सेवा सभा आराखडा
सूचना: अधिवेशन होणाऱ्या महिन्यांत दर आठवड्यासाठी, आमची राज्य सेवा यात एका सेवा सभेचा आराखडा दिला जाईल. “देवाबरोबर चाला” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता मंडळ्या आवश्यक ते फेरबदल करू शकतात. उचित असल्यास, अधिवेशनाला जायच्या शेवटल्या आठवड्यातील सेवा सभेतील शेवटल्या १५ मिनिटांसाठी या महिन्याच्या पुरवणीतील स्थानीयरीत्या लागू होणाऱ्या मुद्देसूद सल्ल्याची उजळणी करावी. इतरांसाठी जागा राखून ठेवण्याविषयी दिलेल्या मार्गदर्शनवावर जोर द्या. फेब्रुवारी महिन्यात, एका संपूर्ण सेवा सभेत अधिवेशन कार्यक्रमांच्या मुख्य भागांची उजळणी केली जाईल. याची तयारी करण्यासाठी, आपण सर्वांनी अधिवेशनांत अर्थपूर्ण मुद्दे नोंदावेत तसेच, आपल्या जीवनात आणि आपल्या क्षेत्र सेवेत आपण लागू करू इच्छिणाऱ्या विशिष्ट मुद्द्यांची देखील नोंद घ्यावी. मग, अधिवेशनाला उपस्थित राहिल्यापासून आपण त्या सूचनांचा अवलंब कसा करत आलो आहोत ते सांगून आपण इतरांना उत्तेजन देऊ शकतो.
ऑगस्ट ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१० मि: स्थानीय घोषणा व आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वर सुचवलेल्या सादरता तुमच्या मंडळीच्या क्षेत्राकरता समर्पक असल्यास, जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (नियतकालिक सादरतेच्या रकान्यातील पहिले) व ऑगस्ट १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा. इतर सादरता देखील तुम्ही वापरू शकता. दान देण्याच्या व्यवस्थेविषयी उल्लेख करा. पुढच्या आठवडी सेवा सभेला येताना अपेक्षा माहितीपत्रक आणण्याची सर्वांना आठवण करून द्या.
१५ मि: “धीर धरणाऱ्यास प्रतिफळ मिळेल.”a डिसेंबर १५, २००० टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे २२-३, परिच्छेद १५-१८ यातून संक्षिप्त विवेचनांचा समावेश करावा.
२० मि: “सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या.”b मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करावा. मंडळीला कोणत्या अधिवेशनाला जाण्यास नेमण्यात आले आहे याचा उल्लेख करावा. आइझोल आणि दुलियाजान येथे कार्यक्रमाची सुरवात सकाळी ८.३० वाजता होईल. बाकीच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळा कोणत्या असतील हे एप्रिल २००४ आमची राज्य सेवा यातील पुरवणीत दिले आहे. त्या पुरवणीतून आवश्यकतेनुसार इतर मुद्द्यांकडेही लक्ष वेधावे. शेवटी, पुढील आठवड्याच्या सेवा सभेत जो “योग्य वेळी आध्यात्मिक अन्न” या शीर्षकाचा लेख विचारात घेतला जाणार आहे त्याविषयी दोन तीन प्रश्न उपस्थित करावेत.
गीत क्र. १२ (११३) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
८ मि: स्थानीय घोषणा.
१७ मि: “योग्य वेळी आध्यात्मिक अन्न.”c पुरवलेल्या प्रश्नांचा उपयोग करावा. दुसऱ्या परिच्छेदावर चर्चा करताना, श्रोत्यांपैकी एखाद दोघांना एखाद्या संस्मरणीय अधिवेशनाला उपस्थित राहिल्याचा अनुभव थोडक्यात सांगण्यास विनंती करा. शेवटी, पुढच्या आठवडी “सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा” या शीर्षकाचा जो लेख विचारात घेतला जाईल त्यातून दोन तीन प्रश्न उपस्थित करावेत.
२० मि: “प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे”—भाग २.d पाच मिनिटांचे एक प्रात्यक्षिक दाखवावे. यात प्रचारक एका वडिलाला प्रश्न विचारतो की बायबल विद्यार्थ्याला प्रगती करण्यास कशी मदत करावी. वडील एका सर्वसामान्य समस्येविषयी सांगतात, ती म्हणजे अभ्यासादरम्यान क्षुल्लक मुद्द्यांवर किंवा अतिरिक्त मुद्द्यांवर चर्चा करण्यात खूप वेळ खर्च करणे. अपेक्षा माहितीपत्रकातील पाठ ९ उदाहरणादाखल घेऊन वडील प्रचारकाला दाखवतात की तो कशाप्रकारे (१) साहित्यातील मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो, (२) उल्लेखित शास्त्रवचनांचा प्रभावीपणे उपयोग करू शकतो आणि (३) विद्यार्थ्याच्या गरजांनुरूप साहित्य जुळवून घेऊ शकतो. प्रत्येक वेळी अभ्यास घेण्याआधी चांगली तयारी करण्याची किती गरज आहे याविषयी ते उल्लेख करतात.
