. आणखी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांकडे, तसेच जे स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात पण मंडळीच्या कार्यांत सक्रिय सहभाग घेत नाहीत अशा व्यक्तींकडे पुनर्भेटी करताना देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. यामागचा उद्देश, खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तक व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केला आहे त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा असावा. एप्रिल १८ - मे १५: जागृत राहा! माहितीपत्रकाचे वितरण करण्याची खास मोहीम. मे १६-३१: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. आणखी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांकडे, तसेच जे स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्वरशासित कार्यक्रमांना उपस्थित राहतात पण मंडळीच्या कार्यांत सक्रिय सहभाग घेत नाहीत अशा व्यक्तींकडे पुनर्भेटी करताना देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. यामागचा उद्देश, खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तक व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केला आहे त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा असावा. जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) पुस्तक सादर करा. आपल्याला मुले नाहीत, असे घरमालकाने सांगितल्यास, त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जुलै व ऑगस्ट: खालील कोणत्याही ३२ पानी माहितीपत्रकाचा उपयोग करू शकता: भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा!, नंदनवन आणविणारे सरकार, “पहा! मी सर्व नवे करितो,” तुम्ही त्रैक्य मानावे का? देव खरोखर आपली काळजी करतो का?, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी), आणि मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी).
▪ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराला राखून ठेवावी लागते. तेव्हा, यात केव्हाही काही बदल असतील तर मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून, सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्यक आहे.
▪ मंडळीच्या सचिवांनी ॲप्लीकेशन फॉर रेग्युलर पायनियर सर्व्हिस (S-205) आणि ॲप्लीकेशन फॉर ऑक्झीलरी पायनियर सर्व्हिस (S-205b) या फॉर्म्सचा पुरेसा साठा बाळगावा. हे फॉर्म्स लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म भरून (S-14) मागवता येतात. एक वर्षभर पुरतील इतक्या फॉर्म्सचा साठा ठेवा. रेग्युलर पायनियर सर्व्हीसचे फॉर्म, ते पूर्णपणे भरलेले आहेत की नाही हे पाहा.
▪ ऑगस्ट २६-२८, २००५ या तारखांदरम्यान बंगळूर (इंग्रजी) येथे भरवल्या जाणाऱ्या प्रांतीय अधिवेशनात, मूक-बधिरांसाठी संकेत भाषेत कार्यक्रम भरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
▪ एप्रिल महिन्याच्या लिटरेचर रिक्वेस्टसोबतच लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्ममध्ये (S-14) दिलेल्या सर्व फॉर्म्सच्या वार्षिक साठ्यासाठी आपल्या मागण्या पाठवा. फॉर्म्स मागवण्यासाठी एक वेगळे पत्र किंवा एक वेगळा लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म पाठवू नका; तर तुमच्या एप्रिल महिन्याच्या लिटरेचर रिक्वेस्टसोबतच मागवा. अधिक माहितीसाठी, वॉचटावर लिटरेचर रिक्वेस्ट गाईड, विभाग ४, पृष्ठ १ पाहा.
▪ २००५ सालचे प्रांतीय अधिवेशन बॅजकार्ड, लिटरेचरबरोबरच पाठवले जातील. यांची वेगळी ऑर्डर पाठवण्याची गरज नाही. मंडळीच्या मुख्य भाषेखेरीज इतर भाषेत हवे असतील तरच ऑर्डर पाठवण्याची गरज पडेल. प्रत्येक मंडळीच्या प्रचारकांच्या संख्येनुसार, २५-२५च्या गठ्ठ्यात बॅजकार्ड पाठवले जातील. मंडळीला ज्यादा कार्ड हवे असतील तर लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) भरून ते मागवावेत.
▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
चर्चेसाठी बायबलचे विषय (सुधारित) —कन्नड
कुरूक्षेत्र ते हर्मगिदोनपर्यंत—आणि तुमचा बचाव —कन्नड, गुजराती, तमीळ, तेलगू, बंगाली, मराठी, मल्याळम, हिंदी