घोषणा
◼ साहित्य सादरता नोव्हेंबर: समाधानी जीवन माहितीपत्रक. हे तुमच्या भाषेत उपलब्ध नसल्यास, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य सादर करावे. किंवा, पर्यायी सादरता म्हणून बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करा. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९० सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. ज्या मंडळ्यांकडे अशा पुस्तकांचा साठा नाही त्यांनी मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य ही पुस्तके सादर करावीत.
◼ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. जमाखर्च अहवाल तयार झाल्यावर, पुढील जमाखर्च अहवाल वाचला जाईल तेव्हा याची घोषणा करावी.
◼ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराला राखून ठेवावी लागते. तेव्हा, यात केव्हाही काही बदल असतील तर मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून, सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्यक आहे.
◼ नोव्हेंबर १२-१४, २००४ या तारखांदरम्यान पुण्यात होणाऱ्या प्रांतीय अधिवेशनात, कर्णबधिरांसाठी संकेत भाषा सत्र भरवण्याची व्यवस्था केली जात आहे.
◼ डिसेंबर २४-२६, २००४ रोजी मदुरै येथे भरवल्या जाणाऱ्या अधिवेशन ठिकाणाच्या पत्त्यात बदल करण्यात आला आहे कृपया याची नोंद घ्या: Devasagayam Higher Matriculation School Grounds, Pasumalai, Madurai 625 004.
◼ नोव्हेंबर १२-१४, २००४ रोजी पोर्ट ब्लेअर येथे भरवल्या जाणाऱ्या अधिवेशन ठिकाणाच्या पत्त्यात बदल करण्यात आला आहे कृपया याची नोंद घ्या: Andaman Tamizhar Sangam, Phoenix Bay, Port Blair.
◼ पुन्हा उपलब्ध झालेली प्रकाशने:
तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे —इंग्रजी, नेपाळी
रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?—मल्याळम, तमिळ
जीवनाचा काय उद्देश आहे? तो तुम्हाला कसा शोधता येईल? —गुजराती, पंजाबी
चर्चेसाठी बायबल विषय (सुधारित)—बंगाली, तेलगू
परादीसकडे नेणारा मार्ग कसा शोधावा (इस्लाम धर्मियांसाठी)—उर्दू
यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्वास आहे? (पत्रिका क्र. १४)—आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, कोंकणी (कन्नड), कोंकणी (रोमन), गुजराती, तमिळ, तेलगू, नेपाळी, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मिझो, सिंधी, हिंदी.