गीत क्र. ११ (८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ९ (३७)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. जुलै-सप्टेंबरचा सावध राहा! (नियतकालिक सादरतांच्या रकान्यातील तिसरे) व सप्टेंबर १ चा टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा याचे प्रात्यक्षित दाखवा. एका प्रात्यक्षिकात शाळेतील शिक्षकाला साक्ष देत असल्याचे दाखवा.
१५ मि: सप्टेंबर महिन्यात समाधानदायक जीवन हे माहितीपत्रक सादर करणे. भाषण व प्रात्यक्षिक. ज्यांना देवाकडून प्रेरित असलेल्या पुस्तकाची संकल्पना पटत नाही अशांसोबत बायबल अभ्यास सुरू करण्याच्या उद्देशाने हे माहितीपत्रक तयार करण्यात आले होते. माहितीपत्रकातील विषयांचा सारांश द्या आणि स्थानिक क्षेत्रात लोकांना आवडतील अशा काही मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करा. एका साध्या सादरतेविषयी सांगा, ज्यात युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातून किंवा आमची राज्य सेवा यातील प्रस्तावना, एक शास्त्रवचन आणि समाधान माहितीपत्रकातील एखादा मुद्दा अथवा अध्याय वापरला जातो. अनुभवी प्रचारकाकडून हे प्रात्यक्षिक करवून घ्यावे.
१८ मि: “सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा.”e पुरवलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. अधिवेशनात पाहायला मिळणाऱ्या उत्तम आचरणामुळे कशाप्रकारे यहोवाचे गौरव होते याविषयी वैयक्तिक विवेचन देण्याची विनंती करा. शेवटी, पुढच्या आठवडी सेवा सभेत “सुशील, वाखाणण्याजोगा पेहराव” या शीर्षकाचा लेख विचारात घेतला जाणार आहे त्याविषयी दोन तीन प्रश्न उपस्थित करा.
गीत क्र. २९ (२२२) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ७ (५१)
८ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना त्यांचा ऑगस्ट क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्या.
१७ मि: तुम्हाला फायदा झाला आहे का? श्रोत्यांबरोबर चर्चा. आमची राज्य सेवा यात मागील सेवा वर्षादरम्यान आलेल्या खालील सूचनांची उजळणी करा: लहानशा कागदावर तुम्ही निवडलेली प्रस्तावना लिहून घ्या. (km-MR १०/०३ पान ८) विशिष्ट गोष्टीबद्दल, व्यक्तिगत व प्रामाणिक प्रशंसा करा. (km-MR ११/०३ पान १) लोक घरी असण्याची जास्त शक्यता असते त्यावेळी प्रचार करा. (km-MR १२/०३ पान १) बायबल वाचन, सभांची तयारी आणि क्षेत्र सेवेकरता निश्चित वेळा ठरवून घ्या. (km-MR १/०४ पान ४) वैयक्तिक अभ्यास व बायबल वाचन करताना “उत्तम देश” (इंग्रजी) माहितीपत्रकाचा वापर करा. (km-MR ३/०४ पान २) संपूर्ण बायबल वाचण्याचे ध्येय ठेवा. (km-MR ४/०४ पान १) व्यापार क्षेत्रात साक्षकार्य करा. (km-MR ७/०४ पान ४) या सूचनांचा अवलंब केल्यामुळे मिळालेल्या फायद्यांविषयी सांगण्याचे श्रोत्यांना निवेदन करा.
२० मि: “सुशील, वाखाणण्याजोगा पेहराव.”f पुरवलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. वेळ परवानगी देईल त्यानुसार उल्लेखलेली शास्त्रवचने वाचा व त्यांवर चर्चा करा.
गीत क्र. १३ (१२४) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
५ मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: स्थानीय गरजा.
२५ मि: “पायनियर मनोवृत्ती दाखवा.”g थोडक्यात एक किंवा दोन पायनियरांची मुलाखत घ्या. त्यांना कशाप्रकारे त्यांच्या पालकांच्या उदाहरणामुळे किंवा मंडळीतल्या वडिलांच्या किंवा इतरांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण वेळेच्या सेवेत उतरण्याची प्रेरणा मिळाली याविषयी सांगण्यास विनंती करा.
गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
f एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
g एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.