वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/०५ पृ. १
  • ‘विश्‍वासाच्या वचनांनी पोषण’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘विश्‍वासाच्या वचनांनी पोषण’
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज”
    आमची राज्य सेवा—१९९८
  • तरुणांनो, सभांचा पुरेपूर फायदा करून घ्या
    आमची राज्य सेवा—२०००
  • आध्यात्मिकरीत्या तुम्ही योग्य प्रकारे सेवन करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “तो थकलेल्याला शक्‍ती देतो”
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km १/०५ पृ. १

‘विश्‍वासाच्या वचनांनी पोषण’

१ जीवनात सुभक्‍ती आचरण्यासाठी कठीण परिश्रमांची गरज आहे. (१ तीम. ४:७-१०) या मार्गात आपल्या स्वतःच्या शक्‍तीने चालण्याचा प्रयत्न केल्यास, आपण लवकरच थकून जाऊ किंवा अडखळून पडू. (यश. ४०:२९-३१) याकरता यहोवाचे सामर्थ्य मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे ‘विश्‍वासाच्या वचनांनी पोषण करून घेणे.’—१ तीम. ४:६.

२ पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न: यहोवा आपल्या वचनाच्या आणि ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाच्या’ माध्यमाने आपल्याला पौष्टिक आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. (मत्त. २४:४५) या अन्‍नापासून पोषण मिळवण्याकरता आपण आपल्या वतीने पुरसे प्रयत्न करत आहोत का? आपण दररोज बायबल वाचतो का? वैयक्‍तिक अभ्यास व मनन याकरता आपण ठराविक वेळ वेगळा ठेवला आहे का? (स्तो. १:२, ३) अशाप्रकारच्या आरोग्यदायी आध्यात्मिक आहारामुळे आपल्याला चैतन्य मिळते आणि सैतानाच्या जगातील आध्यात्मिकरित्या अशक्‍त करणाऱ्‍या गोष्टींपासून आपले संरक्षण होते. (१ योहा. ५:१९) आपण सतत चांगले विचार आत्मसात करत राहिलो व त्यांनुसार जीवनात आचरण केले तर यहोवा सदोदीत आपल्या पाठीशी राहील.—फिलिप्पै. ४:८, ९.

३ मंडळीच्या सभांच्या माध्यमानेही यहोवा आपल्याला बळ देतो. (इब्री १०:२४, २५) या सभांतून मिळणारे आध्यात्मिक शिक्षण व उभारणीकारक सहवास आपल्याला जीवनातील परीक्षांना खंबीरतेने तोंड देण्यास समर्थ करतो. (१ पेत्र ५:९, १०) एका ख्रिस्ती मुलीने म्हटले: “सबंध दिवस शाळेत घालवल्यावर मी पार खचून जाते. पण आपल्या सभा मला वाळवंटातील मरुवनासारख्या वाटतात. सभांना आल्यावर मला पुढचा दिवस पुन्हा शाळेत घालवण्याकरता नवचैतन्य मिळते.” सभांना उपस्थित राहण्याकरता आपण जे काही प्रयत्न करतो त्यांच्या मोबदल्यात आपल्याला निश्‍चितच अनेक आशीर्वाद लाभतात!

४ सत्याची घोषणा करणे: इतरांना प्रचार करणे हे येशूकरता अन्‍नासारखे होते. या कार्यामुळे त्याला उत्साह येत असे. (योहा. ४:३२-३४) त्याचप्रकारे आपणही जेव्हा देवाच्या अद्‌भूत प्रतिज्ञांविषयी लोकांशी बोलतो तेव्हा आपल्याला एक नवा उत्साह मिळतो. सेवाकार्यात अधिकाधिक सहभाग घेतल्यामुळे आपण आपले मन व अंतःकरण सतत देवाच्या राज्यावर व लवकरच मिळणार असलेल्या आशीर्वादांवर एकाग्र ठेवू शकतो. यामुळे खऱ्‍या अर्थाने आपल्याला तजेला मिळतो.—मत्त. ११:२८-३०.

५ यहोवा आज आपल्या लोकांकरता पुरवत असलेल्या समृद्ध आध्यात्मिक पोषणापासून आपण लाभ मिळवू शकतो ही आपल्याकरता किती बहुमानाची गोष्ट आहे! तेव्हा आपण सदैव आनंदाने त्याचे स्तवन करत राहू या.—यश. ६५:१३, १४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा