वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०४ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km १२/०४ पृ. ७

घोषणा

◼ साहित्य सादरता डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य सादर करावे. किंवा, पर्यायी सादरता म्हणून बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करा. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्‍या कागदावर छापलेले अथवा १९९० सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. ज्या मंडळ्यांकडे अशा पुस्तकांचा साठा नाही त्यांनी मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तके सादर करावीत. फेब्रुवारी: यहोवाजवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. ज्या मंडळ्यांकडे हे प्रकाशन नाही ते निर्मिती (इंग्रजी) (मोठ्या अथवा लहान आकाराचे) पुस्तक किंवा प्रकटीकरणचा कळस पुस्तक पर्यायी सादरता म्हणून वापरू शकतात. मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक सादर करून गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.

◼ २००६ सालचा स्मारकविधी, बुधवार एप्रिल १२, रोजी सूर्यास्तानंतर साजरा केला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. ही आगाऊ सूचना देण्याचा उद्देश असा की एकच राज्य सभागृह अनेक मंडळ्या वापरत असल्यामुळे स्मारक विधीकरता इतर सभागृह भाड्याने घेणे आवश्‍यक असल्यास, बांधवांना सभागृहांकरता आधीपासूनच आवश्‍यक तरतुदी किंवा बुकींग करता येईल. स्मारक विधी शांतीने आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा म्हणून भाड्याने घेतलेल्या सभागृहाच्या इमारतीत त्या दिवशी इतर कोणत्या कार्यक्रमामुळे गडबड किंवा गोंधळ होऊ नये, याविषयी वडिलांनी सभागृहाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्‍यांना आधीच सांगावे. ही सभा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे याप्रसंगी भाषण कोण देणार हे ठरवताना वडील वर्गाने दर वर्षी आलटून पालटून भाषण देण्यापेक्षा किंवा दर वर्षी एकाच बांधवाने भाषण देण्यापेक्षा उत्तम वक्‍त्‌याची निवड करावी. अभिषिक्‍तांपैकी एक अनुभवी बांधव भाषण देण्याकरता उपलब्ध असल्यास त्यांची निवड केली जावी.

◼ २००५ सालच्या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत, चर्चेसाठी बायबल विषय या सुधारित पुस्तकेवर आधारित विद्यार्थ्यांची भाषणे होतील. ही पुस्तिका सध्या उपलब्ध आहे आणि मंडळ्या आपल्या मागण्या शाखा दफ्तराला पाठवू शकतात.

◼ उपलब्ध असलेली नवीन प्रकाशने:

वॉचटावर पब्लिकेशन इंडेक्स २००३ —इंग्रजी

बायबल कथांचं माझं पुस्तक (लहान आकाराचे) —इंग्रजी, मल्याळम

यहोवाचे गुणगान करा (२९ गीतांचे) —गुजराती

शांतीदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५) —खासी

मृत प्रिय जनांसाठी काय आशा आहे? (पत्रिका क्र. १६) —खासी

कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा (पत्रिका क्र. २१) —खासी

तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? (पत्रिका क्र. २६) —कोंकणी (रोमन), खासी

◼ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:

मानवजातीने केलेला देवाचा शोध —इंग्रजी

बायबल कथांचं माझं पुस्तक (लहान आकाराचे) —तेलगू

बायबल कथांचं माझं पुस्तक (मोठ्या आकाराचे) —तमिळ

आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करेल? —नेपाळी

जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? —हिंदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा