समाधानी जीवन कसे मिळवता येईल?—माहितीपत्रक कसे सादर कराल
◼ “समाधानी जीवनासाठी एक विश्वसनीय मार्गदर्शक पुस्तक असायला हवे, असे पुष्कळ लोकांना वाटते. तुम्हालाही असेच वाटते का? (उत्तर ऐका.) आनंदाची गोष्ट म्हणजे, विश्वसनीय व परिणामकारक ठरलेले मार्गदर्शन देणारे असे पुस्तक उपलब्ध आहे. या मार्गदर्शक पुस्तकातूनच मी तुम्हाला काहीतरी वाचून दाखवू इच्छितो. (स्तोत्र ३२:८ वाचा.) तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात तरी, अशाप्रकारच्या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडणार नाही का?” माहितीपत्रकातील तिसऱ्या अध्यायाचे शीर्षक वाचून हे माहितीपत्रक सादर करा.
◼ “आजकाल लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या पुष्कळ आरोग्याच्या समस्यांचे एक मूळ कारण तणाव आहे, हे तुम्ही मान्य करता का? (उत्तरासाठी थांबा.) सकारात्मक मनोवृत्ती बाळगून आपण तणाव कमी करू शकतो, यासंबंधीचा हा सल्ला पाहा. (नीतिसूत्रे १२:२५ वाचा.) हे माहितीपत्रक समाधानी जीवनासाठी उत्तम सूचना देते.” अध्याय २ मधील चित्रे व चित्रांखालील माहिती वाचून दाखवा.
◼ “लोक सहसा असा विचार करतात, की स्वर्गात गेल्यावरच त्यांना समाधानी जीवनाचा आनंद लुटता येईल. पण असे जीवन जर पृथ्वीवरच जगणे शक्य झाले तर तुम्हाला ते आवडेल का? (उत्तर ऐका.) बायबल अशी हमी देते, की पृथ्वीवर समाधानी जीवन जगणे शक्य आहे व हे आपल्याला कसे साध्य करता येईल तेही बायबल दाखवते. (यशया ६५:१७ आणि योहान १७:३ वाचा.) अशा जीवनाचा आनंद लुटण्याकरता तुम्हाला काय करण्याची गरज आहे, हे या माहितीपत्रकात सांगितले आहे.” पृष्ठ ३१ वरील चित्राचे वर्णन करा.
◼ “आजकाल लोन मिळणं खूप सोपं झालं आहे आणि यामुळे पुष्कळ कुटुंबे कर्जात बुडत चालली आहे. हो ना? (उत्तर ऐका.) या सुज्ञ सल्ल्याकडे लक्ष द्या. (१ तीमथ्य ६:७-९ वाचा.) पैसा काटकसरीने कसा वापरायचा व पैशाच्या समस्या कशा सोडवायच्या याबाबत या माहितीपत्रकात ईश्वरप्रेरित सल्ला आहे.” पृष्ठ ६ वरील ६ व्या परिच्छेदातील काही मुद्दे सांगा.