सेवा सभा आराखडा
फेब्रुवारी १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून फेब्रुवारी १५ चा टेहळणी बुरूज अंक आणि जानेवारी-मार्च सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. स्थानीय क्षेत्राच्या गरजांनुरुप नमुना सादरतांचा उपयोग कसा करता येईल त्याची संक्षिप्त उजळणी करा.—पाहा आमची राज्य सेवा जानेवारी २००५ अंक, पृष्ठ ८.
३५ मि: “स्मारकविधीचा काळ—सेवा कार्यात अधिक सहभाग घेण्याचा काळ.”a सेवा पर्यवेक्षकांनी हा भाग हाताळावा. परिच्छेद ६ वर चर्चा करताना सावध राहा! सप्टेंबर ८, २००४, पृष्ठे १२-१३ वरील टिपणींचा समावेश करा. साहाय्यक पायनियरींग करणाऱ्यांची नावे सांगा. क्षेत्र सेवेच्या जादा सभांच्या आयोजनाविषयी सांगा. या स्मारकविधी काळांत सर्वांना या नाही तर त्या मार्गाने क्षेत्र सेवेत आपला सहभाग वाढवण्याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २० (९३)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ६ वरील “पुन्हा साक्ष मिळण्यासाठी त्यांना मदत करा,” असे शीर्षक असलेल्या चौकोनातील मुख्य मुद्द्यांची उजळणी करा. गरज उद्भवते तेव्हा त्वरित कृपया पुनःभेट द्या (S-43) हा फॉर्म भरण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
२० मि: “यहोवाच्या प्रेमळ-दयेबद्दल त्याचे आभार माना.”b स्मारकविधीची वेळ आणि ठिकाण तसेच वक्त्याचे नाव आणि इतर संबंधित माहितीची घोषणा करा. परिच्छेद ४ वर चर्चा करताना, एका प्रात्यक्षिकात एक प्रचारक, मासिक मार्गातील व्यक्तीला स्मारकविधीसाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देत असल्याचे दाखवा. छापील आमंत्रण मंडळीत सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आलेली नसतील तर ती पुढच्या सभेत करावीत.
१५ मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे—भाग ६.”c चार मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवा; यात एक बायबल विद्यार्थी असे विचारतो, स्मारकविधीसाठी उपस्थित असलेल्यांपैकी भाकर व द्राक्षारस इतके कमी लोक का घेतात. संचालक विद्यार्थ्याने प्रश्न विचारल्याबद्दल प्रशंसा करतो, प्रश्न लिहून घेतो आणि म्हणतो, की आठवड्याचा अभ्यास संपल्यानंतर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहू या. अभ्यास संपल्यानंतर, संचालक विद्यार्थ्याचे लक्ष, युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे २६७-८ वर, “भाकर आणि द्राक्षारस कोणी घेतले पाहिजे?” या प्रश्नाखालील माहितीकडे वेधतो. ते ती माहिती एकत्र वाचतात, आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचे किती स्पष्ट उत्तर आपल्याला मिळाले याबद्दल विद्यार्थी आभार व्यक्त करतो.
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. प्रचारकांना फेब्रुवारी महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा (तुमच्या क्षेत्रात लागू होत असतील तर) उपयोग करून फेब्रुवारी १५ चा टेहळणी बुरूज अंक आणि जानेवारी-मार्च सावध राहा! अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचा देखील उपयोग करता येईल. एका प्रात्यक्षिकानंतर, प्रचारक घरमालकाला स्मारकविधीचे आमंत्रण देत आहे असे दाखवा.
१५ मि: दुर्बळांबद्दल काळजी दाखवा. (प्रे. कृत्ये २०:३५) एक मिनिटांच्या प्रस्तावनेनंतर, टेहळणी बुरूज जुलै १, २००४, पृष्ठे १७-१८, परिच्छेद १२-१६ वर, टेहळणी बुरूज अभ्यासाप्रमाणे प्रश्न आणि उत्तराने चर्चा करा. अस्खलित वाचन करणाऱ्या बांधवाला परिच्छेदांचे वाचन करायला सांगा. येणारा स्मारकविधी व खास भाषण यांच्या संबंधाने ही माहिती कशी लागू करता येईल त्यावर खास लक्ष केंद्रित करा.
२० मि: दुसरी भाषा बोलणाऱ्यांना कशी मदत करायची. सर्व राष्ट्रांच्या लोकांसाठी सुवार्ता पुस्तिकेच्या प्रस्तावनेवर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. या नव्या पुस्तिकेतील वैशिष्ठ्ये दाखवा. आपल्याला कळत नसणारी भाषा बोलणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आपण कोणती तीन पावले उचलू शकतो, याची चर्चा करा. आमची राज्य सेवा याच्या जुलै २००३ अंकाच्या पृष्ठ ८ वरील टिपणींचा समावेश करा. कृपया पुनःभेट द्या (S-43) हा फॉर्म सहसा, परकीय भाषा बोलणाऱ्या व्यक्तीने राज्य संदेशात आस्था दाखवलेली नसली तरीसुद्धा भरला पाहिजे, हे सांगा. या नव्या पुस्तिकेचा उपयोग कसा करता येईल त्याचे एक प्रात्यक्षिकही दाखवा.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
मार्च ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१० मि: स्थानीय घोषणा. “स्मारकविधीकरता सूचना” या चौकोनातील काही मुख्य मुद्द्यांची उजळणी करा.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: “तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा.”d परिच्छेद ३ व ४ वर चर्चा करताना, त्यातील माहिती स्थानीयरीत्या लागू करा. व्यापार क्षेत्रात, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा अनौपचारिक साक्ष देताना मासिके सादर करण्यात पटाईत असलेल्या एक किंवा दोन प्रचारकांची संक्षिप्त मुलाखत घ्या. वर सांगितलेल्या परिस्थितीत ते मासिके कशाप्रकारे सादर करतात ते त्यांना विचारा. एका संक्षिप्त प्रात्यक्षिकात, एखाद्या अनुभवाचे किंवा सादरतेचे नाट्य रुपांतर करून दाखवा.
गीत क्र. २१ (१९२) व समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.