ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
फेब्रुवारी २८, २००५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जानेवारी ३ ते फेब्रुवारी २८, २००५ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. आपण आपले भाषण दुसऱ्यांना समजेल इतके सोपे कसे करू शकतो? [be पृ. २२६ परि. १-पृ. २२७ परि. १]
२. कोणत्या प्रकारच्या शब्दांचे अधिक स्पष्टीकरण द्यावे लागेल? [be पृ. २२७ परि. २-पृ. २२८ परि. १]
३. श्रोत्यांना खरोखरच माहिती मिळेल अशाप्रकारे भाषण सादर करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? [be पृ. २३१ परि. १-३]
४. परिचयाच्या एखाद्या वचनाचे वाचन आपण श्रोत्यांसाठी माहितीपूर्ण कसे करू शकतो? [be पृ. २३१ परि. ४-५]
५. एखाद्या परिचित बायबल अहवालाच्या सविस्तर माहितीवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे श्रोत्यांना उत्तेजन दिल्याने काय परिणाम होऊ शकतो? [be पृ. २३२ परि. २-४]
नेमणूक क्र. १
६. लोकांना, ‘देवाचे भय धरून त्याच्या आज्ञा पाळण्याचे’ शिकवण्यात काय काय गोवलेले आहे? (उप. १२:१३) [be पृ. २७२ परि. ३-पृ. २७३ परि. १]
७. आपण केवळ यहोवा या नावाकडेच नव्हे तर त्या नावामागच्या व्यक्तीकडे लोकांचे लक्ष आकर्षित कसे करू शकतो? (योए. २:३२) [be पृ. २७४ परि. ३-५]
८. येशूविषयीचे ज्ञान घेऊन त्याची साक्ष देणे किती महत्त्वाचे आहे? (योहा. १७:३) [be पृ. २७६ परि. १]
९. देवाबरोबर स्वीकृत नातेसंबंध असणे व बायबलविषयीची अचूक समज असणे याचा, येशूच्या भूमिकेविषयी आपल्याला असलेल्या समजेशी थेट संबंध कसा आहे? [be पृ. २७६ परि. २]
१०. येशू ख्रिस्त राजा आहे असा आपण खरोखर विश्वास करतो हे आपण कसे दाखवू शकतो? [be पृ. २७७ परि. ४]
साप्ताहिक बायबल वाचन
११. अब्राहामाचा पिता तेरह मूर्तिपूजक होता का? (यहो. २४:२)
१२. यहोवाने गिदोनाला दिलेली नेमणूक पार पाडण्याचे धैर्य त्याच्याजवळ नव्हते का? तुम्ही असे उत्तर का देता? (शास्ते ६:२५-२७)
१३. गिदोन एफ्राईमी कुळाविषयी जे बोलला त्यातून आपण काय शिकू शकतो? (शास्ते ८:१-३)
१४. आदरातिथ्य दाखवण्यास तयार नसलेल्या गिब्याच्या लोकांच्या मनोवृत्तीवरून काय दिसून येत होते? (शास्ते १९:१४, १५)
१५. ‘ज्याला जसे बरे दिसे तसे तो करीत’ असल्यामुळे अराजकता माजली का? (शास्ते २१:२५)