वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०४ पृ. ३
  • प्रश्‍नपेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍नपेटी
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • नम्र असणं गरजेचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आपण सर्व प्रसंगांत नम्रता दाखवू शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • नवीन नेमणुकीमुळे होणाऱ्‍या बदलांशी जुळवून घेणं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ११/०४ पृ. ३

प्रश्‍नपेटी

◼ मंडळीत नेमलेली कामे आपण कशी केली पाहिजेत?

यहोवाच्या लोकांच्या मंडळीतील सुरळीत चाललेले काम हे बांधवांनी एकत्र मिळून केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. (१ करिंथ. १४:३३, ४०) मंडळीतील केवळ एका सभेत काय काय गोवलेले आहे त्याचा विचार करा. कार्यक्रमाव्यतिरिक्‍त, सभेच्या आधी आणि नंतर बंधूभगिनींना किती वेगवेगळी कामे करावी लागतात. इतरांना दिसत नाहीत अशी कामेही महत्त्वाची आहेत. या व्यवस्थेला प्रत्येकजण हातभार कसा लावू शकतो?

हातभार लावण्याकरता पुढे या. स्वेच्छेचा आत्मा दाखवणारे पुष्कळ काही करू शकतात. (स्तो. ११०:३) आजारी व वृद्ध बंधूभगिनींची काळजी घ्या. राज्य सभागृह स्वच्छतेत भाग घ्या. कोणी आपल्याला खास विनंती न करताही आपण पुष्कळ लाभदायक कार्ये करू शकतो. आपल्याला फक्‍त मदत करण्याची इच्छा असली पाहिजे.

नम्रतेने सेवा करा. नम्र लोकांना इतरांची सेवा करण्यात आनंद वाटतो. (लूक ९:४८) आपण नम्र असलो, तर आपण, आपल्याला झेपेल इतक्याच जबाबदाऱ्‍या हाती घेऊ. शिवाय, नम्रपणामुळे आपण, आपल्याला असलेल्या अधिकाराची मर्यादा ओलांडण्याचे टाळू.—नीति. ११:२.

विश्‍वासू असा. प्राचीन इस्राएलमध्ये मोशेला, जबाबदार पदांसाठी ‘विश्‍वासू . . . पुरुषांची’ निवड करण्यास सांगण्यात आले होते. (निर्ग. १८:२१) आजही याच गुणाची आवश्‍यकता आहे. तुम्हाला मिळणारी प्रत्येक नेमणूक जाणीवपूर्वकतेने पार पाडा. (लूक १६:१०) तुम्हाला एखादी नेमणूक पार पाडता येणार नसेल तर तुमच्या अनुपस्थितीत ती पार पाडू शकेल अशा कोणाची तरी व्यवस्था करायला विसरू नका.

तुमचे जे सर्वात उत्तम आहे ते द्या. ख्रिश्‍चनांना उपासनेव्यतिरिक्‍त असलेल्या इतर बाबतीतही पूर्ण मनाने काम करण्यास आर्जवण्यात आले आहे. (कलस्सै. ३:२२-२४) तेव्हा, खऱ्‍या उपासनेला बढावा देणारे कार्य आपण किती मन लावून केले पाहिजे बरे! तुम्हाला सांगितलेले एखादे काम कमी दर्जाचे किंवा क्षुल्लक वाटत असले तरी, ते मन लावून केले जाते तेव्हा मंडळीसाठी एक वरदान ठरते.

आपल्याला मिळणाऱ्‍या प्रत्येक नेमणुकीद्वारे, यहोवाबद्दल आणि आपल्या बांधवांबद्दल प्रेम व्यक्‍त करण्याची आपल्याला संधी मिळते. (मत्त. २२:३७-३९) तेव्हा, आपल्याला मिळणारे कोणतेही काम आपण विश्‍वासूपणे करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा