वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९८ पृ. १
  • “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज”
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • ‘विश्‍वासाच्या वचनांनी पोषण’
    आमची राज्य सेवा—२००५
  • तुमच्या आध्यात्मिक गरजा भागविणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • यहोवाच्या मार्गदर्शनाचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?
    आमची राज्य सेवा—२०००
  • आमच्या व्यक्‍तीगत परिश्रमांना अनुसरून कापणी करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km ६/९८ पृ. १

“प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज”

१ आज यहोवाच्या लोकांना मुबलक आध्यात्मिक मिष्टान्‍न मिळत असल्यामुळे ते आशीर्वादित आहेत. (यश. २५:६) वैयक्‍तिक आणि कौटुंबिक अभ्यास, तसेच मंडळीच्या सभा, संमेलने व अधिवेशने या सर्व माध्यमांतून भरघोस आध्यात्मिक साहित्याचा आस्वाद घेता येतो. परंतु, “प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होण्याच्या हेतूने या सर्वांचा आपण पुरेपूर लाभ घेत आहोत का?—२ तीम. ३:१७.

२ सन १९९८ साठी तयार केलेल्या व आतापर्यंत निम्म्या संपुष्टात आलेल्या आध्यात्मिक आहाराचाच जरा विचार करा! मंडळीच्या सभांमार्फत आपण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या २३ पुस्तकांचे काही ठळक मुद्दे हाताळत आहोत, टेहळणी बुरूज नियतकालिकातील मुख्य अभ्यास लेखांखेरीज इतर लेखांत आढळणाऱ्‍या बायबल ज्ञानाच्या व ख्रिस्ती गुणांच्या २२ निरनिराळ्या पैलूंवरील माहितीची उजळणी करत आहोत; तसेच क्षेत्र सेवेत आपल्याला उपयुक्‍त ठरणारे ४८ चर्चेचे विषय विचारात घेत आहोत. याशिवाय, आपण ज्ञान व कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकांतील प्रत्येक परिच्छेद विचारात घेऊन या दोन्ही पुस्तकांची संपूर्ण उजळणी करत आहोत. या व्यतिरिक्‍त, आमची राज्य सेवा याच्या १२ अंकांद्वारे, टेहळणी बुरूजच्या ५२ अभ्यास लेखांद्वारे आणि विविध बायबल विषयांवरील जवळजवळ तितक्याच जाहीर भाषणांद्वारे आपले पोषण होत आहे. आणि या सर्वांना जोड आहे ती पोषक अधिवेशन व संमेलन कार्यक्रमांची. किती विपुलतेत, उत्तम आध्यात्मिक गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध केल्या जात आहेत!

३ यहोवाच्या तरतुदींची कदर बाळगा: यांचा सर्वार्थाने लाभ घेण्यासाठी, यहोवा इतक्या विपुल प्रमाणात आध्यात्मिक भोजन का पुरवत आहे याची जाण आपल्याला असली पाहिजे. या उत्तम गोष्टींद्वारे आपले पोषण केल्याने आपला विश्‍वास मजबूत होतो व यहोवासोबतचा आपला नातेसंबंधही दृढ होतो. (१ तीम. ४:६) तथापि, केवळ आपल्याच बोधासाठी आध्यात्मिक भोजन पुरवले जाते असे नाही. इतरांनाही सत्य सांगण्यास ते आपल्याला उत्तेजित करते व सुवार्तेचे सेवक या नात्याने असे करण्यात प्रभावी बनण्यास ते आपल्याला सज्ज करते.—२ तीम. ४:५.

४ आपल्या आध्यात्मिक गरजांकडे दुर्लक्ष न करता यहोवाच्या मेजावरील समृद्ध व आध्यात्मिकरित्या तृप्त करणाऱ्‍या अन्‍नसामग्रींसाठी आपण नेहमी लालसा विकसित करावी. (मत्त. ५:३; १ पेत्र २:२) पुरेपूर लाभ उठवण्याकरता नियमित वैयक्‍तिक व कौटुंबिक बायबल अभ्यास तसेच सभांची उपस्थिती या महत्त्वपूर्ण गोष्टींकरता पुरेसा वेळ काढण्याची आवश्‍यकता आहे. (इफिस. ५:१५, १६) असे केल्यामुळे मिळणारे अनेक आनंदी प्रतिफळ, पौलाने विश्‍वासू हिब्रू ख्रिश्‍चनांना उद्देशून इब्री लोकांस १३:२०, २१ येथे नमूद केलेल्या ईश्‍वरप्रेरित उत्तेजनाच्या सामंजस्यात असतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा