“परोपकारी व दानशूर असावे”
१ अनेक शतकांपूर्वी प्रेषित पौलाने तीमथ्याला सर्व बांधवांना एक सल्ला देण्यास सांगितले. तो सल्ला असा होता: “चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे.” (१ तीम. ६:१८) इब्री बांधवांना देखील पौलाने आठवण करून दिली की, “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका.” (इब्री १३:१६) असा सल्ला पौलाने का दिला? कारण त्याला माहीत होते की ‘सत्कृत्य करणाऱ्या प्रत्येकास गौरव, सन्मान व शांती मिळेल.’—रोम. २:१०.
२ यहोवा देव या विश्वाचा निर्माणकर्ता असल्यामुळे सर्वकाही त्याच्याच मालकीचे आहे. (प्रकटी. ४:११) आणि त्याच्या मालकीच्या सर्व गोष्टी त्याने मनुष्याला मुबलक प्रमाणात दिल्या आहेत. देवाच्या दयाळूपणाची आपण कृतज्ञतेने कदर करतो, पण जगातल्या बहुतेक लोकांना देवाच्या दयेची जराही जाणीव नाही. पण अशा लोकांनाही देव जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात देतच राहतो. (मत्त. ५:४५) मानवांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून त्याने आपल्या परमप्रिय पुत्राचे बलिदान देखील दिले. आपल्याबद्दल देवाने इतके प्रेम दाखवले असताना, आपणही परोपकारी व दानशूर होऊन देवाला आपली कृतज्ञता दाखवू नये का?—२ करिंथ. ५:१४, १५.
३ कोणते उपकार करता येतील? आपल्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग देवाला आवडेल अशा पद्धतीने आपण केला पाहिजे. त्यासाठी राज्यप्रचाराच्या जगव्याप्त कार्याला आपण भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही मार्गांनी पाठिंबा दिला पाहिजे. अर्थात, देवाच्या राज्याच्या सुवार्तेपेक्षा जास्त मोलवान काहीच नाही, कारण “तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” (रोम. १:१६) तेव्हा ही मोलवान सुवार्ता इतरांनाही ऐकायला मिळावी म्हणून आपण दर महिन्यात प्रचाराच्या व बायबल अभ्यास घेण्याच्या कार्यात आपला जास्तीतजास्त वेळ व शक्ती खर्च करतो का? असे केल्यामुळे आपण लोकांना सार्वकालिक जीवन मिळवायला मदत करू शकतो.
४ बेताचीच परिस्थिती असलेल्या बांधवांना आपण आर्थिक मदत करतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. तो आपल्याला अनेक आशीर्वाद देईल, अशी त्याने स्वतः प्रतिज्ञा केली आहे. पण तो आपल्याला आठवण करून देतो की, “क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण धार्मिकता मृत्यूपासून सोडविते.” (नीति. ११:४; १९:१७) राज्याच्या कार्याला आर्थिक हातभार लावून, तसेच सुवार्तेच्या प्रचारातही जास्तीतजास्त सहभाग घेऊन आपण खऱ्या अर्थाने परोपकारी व दानशूर आहोत हे दाखवून देतो.