सेवा सभा आराखडा
जून १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून (तुमच्या क्षेत्रात लागू होत असल्यास) जून १५ चे टेहळणी बुरूज आणि एप्रिल-जूनचे सावध राहा! कसे सादर करता येऊ शकेल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. एका प्रात्यक्षिकात, प्रचारक व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करत आहे असे दाखवा. इतर व्यावहारिक सादरतांचे देखील प्रात्यक्षिक दाखवता येऊ शकेल.
२० मि: “यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना मदत करतो.”a चवथ्या परिच्छेदाची चर्चा करताना, आमची राज्य सेवा, मे २०००, पृष्ठ ३, परिच्छेद ४, ५ आणि सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ ६७ वरील परिच्छेद २ मधील मुद्द्यांचा समावेश करा.
१५ मि: मादक पदार्थ्यांचा गैरवापर करणे का टाळले पाहिजे? युक्तीवाद पुस्तकाची पृष्ठे १०६-९ वरील माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा करा. मादक पदार्थांचा “मनोरंजन” म्हणून वापर करणे सर्वसामान्य झाले आहे. पुष्कळांचे असे म्हणणे आहे, की मादक पदार्थ्यांचा वापर केल्याने हानी होत नाही; काही लोक तर त्यांचे समर्थनही करतात. अशा लोकांबरोबर आपण तर्क कसा करू शकतो यावर चर्चा करा. सावध राहा! (इंग्रजी) नोव्हेंबर ८, १९९९, पृष्ठ १० वरील चौकोनातील मुद्द्यांचा समावेश करा.
गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १८ (१६२)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: “देवदूत आपल्याला मदत करतात.”b वेळ असल्यास, उल्लेखित शास्त्रवचनांवर टिपणी देण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.
२० मि: वरून येणारे ज्ञान समजूत होण्याजोगे आहे. (याको. ३:१७) सेवा प्रशाला (इंग्रजी) पृष्ठे २५१-२ वरील माहितीच्या आधारावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. समजूतदार असण्याचा काय अर्थ होतो? आपल्या सेवेत हा गुण दाखवणे महत्त्वाचे का आहे? प्रेषित पौलाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? प्रचारक, स्थानीय क्षेत्रातील लोकांच्या पार्श्वभूमीचा कशाप्रकारे विचार करू शकतात? आपण बायबल विद्यार्थ्यांना समजूतदारपणा दाखवण्यास कशाप्रकारे मदत करू शकतो? समजूतदारपणा दाखवून लोकांशी बोलल्याने कोणते फायदे होतात हे दाखवण्यासाठी एक किंवा दोन अनुभवांची आधीच व्यवस्था करा.
गीत क्र. ८ (५३) आणि समाप्तीची प्रार्थना.
जून २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १६ (१४३)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. सर्व प्रचारकांना जून महिन्याचा सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. पृष्ठ ४ वरील सूचनांचा उपयोग करून (तुमच्या क्षेत्रात लागू होत असल्यास) जुलै १ चे टेहळणी बुरूज आणि एप्रिल-जूनचे सावध राहा! कसे सादर करता येऊ शकेल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, प्रचारकाला सुरवातीला मैत्रीपूर्ण विधान करण्यास सांगा. असे केल्याने परक्या व्यक्तीला पाहून घरमालकाच्या मनावर आलेले दडपण नाहीसे होऊ शकेल, हे सांगा.
१५ मि: स्थानीय गरजा.
१८ मि: “मंडळीचा पुस्तक अभ्यास—आपल्याला त्याची गरज का आहे.”c दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००२ अंकातील पृष्ठ १ वरील “तुमच्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना साहाय्य करणे,” या लेखातील मुद्द्यांचा समावेश करा.
गीत क्र. ७ (५१) आणि समाप्तीची प्रार्थना.
जुलै ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १२ (११३)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: तुम्ही काय म्हणाल? भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. जुलै व ऑगस्ट महिन्यात आपण माहितीपत्रके सादर करणार आहोत. प्रचारकांना स्थानीय क्षेत्रात कोणती माहितीपत्रके प्रभावी वाटली आहेत? आमची राज्य सेवा जुलै १९९८, पृष्ठ ८ वरील किंवा मागील एखाद्या अंकात सुचवलेल्या सादरतांची उजळणी करा. प्रत्येक सादरतेत, (१) एक प्रश्न, (२) एक शास्त्रवचन आणि (३) प्रकाशनातील चर्चा करण्याजोगा एखादा मुद्दा असण्यावर जोर द्या. एक अथवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. सुवार्ता सादर करताना बायबलचा उपयोग करण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
२० मि: मुलांना पालकांकडून काय हवे असते. थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) या पुस्तकाच्या पृष्ठे ६-७ वरील माहितीच्या आधारावर भाषण. मुलांनी, खऱ्या उपासनेच्या संबंधाने असलेली बायबल तत्त्वे शिकणे व प्रशिक्षणाच्या प्रक्रियेतील पालकांची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी दिलेल्या सूचनांची चर्चा करा. पालकांना, त्यांनी या अभ्यासाच्या साधनाचा कशाप्रकारे उपयोग केला आहे ते सांगण्यास आमंत्रित करा. एक अथवा दोन मुलांना हे सांगण्यास आमंत्रित करा, की त्यांना हे प्रकाशन का आवडते.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.