वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०५ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • उपशिर्षक
  • मार्च १४ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २१ ने सुरू होणारा सप्ताह
  • मार्च २८ ने सुरू होणारा सप्ताह
  • एप्रिल ४ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००५
km ३/०५ पृ. २

सेवा सभा आराखडा

मार्च १४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. एप्रिल ४ च्या सेवा सभेतील भागाची तयारी म्हणून सर्वांना दावीद—त्याने देवावर भरवसा ठेवला (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहण्याचे उत्तेजन द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून मार्च १ चा टेहळणी बुरूज अंक आणि जानेवारी-मार्च सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल. एका प्रात्यक्षिकात, मासिक मार्ग असलेल्या व्यक्‍तिला पुनर्भेट देत असल्याचे दाखवा.

२० मि: “बायबलवर अधिक भर!”a

१५ मि: आपली हिंमत वाढवण्यासाठी असलेली एक तरतूद. एक मिनिटापेक्षा कमी वेळेच्या प्रस्तावनेनंतर, श्रोत्यांबरोबर “नियमन मंडळाचे पत्र” या लेखाची चर्चा करा.

गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग ७.”b हा भाग तयार करताना, टेहळणी बुरूज जुलै १५, २००२, पृष्ठ २७, परिच्छेद ५-६ मधील मुद्दे पाहा.

२५ मि: “यहोवाच्या साक्षीदारांचे २००५ ‘देवाच्या आज्ञेत राहा’ प्रांतीय अधिवेशन.”c मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. दुसऱ्‍या परिच्छेदावर विचारविनिमय झाल्यानंतर, तुमच्या मंडळीला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास नेमण्यात आले आहे त्या अधिवेशनाच्या ठिकाणाविषयी व तारखेविषयी सांगा. चवथ्या परिच्छेदाची चर्चा करताना पृष्ठ ४ वरील चौकोनातील सर्व मुद्द्‌यांवर चर्चा करा. सर्वांना, होता होईल तितक्या लवकर अधिवेशनाच्या तयारीला लागण्याचे उत्तेजन द्या.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

मार्च २८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करा. प्रचारकांना मार्च महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पुढील आठवड्याच्या सेवा सभेची तयारी म्हणून सर्वांना, दावीद—त्याने देवावर भरवसा ठेवला (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहण्याची आठवण करून द्या. एप्रिल १० रोजी दिल्या जाणाऱ्‍या खास भाषणासाठी आस्थेवाईक लोकांना आमंत्रण देण्याचे उत्तेजन सर्वांना द्या. एप्रिल व मे महिन्याच्या साहित्य सादरतेविषयी सांगा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून एप्रिल १ चा टेहळणी बुरूज अंक आणि एप्रिल-जून सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, आपल्या जगव्याप्त कार्याला अर्थसाहाय्य कोठून मिळते ते सांगा.—पाहा टेहळणी बुरूज पृष्ठ २ किंवा सावध राहा! पृष्ठ ५.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “सेवाकार्य प्रशिक्षण प्रशाला—मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार.” भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. २००४ वार्षिकपुस्तक (इंग्रजी) याच्या पृष्ठे २३९-४० वरील विधानांचा समावेश करा. विभागीय संमेलनाच्या वेळी, सेवाकार्य प्रशिक्षण प्रशालेत आपले नाव दाखल करू इच्छिणाऱ्‍यांसाठी एक सभा होत असते, हे सांगा. जे पात्र आहेत त्यांना या सभेला उपस्थित राहण्याचे उत्तेजन द्या.

गीत क्र. १३ (१२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

एप्रिल ४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

५ मि: स्थानीय घोषणा.

१५ मि: एकमेकांवर प्रीती करा. (योहा. १३:३५) टेहळणी बुरूज फेब्रुवारी १, २००३, पृष्ठे १५-१८ वरील परिच्छेद १०-२१ वर आधारित वडिलांचे भाषण. एप्रिल व मे महिन्याच्या साहित्य सादरतेत उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला, ज्ञान पुस्तकाचा व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केलेल्यांबरोबर पुन्हा एकदा बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे उत्तेजन देण्यात येते. आध्यात्मिकरीत्या दुर्बळ असलेल्यांना साहाय्य करण्यास प्रचारक, वडिलांना कशाप्रकारे सहयोग देऊ शकतात, यावरही जोर द्या.

२५ मि: “सर्वकाळसाठी संदेश असलेला व्हिडिओ.” स्तोत्र ९१:२ आणि ३१:१४ वाचून प्रत्येक वचनावर अगदी संक्षिप्त टिपणी करा. त्यानंतर लगेच, दावीद व्हिडिओच्या कोड्याची श्रोत्यांबरोबर चर्चा करा. चर्चा करताना दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या परिच्छेदांतील प्रश्‍नांचा उपयोग करा. मग, कुटुंबांना विचारा, की डिव्हिडीमध्ये जो “अभ्यास उपक्रम” सुचवला आहे त्याचा उपयोग केल्यामुळे त्यांना कसा फायदा झाला आहे. समाप्तीस स्तोत्र ५६:११ वाचा.

गीत क्र. २३ (२००) व समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा