यहोवाच्या प्रेमळ-दयेबद्दल त्याचे आभार माना
ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा केला जाईल
१. यहोवाने आपल्याला प्रेमळ-दया कशी दाखवली आहे?
१ स्तोत्रकर्त्याने असे उद्गार काढले: “परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.” (स्तो. १०७:८) देवाची प्रेमळ-दया म्हणजे मनुष्यांबद्दल त्याला असलेली केवळ कोमल काळजी नव्हे. ही गोष्ट, “हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला” या स्तुतीरूपी ईश्वरप्रेरित अभिव्यक्तीवरून समजते. (स्तो. ९४:१८) यहोवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला आपल्यासाठी देऊन सर्वात श्रेष्ठ प्रेमळ-दया दाखवली.—१ योहा. ४:९, १०.
२. आपण यहोवाला आपले आभार कसे व्यक्त करू शकतो?
२ ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी जवळ येत आहे, तेव्हा “दयामय” अर्थात प्रेमळ-दयेचा देव यहोवा याचे आपण आभार कसे व्यक्त करू शकतो? (स्तो. ५९:१७) येशूच्या पृथ्वीवरील शेवटल्या दिवसांमध्ये झालेल्या घटनांवर मनन करण्याकरता आपल्यातील प्रत्येक जण वेळ काढू शकतो. (स्तो. १४३:५) स्मारकविधीच्या काळादरम्यान शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००५ यात योजिलेले खास बायबल वाचन केल्याने आणि शक्य असेल तर सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातल्या ११२-१६ अध्यायांवर आणि इतर बायबल आधारित प्रकाशनांचे आणखी वाचन व संशोधन केल्याने देखील आपल्याला फायदा होऊ शकेल. वाचलेल्या गोष्टीं आपल्या मनात घोळू द्या, त्यांत पूर्ण रमून जा. (१ तीम. ४:१५) देवाच्या वचनावर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आपल्या हृदयाला पोषण मिळतेच शिवाय यहोवाबद्दल आपल्याला असलेले प्रेमही व्यक्त होते.—मत्त. २२:३७.
३, ४. (क) आपण आपल्या लायबेरियन बांधवांच्या मनोवृत्तीचे अनुकरण कसे करू शकतो? (ख) स्मारकविधीसाठी तुम्ही कोणाला आमंत्रण देऊ इच्छिता?
३ इतरांना देवाचे आभार व्यक्त करण्यास प्रोत्साहित करा: गेल्या वर्षी, संपूर्ण जगभरात स्मारकविधीसाठी १,६७,६०,६०७ जण उपस्थित होते. लायबेरियामधील एका शहरातील बांधवांनी शहर प्रमुखाला एक पत्र लिहून कळवले, की गावात प्रभूच्या सांज भोजनाचा विधी साजरा करण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा प्रमुखाने स्थानीय फूटबॉल मैदान, स्मारकविधी साजरा करण्यासाठी दिले आणि गावात स्मारकविधी विषयीची घोषणा करवून लोकांना हजर राहण्याचे आमंत्रणही दिले. गावात तेव्हा फक्त पाच प्रचारक होते पण स्मारकविधीसाठी ६३६ जण उपस्थित होते!
४ तसेच, आपणही स्मारकविधीसाठी होता होईल तितक्या लोकांना उपस्थित राहण्यासाठी मदत करू इच्छितो. तुम्ही कोणाकोणाला आमंत्रण देणार आहात, याची यादी बनवली आहे का? आपल्या मासिकाच्या शेवटल्या पानावरील चित्र हे आमंत्रण देते. छापील आमंत्रण पत्रिका देखील तुम्ही वापरू शकता. स्मारकविधी कोठे होणार आहे तो पत्ता आणि वेळ पत्रिकेवर एकतर टाईप करा किंवा सुवाच्य अक्षरांमध्ये लिहा आणि आमंत्रित प्रत्येक व्यक्तिला एक पत्रिका द्या. मार्च २४ तारीख जसजशी जवळ येते तसतसे तुम्ही ज्यांना आमंत्रण दिले आहे त्यांना पुन्हा एकदा आठवण करून द्या व जाण्याची काय व्यवस्था केली आहे ते सांगा.
५. बायबल विद्यार्थ्यांना आपण स्मारकविधीला उपस्थित राहण्याचे उत्तेजन कसे देऊ शकतो?
५ उपस्थित राहण्यासाठी व स्मारकविधीपासून जास्तीतजास्त फायदा मिळवून घेण्याकरता सभांना अद्याप येत नसलेल्या बायबल विद्यार्थ्यांना आपण मदत कशी करू शकतो? प्रत्येक अभ्यासाच्यावेळी काही मिनिटांसाठी स्मारकविधीचे महत्त्व समजावून सांगा. टेहळणी बुरूज मार्च १५, २००४, पृष्ठे ३-७ आणि युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या २६६-९ पृष्ठांवर याबाबत सुरेख माहिती दिली आहे.
६. स्मारकविधीसाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे महत्त्वपूर्ण का आहे?
६ पाहुण्यांचे स्वागत करा: स्मारकविधीच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना जाऊन भेटा, त्यांचे स्वागत करा. (रोम. १२:१३) तुम्ही ज्यांना आमंत्रण दिले आहे त्यांच्याबरोबर बसा आणि त्यांच्याजवळ बायबल, गीत पुस्तक असल्याची खात्री करा. निष्क्रिय बंधूभगिनींचे स्वागत करण्यात आपण पुढाकार घेतला पाहिजे कारण त्यांनी स्मारकविधीला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याविषयी आपण अशी प्रेमळ आवड बाळगली तर ते पुन्हा मंडळीशी नियमित सहवास राखण्यास प्रवृत्त होतील. (लूक १५:३-७) या अतिपवित्र प्रसंगी, आपण इतरांनाही, यहोवाने दाखवलेल्या ‘आश्चर्यकारक प्रेमदयेबद्दल’ आपल्याबरोबर त्याचे आभार मानण्याचे प्रोत्साहन देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू या.—स्तो. ३१:२१, पं.र.भा.