वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०५ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • एप्रिल ११ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल १८ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल २५ ने सुरू होणारा सप्ताह
  • मे २ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००५
km ४/०५ पृ. २

सेवा सभा आराखडा

सूचना: अधिवेशन असलेल्या महिन्यांमध्ये, आमची राज्य सेवा यात, दर आठवड्यासाठी एका सेवा सभेचा आराखडा असेल. “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मंडळ्यांनी आवश्‍यक ते बदल करावेत. उचित वाटल्यास, अधिवेशनाला जाण्याअगोदरच्या आठवड्यातल्या सेवा सभेच्या शेवटल्या १५ मिनिटांसाठी, या महिन्याच्या पुरवणीतील सूचनांची पुनरुक्‍ती करा. तुमच्या अधिवेशनानंतर एक किंवा दोन महिन्यांनंतर, एका सेवा सभेतील १५ ते २० मिनिटे (कदाचित स्थानीय गरजा या भागात) बाजूला राखा जेणेकरून, प्रचारकांना क्षेत्र सेवेत उपयोगी पडणाऱ्‍या अधिवेशनांतील ठळक मुद्द्‌यांची उजळणी करता येईल. या खास सेवा सभेमुळे आपल्याला, अधिवेशनात जे काही शिकलो त्याचा उपयोग आपण कसा करत आहोत आणि यामुळे आपली सेवा आणखी प्रभावशाली बनवण्यास आपल्याला मदत कशी मिळाली आहे त्याचे स्पष्टीकरण देण्यास संधी मिळेल.

एप्रिल ११ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून एप्रिल १ चा टेहळणी बुरूज अंक आणि एप्रिल-जूनचा सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. एका प्रात्यक्षिकात, प्रचारक रस्त्यावरील साक्षकार्यात भाग घेत असल्याचे दाखवा.

१५ मि: “नेटाने प्रचार करीत राहा.”a वेळ मिळेल त्याप्रमाणे, श्रोत्यांना उद्धृत शास्त्रवचनांवर टिपणी करण्याचे आमंत्रण द्या.

२० मि: “नवीन माहितीपत्रकाचे वितरण करण्याकरता खास मोहीम.”b सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. सुचवलेल्या सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. एका प्रात्यक्षिकात, घरमालकाने शास्त्रवचनीय सादरतेत फारशी आस्था न दाखवल्यामुळे प्रचारक त्याला माहितीपत्रकाऐवजी एक पत्रिका देत असल्याचे दाखवा.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल १८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १५ (१२७)

१० मि: स्थानीय घोषणा. नव्या माहितीपत्रकाचे वितरण करण्याकरता आयोजित केलेल्या खास मोहिमेच्या व्यवस्थेची थोडक्यात उजळणी करा. स्थानीय क्षेत्रात नवीन माहितीपत्रक सादर केल्यामुळे उत्तम परिणाम मिळत आहेत हे दाखवणारे एक प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग ८.”c एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा ज्यात, एक प्रचारक एका नवीन बायबल विद्यार्थ्याला यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? त्यांचा काय विश्‍वास आहे? हे माहितीपत्रक देतो. प्रचारक, माहितीपत्रकातील पृष्ठ २० वरील चित्राकडे विद्यार्थ्याचे लक्ष वळवून जाहीर भाषणाचे संक्षिप्त वर्णन करतो. तो विद्यार्थ्याला पुढील जाहीर भाषणाचा विषय सांगून त्याला सभेला येण्याचे आमंत्रण देतो.

१५ मि: स्थानीय अनुभव. आतापर्यंत नवीन माहितीपत्रकाचे खास मोहिमेत वितरण करताना आलेले अनुभव सांगण्यास मंडळीतील बंधूभगिनींना आमंत्रण द्या. उल्लेखनीय अनुभवांचे रूपांतर करून दाखवण्याची आधीच व्यवस्था करा. माहितीपत्रकांचा साठा कमी पडत असेल तर, ज्या प्रचारकांकडे ज्यादा प्रती आहेत त्यांनी त्या लिटरेचर काऊंटरवर पुन्हा आणून द्याव्यात, अशी सर्वांना विनंती करा.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल २५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१५ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. प्रचारकांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून मे १ चा टेहळणी बुरूज अंक आणि एप्रिल-जून सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. एका प्रात्यक्षिकात, “मला आस्था नाही” असे म्हणून संभाषणाला खीळ घालणाऱ्‍या लोकांबरोबर कसे बोलायचे ते दाखवा. (पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिकेचे पान ८ पाहा.) क्षेत्रांतील लोकांचे लक्ष लगेच आकर्षित होईल असे लेख दाखवा.

३० मि: “मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण करा.”d मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. मंडळीला कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास नेमले आहे ते सांगा. टेहळणी बुरूज अभ्यासाप्रमाणे, या लेखातील परिच्छेदांची चर्चा करा. एका नेमलेल्या वाचकाला परिच्छेद वाचायला सांगा. “प्रांतीय अधिवेशनाबाबत सूचना” या चौकोनाची उजळणी करा.

गीत क्र. १६ (१४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

मे २ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ६ वरील “जागृत राहा! माहितीपत्रकाचा अभ्यास” या लेखाची संक्षिप्त उजळणी करा. या लेखात, माहितीपत्रकाचा अभ्यास कशाप्रकारे केला जाईल ते सांगण्यात आले आहे. मे २३ ने सुरू होणाऱ्‍या आठवड्यापासून दर आठवडी अभ्यासाची चांगली तयारी करून सहभाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

२० मि: नवीन माहितीपत्रकाद्वारे लोकांची आस्था आणखी वाढवा. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा करण्याद्वारे सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. जागृत राहा! माहितीपत्रकात असलेल्या अनेक चौकोनांवर विचार करून, पुनर्भेटी देताना या चौकोनांचा उपयोग कसा करता येईल, त्याची चर्चा करा. कोणत्या चौकोनांतील माहिती, स्थानीय क्षेत्रात लोकांना सर्वात जास्त आवडू शकते, त्या माहितीवर टिपणी करण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या. एका चौकोनाचा उपयोग करून पुनर्भेटीचे एक प्रात्यक्षिक दाखवा. पुढील भेटीत ज्यावर चर्चा केली जाईल, त्या आणखी एका चौकोनाकडे घरमालकाचे लक्ष वळवून प्रचारक प्रात्यक्षिक समाप्त करतो. पुढच्या एका सेवा सभेत, पुढील भेटीचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.

१५ मि: “चांगले करा आणि दान करा.”e लेखातील माहिती स्थानीय क्षेत्राला लागू करा आणि आपण इतरांना मदत करू शकतो अशा व्यावहारिक मार्गांचा उल्लेख करा.

गीत क्र. ११ (८५) व समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा