खास संमेलन दिवस उजळणी
२००५ सेवा वर्षाच्या खास संमेलन दिवस कार्यक्रमाची पूर्वझलक देण्याकरता व त्याची उजळणी करण्याकरता या माहितीचा उपयोग केला जाईल. या पुरवणीच्या पान ४ वरील, “संमेलन कार्यक्रमांची उजळणी करण्यासाठी नवीन व्यवस्था” या लेखात ही उजळणी कशी घेता येईल ते सांगितले आहे. उजळणीच्या वेळी, सर्व प्रश्ने विचारता येतील अशाप्रकारे वेळेची विभागणी करा. सादर केलेली माहिती आपण कशी लागू करू शकतो यावर उजळणी केंद्रित असली पाहिजे.
सकाळचा कार्यक्रम
१. यहोवाचे ऐकण्याची आज सर्वाधिक गरज का आहे? ऐकण्याचा काय अर्थ होतो? (“यहोवाची वाणी का ऐकावी”)
२. कुटुंबे, आध्यात्मिक कार्यांचा उत्तम कार्यक्रम कसे ठेवू शकतात? (“विचलित न होता देवाच्या वचनाकडे लक्ष देणारी कुटुंबे”)
३. विभागातील बंधूभगिनींनी, अनौपचारिक साक्ष देण्याच्या संधींचा फायदा कसा घेतला आहे? (“सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा”)
४. इब्री लोकांस या पुस्तकाच्या ३ व ४ अध्यायातील इशारेवजा उदाहरणांतून आपण कोणते धडे शिकू शकतो? आज यहोवा आपल्याबरोबर कोणत्या माध्यमाद्वारे बोलत आहे? (“देव जे बोलतो त्याकडे लक्ष दिल्याने आपले संरक्षण होते”)
५. बाप्तिस्म्याच्या भाषणातून तुम्हाला कशाप्रकारे फायदा झाला? (“समर्पण व बाप्तिस्मा”)
दुपारचा कार्यक्रम
६. येशूच्या किशोरावस्थेपासून आपण काय शिकू शकतो आणि विभागातील तरुण त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करत आहेत? (“देवाच्या वचनाकडे लक्षपूर्वक ऐकल्याने आपले तरुण मजबूत होतात”)
७. पालक कोणकोणत्या मार्गांद्वारे, लहान बाळांना व मुलांना यहोवाच्या मार्गाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात करू शकतात? (“देवाचे ऐकणारे व शिकणारे चिमुकले”)
८. कोणत्या विशिष्ट बाबतीत आपण, यहोवा, येशू आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाच्या’ बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे? (मत्त. २४:४५) असे करणे का महत्त्वाचे आहे? (“ईश्वरी सूचनांकडे सतत लक्ष द्या”)