वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०५ पृ. १
  • बायबलवर अधिक भर!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलवर अधिक भर!
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • प्रिय वाचकांनो
    सावध राहा!—२००६
  • द वॉचटावर व अवेक!—सत्याची समयोचित नियतकालिके
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • घरोघरी आपल्या मासिकांचा वापर करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सरस गोष्टींची सुवार्ता प्रकाशित करणे
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km ३/०५ पृ. १

बायबलवर अधिक भर!

१. सुरुवातीला, टेहळणी बुरूज नियतकालिक प्रामुख्याने कोणासाठी आणि गोल्डन एज कोणासाठी प्रकाशित केले जात होते?

१ ऑक्टोबर १, १९१९ पासून, गोल्डन एज या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. प्रचार कार्यात हे नियतकालिक एक महत्त्वाचे साधन ठरले. का? कारण ते खासकरून जनतेसाठी होते. परंतु, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या बाबतीत असे नव्हते; अनेक वर्षांपर्यंत असे समजले जायचे, की टेहळणी बुरूज नियतकालिक हे खासकरून ‘लहान कळपासाठी’ होते. (लूक १२:३२) राज्य प्रचारकांनी या नव्या प्रकाशनाला इतक्या आवेशाने प्रतिसाद दिला, की कित्येक वर्षांपर्यंत, गोल्डन एज नियतकालिकाचा खप टेहळणी बुरूज नियतकालिकांपेक्षा कित्येक पटीने अधिक होता.

२. आज, गोल्डन एज नियकालिकाचे काय नाव आहे आणि सुरुवातीपासूनच या नियतकालिकाचा काय उद्देश राहिला आहे?

२ मानवजातीच्या समस्यांवर खरा उपाय ख्रिस्ताचे हजार वर्षांचे राज्य आहे जे मानवजातीला एका सुवर्ण युगात नेईल, हे दाखवण्यासाठी गोल्डन एज नियतकालिक छापले जात होते. मग नंतरच्या वर्षांत, काळाच्या गरजांनुसार गोल्डन एज नियतकालिकात अनेक बदल करण्यात आले. १९३७ साली त्याचे नाव बदलून ते कन्सोलेशन करण्यात आले. १९४६ साली, आज त्याला ज्या नावाने ओळखले जाते ते अर्थात, अवेक! हे नाव देण्यात आले.

३. अवेक! नियतकालिक कोणती भविष्यवाणी पूर्ण करण्यात एक शक्‍तिशाली साधन ठरले आहे?

३ सुरुवातीपासूनच या नियतकालिकाने, १९१९ पासून दिल्या जाणाऱ्‍या मोठ्या साक्षकार्यात कमालीची भर घातली आहे. (मत्त. २४:१४) परंतु, आपल्या काळाची निकड पाहता, इंग्रजीतील अवेक! नियतकालिकाच्या संबंधाने काही फेरबदल करण्याची गरज भासत आहे.

४. (क) एखाद्या व्यक्‍तिला ‘परमेश्‍वराच्या क्रोधदिनापासून’ वाचायचे असेल तर तिने काय करण्याची गरज आहे? (ख) प्रकटीकरण १४:६, ७ नुसार, ‘अंतराळाच्या मध्यभागी उडणारा देवदूत’ सर्वांना काय करण्यासाठी हाक देत आहे?

४ लाखो लोकांना अवेक! नियतकालिक वाचायला आवडते कारण त्यात, अतिशय आकर्षक पद्धतीने अनेक लौकिक विषय मांडलेले असतात. दर वर्षी स्मारकविधीला उपस्थित राहणारे बहुसंख्य लोक अवेक! नियतकालिकाचे नियमित वाचक आहेत, यात काही शंका नाही. तरीपण, “परमेश्‍वराच्या क्रोधदिनी” जो वाचू इच्छितो त्याने केवळ आपल्या प्रकाशनांचे नियमित वाचक असणे पुरेसे नाही; त्याला आणखी मदत देण्याची गरज आहे.—सफ. २:३; प्रकटी. १४:६, ७.

