मासिके कशी सादर कराल?
टेहळणी बुरूज जाने. १५
“आपल्याला व आपल्या मुलाबाळांना आनंदी जीवन लाभावे असे सर्वांनाच वाटते, नाही का? पण हे मिळवणे अशक्य आहे असे काहींना वाटते. तुम्हाला काय वाटते, आपण आपल्या भविष्यावर नियंत्रण करू शकतो का? [उत्तरासाठी थांबा.] या मासिकात बायबलमधून हे स्पष्ट करण्यात आले आहे की आपल्यापैकी कोणीही असहाय्य नसून आपण आज जे निर्णय घेतो त्यांवर आपले भविष्य अवलंबून आहे.” अनुवाद ३०:१९ वाचा.
सावध राहा! जाने.-मार्च
“आजच्या स्पर्धात्मक जगात, मुलांना परीक्षेत नापास होण्याची अवास्तव भीती वाटते. अपयशाला तोंड देण्यास मुलांना कशामुळे मदत मिळू शकेल असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐकून घ्या व नीतिसूत्रे १२:२५ वाचा.] मुलांना अपयशाला तोंड देऊन जीवनात पुढे वाटचाल कशी करता येईल याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.”
टेहळणी बुरूज फेब्रु. १
“आज जगात असंख्य लोकांना अत्याचार व हिंसक हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. हे पाहून मन अस्वस्थ होत नाही का? [अलीकडचे एखादे उदाहरण सांगून, घरमालकाला प्रतिक्रिया व्यक्त करू द्या.] या मासिकात सांगितले आहे की देव मनुष्याच्या जीवनाला कसे लेखतो. तसेच, तो सध्या दिसणाऱ्या दुःखद परिस्थितीतून कशाप्रकारे आपली सुटका करेल हेही यात सांगितले आहे.” स्तोत्र ७२:१२-१४ वाचा.
सावध राहा! जाने.-मार्च
“दृष्टी ही देवाने मनुष्याला दिलेली एक अद्भूत देणगी आहे. पण ‘ग्लॉकोमा’ नावाच्या एका विकृतीमुळे बरेचजण आपली दृष्टी कायमची गमावून बसू शकतात. या विकृतीचा वेळीच तपास करून कोणती पावले उचलता येतील आणि ज्यांना ही विकृती झाली आहे त्यांनी काय करावे याविषयी या लेखात चर्चा करण्यात आली आहे.”