वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०५ पृ. ८
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • मासिक कार्यासाठी वेळ राखून ठेवा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • नियतकालिके राज्याची घोषणा करतात
    आमची राज्य सेवा—१९९८
  • द वॉचटावर व अवेक! यांचा चांगला उपयोग करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km २/०५ पृ. ८

तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा

१, २. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांचा लोकांच्या जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडला आहे?

१ “लक्षवेधक, समयोचित, उभारणीकारक.” “यासारखी प्रोत्साहनदायक नियतकालिके मी पूर्वी कधी वाचली नाहीत.” या उद्‌गारांवरून, संपूर्ण जगभरातील वाचकगणाला टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांविषयी काय वाटते ते आपल्याला कळते. होय, आपली नियतकालिके निश्‍चितच ‘सर्व माणसांपर्यंत’ सुवार्ता नेणारे अमूल्य साधन सिद्ध झाली आहेत.—१ तीम. २:४.

२ एका व्यापाऱ्‍याला एक सावध राहा! नियतकालिक मिळाले ज्याचा विषय त्याला आवडला होता. नंतर, त्याने सावध राहा! मासिकासोबतचा टेहळणी बुरूज अंकही वाचला ज्यामुळे तो, अनेक वर्षांपासून मानत असलेल्या त्रैक्याच्या शिकवणुकीचे परीक्षण करण्यास प्रवृत्त झाला. यामुळे त्याची सत्याबद्दलची आवड वाढू लागली. सहा महिन्यांनंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. आणखी एका मनुष्याला नियमितरीत्या ही मासिके मिळत होती, पण त्याने ती कधी वाचली नाहीत. आणि त्याची पत्नी, साक्षीदारांना टाळायची पण त्यांनी तिच्या नवऱ्‍याला दिलेली मासिके मात्र वाचून काढायची. परादीस पृथ्वीवर धार्मिक लोक वस्ती करतील, हे बायबलमध्ये दिलेले अभिवचन तिला भावले. कालांतराने, ती, तिचा मुलगा, तिची बहीण हे सर्व यहोवाचे सेवक झाले.

३. जोडीने मासिके सादर करण्याचा काय फायदा आहे?

३ जोडीने सादर करा: वरील उदाहरणे दाखवतात, की आपली मासिके कोण वाचतील किंवा कोणता लेख त्यांच्या अंतःकरणास भिडेल हे आपण सांगू शकत नाही. (उप. ११:६) यास्तव, आपण सहसा घरमालकास एकच मासिक सादर करत असलो तरी, देताना मात्र आपण टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही मासिके जोडीने देणे फायदेकारक ठरेल. काही परिस्थितीत, आपल्या नियतकालिकांचे वेगवेगळे अंक सादर करणे उचित ठरू शकते.

४. मासिक कार्याची आपण कशाप्रकारे योजना करू शकतो?

४ आठवड्यातला एक दिवस नियतकालिक दिन कार्यात भाग घेण्यासाठी ठरवणे चांगले आहे. २००५ यहोवाच्या साक्षीदारांचे कॅलेंडर यावर, प्रत्येक शनिवार “नियतकालिक दिन” ठरवण्यात आलेला आहे. अर्थात, स्थानीय आणि व्यक्‍तिगत परिस्थिती यांत फरक असल्यामुळे काही जण, फक्‍त मासिके सादर करण्यासाठी दुसरा एखादा दिवस नेमतील. नियतकालिक दिन कार्याला तुमच्या आठवड्याच्या आराखड्यात स्थान आहे का?

५. कोणकोणत्या प्रसंगी आपण मासिके सादर करण्याच्या बाबतीत जागृत राहू शकतो आणि असे करण्यासाठी काय आपली मदत करेल?

५ व्यक्‍तिगत ध्येय ठेवा: महिन्याला आपण किती मासिके देणार हे व्यक्‍तिगत ध्येय ठेवल्यास जास्तीतजास्त मासिकांचा वाटप करण्यावर आपले लक्ष केंद्रित राहील. तुमचा मासिक मार्ग आहे का? सेवेत भेटणाऱ्‍या लोकांना तुम्ही मासिके सादर करता का? रस्त्यावर, व्यापार क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य करत असताना तुम्ही मासिके देऊ शकाल का? प्रवास करताना, बाजारहाट करताना, तुम्हाला कोणाला भेटायचे असते तेव्हा तुम्ही सोबत मासिके नेता का? टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांतून इतरांना लाभ घेण्यास मदत करण्याकरता मिळेल त्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या.

६. जुन्या मासिकांचा आपण चांगला उपयोग कसा करू शकतो?

६ आपण कदाचित आपल्याजवळ असलेले जुने अंक सादर करण्याचे ध्येय ठेवू शकतो. एक किंवा दोन महिन्यांची मासिके आपण सादर करू शकलो नाही तरी त्यातील माहितीचे मूल्य कमी होत नाही. आस्थेवाईक लोकांना ती द्या. कोट्यवधी लोकांसाठी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिके “समयोचित भाषण” ठरली आहेत. (नीति. २५:११) तेव्हा, आपण त्यांचा उपयोग करू या जेणेकरून आणखी लाखोंना यहोवाची ओळख होण्यास व त्याची सेवा करावयास मदत मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा