रक्त वर्ज्य करण्यास आपल्याला साहाय्य करणारी नवीन तरतूद
नियमन मंडळाने, स्थायी मुखत्यारनामा (डिपीए) दस्तऐवजातील मुख्य मुद्दे आणि आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्तता कार्ड, या दोन्हींचे मिळून एकच दस्तऐवज बनवण्याची अनुमती दिली आहे; याला आपण डिपीए कार्ड असे संबोधणार आहोत.
डिपीए कार्ड असीमित काळासाठी विधीग्राह्य आहे व तुम्ही जगातल्या कोणत्याही ठिकाणी गेला तरी, ते तुमच्या इच्छांचे निवेदन असेल. भविष्यात, जर तुम्हाला (१) तुमच्या डिपीए कार्डात काही बदल करावे लागणार असतील, जसे की तुम्हाला तुमच्या इच्छेत, आरोग्य-सेवा, पत्ता, टेलिफोन नंबर याबाबत काही बदल करायचे असतील, किंवा (२) तुमचे डिपीए कार्ड हरवले असेल किंवा नष्ट झाले असेल तर तुम्ही नवीन डिपीए कार्ड बनवू शकता.
डिपीए कार्ड मिळाल्यावर तुम्ही त्यावर प्रार्थनापूर्वक विचार केला पाहिजे आणि ते घरी, काळजीपूर्वक भरले पाहिजे. परंतु, या कार्डावर सही करण्याआधी, सर्व कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, कार्डावर असे लिहिले असेल, की दोन साक्षीदारांसमोर तुम्ही सही केली पाहिजे, तर सही करताना दोन साक्षीदार हजर असणे आवश्यक आहे. पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी वेळोवेळी, ज्यांनी नवीन कार्ड भरले नाहीत त्यांना, काही मदत हवी आहे का, याची चौकशी करावी.
डिपीए कार्डाची घडी घालण्याआधी, तुमच्या डॉक्टरांना देण्यासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी उत्तम प्रतीच्या झेरॉक्स कॉपी काढा. तुम्हाला कुटुंबातील इतर सदस्यांना व मंडळीच्या सचिवांना देखील झेरॉक्स कॉपी द्यायची इच्छा असेल. (8 1/2ʺ x 11ʺ) या सर्वसाधारण आकाराच्या पानाच्या अगदी मध्यभागी डिपीए कार्डाचे झेरॉक्स काढले पाहिजे; एका पानावर एकच झेरॉक्स प्रत काढा. आणि डिपीए कार्डाची झेरॉक्स प्रत नव्हे तर मूळ प्रत तुम्ही स्वतःजवळ बाळगली पाहिजे.
साक्षीदार पालकांच्या बाप्तिस्मा न घेतलेल्या मुलांसाठी, ३/९९ अशी छापील तारीख असलेल्या ओळख पत्रात काही बदल नाहीत. प्रत्येक अज्ञान बालकाकडे, व्यवस्थितरीत्या भरलेले व सही केलेले कार्ड आहे व उचित वेळी ते त्याच्याजवळ असेल, याची खात्री पालकांनी करावी.
बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक, स्वतःच्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्य सेवांबद्दलच्या सूचनांसाठी, डिपीए कार्डातील आणि ओळख पत्रातील मुद्दे स्वतःहून एका कागदावर लिहून काढू शकतात. सचिवांनी नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्या सर्व प्रचारकांना वर्षादरम्यान, एक डिपीए कार्ड द्यावे.