घोषणा
◼ साहित्य सादरता जून: थोर शिक्षकापासून शिका. (इंग्रजी) आपल्याला मुले नाहीत असे घरमालक म्हणतात तेव्हा त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. या माहितीपत्रकाचा उपयोग करताना, गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करा. जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२ पानी माहितीपत्रक: देव खरोखर आपली काळजी करतो का? भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!, “पहा! मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, सर्वकाळ टिकणारे ईश्वरी नाव (इंग्रजी), नंदनवन आणविणारे सरकार, मृत्यूच्या वेळी काय होते? (इंग्रजी), जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल?, तुमची प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी). सप्टेंबर: तुमची काळजी वाहणारा निर्माणकर्ता आहे का? (इंग्रजी) पर्यायी सादरता म्हणून, जीवन—कसे आले? उत्क्रांतीने की उत्पत्तीने? (इंग्रजी) सादर करता येईल.
◼ राज्य सभागृहाच्या सुरक्षेसाठी, सर्वात शेवटी सभागृह सोडणाऱ्या व्यक्तीने दाराला कुलूप लावले आहे की नाही याची व इतर सुरक्षा यंत्रणांची खात्री केली पाहिजे. वरीलपैकी एखादी गोष्ट तिला करता आली नाही तर तिने ती करू शकणाऱ्या व्यक्तीला बोलवावे आणि ती व्यक्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तेथून जाऊ नये. सर्व वडिलांजवळ, राज्य सभागृहाच्या चाव्या ज्यांना देण्यात आल्या आहेत त्या जबाबदार प्रचारकांच्या नावांची अद्ययावत यादी असली पाहिजे.
◼ यहोवाच्या अधिकाराचा आदर करा (इंग्रजी) या व्हिडिओवरील चर्चेची रूपरेषा सप्टेंबर महिन्याच्या आमची राज्य सेवा याच्या अंकात दिली जाईल. आपल्या लायब्ररीसाठी ज्या मंडळ्यांकडे अद्याप या व्हिडिओची एक प्रत नाही त्या मंडळ्या आपल्या पुढील साहित्य मागणीच्या वेळी या व्हिडिओची एक प्रत मागवू शकतात.
◼ एमपी ३ वर कंपॅक्ट डिस्क उपलब्ध:
किंगडम मेलडीज, संच १-९—एक सीडी
सिंग प्रेजेस टू जेहोवा (२२५ गीतांसाठी पियानोचे संगीत)—एक सीडी
सिंगींग किंगडम साँग्स—एक सीडी
वर सांगितलेले आयटम्स, स्पेशल रिक्वेस्ट आयटम्स आहेत व मंडळ्या त्यांच्या प्रचारकांच्या वापरासाठी हव्या तितक्याच आयटम्सची मागणी करू शकतात. हे जनतेसाठी उपलब्ध नाही. कृपया याची नोंद घ्यावी, की एमपी ३ सीडी सर्वच सीडी प्लेअरवर चालणार नाही. यास्तव, आम्ही सर्व सचिवांना अशी विनंती करत आहोत की त्यांनी, जे या सीडींची मागणी करतात त्यांच्याजवळ एमपी ३ सीडी चालवू शकणारा सीडी प्लेअर आहे की नाही याची खात्री करावी.
◼ व्हीसीडीवर बायबल व्हिडिओ उपलब्ध:
युनायटेड बाय डिव्हाईन टिचिंग
यंग पिपल आस्क—हाऊ कॅन आय मेक रिअल फ्रेन्ड्स?
नो ब्लड—मेडिसीन मीट्स द चॅलेंज
वरील व्हीसीडी सध्या तरी केवळ मंडळीच्या वापरासाठी, त्यांच्या लायब्ररीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यास्तव, ऑर्डर पाठवताना, कृपया तुमच्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म यावरील “काँग्री. यूज” या रकान्यातच ऑर्डर पाठवली आहे का हे तपासून पाहावे.