५. (क) जानेवारी २००६ च्या अवेक! नियतकालिकाच्या अंकापासून कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिला जाईल? (ख) यामुळे पुष्कळ लोक काय करण्यास प्रवृत्त होतील व याद्वारे कोणत्या भविष्यवाणीची पूर्णता होईल?

५ त्यामुळे, जानेवारी २००६ पासून अवेक! नियतकालिक देवाच्या राज्यावर अधिक भर देईल. ते आपल्या वाचकगणाला पूर्वीपेक्षा जास्त स्पष्टपणे, बायबलमधून आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यास सांगेल आणि सध्या होणाऱ्‍या घटनांचे बायबल काय स्पष्टीकरण देते त्यावर अधिक भर देईल. अशाप्रकारे, वाचकांना सध्या होणाऱ्‍या घटनांची अधिक स्पष्ट समज मिळेल आणि कदाचित, ते जे वाचतात त्यानुसार यहोवाविषयी आणखी शिकण्यास प्रवृत्त होतील.—सफ. ८:२३.

६, ७. (क) अवेक! नियतकालिक, लोकांना १ थेस्सलनीकाकर २:१३ वचन लागू करण्यास कसे मदत करील? (ख) इंग्रजीतील अवेक! नियतकालिक इथूनपुढे केव्हा प्रकाशित होईल आणि या बदलामुळे किती भाषांवर परिणाम होईल?

६ अर्थात, अवेक! नियतकालिकात सर्वसामान्य लोकांचे आवडीचे विषय येतच राहतील. परंतु, जास्त भर बायबलवर दिला जाईल. (१ थेस्सलनी. २:१३) टेहळणी बुरूज नियतकालिकात, बायबलची गहन माहिती आहे आणि अवेक! नियतकालिकसुद्धा इथूनपुढे बायबलवर आधारित अधिक माहिती सादर करणार असल्यामुळे, इंग्रजीतील अवेक! नियतकालिक महिन्यातून दोनदा प्रकाशित करण्याची गरज भासणार नाही. तेव्हा, जानेवारी २००६ या अंकापासून इंग्रजीतील अवेक! नियतकालिक, महिन्यातून एकदाच प्रकाशित होईल. यामुळे, आपल्या प्रकाशनांच्या तयारीचे, भाषांतराचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे काम बऱ्‍याच प्रमाणात सोपे होईल.

७ अवेक! नियतकालिक ज्या भाषांत प्रकाशित होत आहे त्या ४० टक्के भाषांवर या बदलाचा परिणाम होईल. बहुतेक भाषांत अवेक! नियतकालिक, महिन्याला किंवा त्रैमासिक म्हणून, म्हणजे वर्षातून चारदा प्रकाशित केले जात आहे. टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या बाबतीत काही बदल होणार नाही.

८. प्रचारक, अवेक! नियतकालिक टेहळणी बुरूज नियतकालिकाबरोबर कशाप्रकारे वापरू शकतात?

८ प्रचारक, दर महिन्याचे अवेक! त्याच महिन्याच्या कोणत्याही एका टेहळणी बुरूज नियतकालिकाबरोबर सादर करू शकतात. अवेक! नियतकालिक महिन्यातून दोनदा मिळत असल्यामुळे आता आपण पंधरवड्याला आपली सादरता बदलतो, परंतु अवेक! नियतकालिक महिन्यातून एकदाच प्रकाशित होऊ लागेल तेव्हा संपूर्ण महिनाभर आपल्याला आपली सादरता बदलावी लागणार नाही; आपण तीच सादरता संपूर्ण महिनाभर वापरू शकतो.

९. अवेक! नियतकालिक कोणती भूमिका बजावत राहील?

९ सन १९१९ पासूनच, गोल्डन एज, कन्सोलेशन आणि आता अवेक! असलेल्या नियतकालिकाचा, प्रचार कार्यात सिंहाचा वाटा राहिला आहे. सुधारित रुपातील या मासिकाच्या वितरणावर यहोवाचे आशीर्वाद राहोत; तसेच ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍या’ अधिकाधिक लोकांना एकमात्र आशा असलेल्या देवाच्या राज्याकडे वळण्यास हे मासिक लोकांना मदत करो, अशी देखील आम्ही प्रार्थना करतो.—प्रकटी. ७:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा