वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०५ पृ. १
  • चांगले करा आणि दान करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगले करा आणि दान करा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • एकमेकांची उन्‍नती करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • “परोपकारी व दानशूर असावे”
    आमची राज्य सेवा—२०००
  • दुःखी जनांना सांत्वन द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ४/०५ पृ. १

चांगले करा आणि दान करा

१ दुर्कस “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे.” (प्रे. कृत्ये ९:३६, ३९) तिच्या उदार मनोवृत्तीमुळे, तिला ओळखत असलेल्या लोकांना व यहोवा देवाला ती प्रिय वाटत होती. इब्री लोकांस १३:१६ म्हणते: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” आज आपण, कोणकोणत्या मार्गांनी चांगले करू शकतो व दान करू शकतो?

२ इतरांना फायदा करून देण्याचा एक मार्ग म्हणजे, ‘आपल्या द्रव्याचे’ दान करणे. (नीति. ३:९) संपूर्ण जगभरात चाललेल्या कार्यासाठी आपण देत असलेल्या देणग्यांमुळे, संपूर्ण जगभरात राज्य सभागृहे, संमेलन गृहे आणि शाखा दफ्तरे बांधणे शक्य झाले आहे. आपल्या उदारतेमुळे लाखो बंधूभगिनींना ईश्‍वरशासित प्रशिक्षणाचा व उभारणीकारक आध्यात्मिक संगतीचा लाभ झाला आहे.

३ सांत्वन देणे: विपत्ती कोसळते तेव्हा यहोवाचे लोक सहविश्‍वासूंचे तसेच जे सत्यात नाहीत अशा लोकांचेही ‘बरे करण्यास’ तयार असतात. (गलती. ६:१०) फ्रान्समध्ये एका रसायन कारखान्याचा विस्फोट झाल्यानंतर, कारखान्याजवळ राहणाऱ्‍या एका जोडप्याने असे म्हटले: “आपले ख्रिस्ती बांधव लगेच, आमचं अर्पाटमेंट आणि इमारतींमधील इतर अर्पाटमेंट स्वच्छ करायला धावून आले. इतके लोक मदतीला आलेले पाहून आमच्या शेजाऱ्‍यांना खूप आश्‍चर्य वाटलं.” दुसऱ्‍या एका भगिनीने म्हटले: “मंडळीतले वडील आमच्या मदतीला धावून आले. ते आम्हाला धीर द्यायला आले होते. भौतिक मदतीपेक्षा आम्हाला याचीच गरज होती.”

४ आपण अनेक मार्गांनी, आपल्या शेजाऱ्‍यांचे चांगले करू शकतो. परंतु सर्वात लाभदायक मार्ग म्हणजे आपण त्यांना सत्याचे अमूल्य ज्ञान आणि स्वतः यहोवाने वचन दिलेल्या ‘युगानुयुगाच्या जीवनाची’ आशा देऊ शकतो. (तीत १:१, २) जगाची परिस्थिती पाहून व स्वतःच्या पापी अवस्थेवर हळहळ व्यक्‍त करणाऱ्‍यांना बायबलच्या संदेशातून खरे सांत्वन मिळते. (मत्त. ५:४) आपण समर्थ असतो तेव्हा, इतरांचे चांगले करत राहू या व दान करत राहू या.—नीति. ३:२७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा