वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०४ पृ. १
  • देवदूत आपल्याला मदत करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवदूत आपल्याला मदत करतात
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत—मानवांवर प्रभाव कसा पाडतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ६/०४ पृ. १

देवदूत आपल्याला मदत करतात

१ “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” येशूचे हे शब्द, “तुम्ही जाऊन . . . लोकांस शिष्य करा” या त्याच्या आज्ञेचे पालन करणाऱ्‍यांसाठी किती सांत्वन देणारे आहेत! (मत्त. २८:१८-२०) एका महत्त्वपूर्ण मार्गाने, अर्थात देवदूतांद्वारे येशू खऱ्‍या ख्रिश्‍चनांबरोबर असतो. (मत्त. १३:३६-४३) या विश्‍वासू आत्मिक प्राण्यांसोबत ‘सार्वकालिक सुवार्तेचा’ प्रचार करणे किती रोमांचकारी आहे!—प्रकटी. १४:६, ७.

२ आपल्या सेवेत: बायबल असे प्रकट करते, की “ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी [देवदूतांना] पाठविलेले” आहे. (इब्री १:१४) पहिल्या शतकात, योग्य लोकांना शोधण्यास येशूच्या अनुयायांना देवदूत मार्गदर्शित करत. (प्रे. कृत्ये ८:२६) आज देवाच्या सेवकांना देवदूतांच्या मार्गदर्शनाचा पुरावा पाहायला मिळतो. पुष्कळ प्रसंगी, घरमालकांनी असे म्हटले आहे, की ते प्रार्थना करत असताना एखादा यहोवाचा साक्षीदार त्यांच्या घरी आला होता. असे लोक जेव्हा राज्य संदेशाला प्रतिसाद देतात तेव्हा देवदूतांबरोबर आपल्याला देखील किती आनंद होतो!—लूक १५:१०.

३ विरोधाचा सामना करणे: कठीण परीक्षांचा सामना केलेल्या दानीएल आणि त्याच्या तीन तरुण सोबत्यांनी, प्रेषित पेत्राने व इतर अनेकांनी “बलसंपन्‍न” देवदूतांद्वारे यहोवाच्या संरक्षणाचा अनुभव घेतला. (स्तो. १०३:२०; दानी. ३:२८; ६:२१, २२; प्रे. कृत्ये १२:११) कधीकधी आपल्याला विरोधाच्या वेळी असाहाय्य वाटत असले तरी, अलीशाच्या सेवकाचा अनुभव ऐकून आपल्यालाही प्रोत्साहन मिळू शकते. “त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत” असे त्याला सांगण्यात आले होते. (२ राजे ६:१५-१७) आपल्या ख्रिस्ती बांधवांपासून आपल्याला जबरदस्तीने वेगळे करण्यात आले तरी आपण निरुत्साहित होऊ नये. देवाचे वचन आपल्याला असे आश्‍वासन देते: “परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो.”—स्तो. ३४:७.

४ लवकरच देवदूतांचे सैन्य ख्रिस्ताच्या शासनाचा विरोध करणाऱ्‍या सर्वांना काढून टाकेल. (प्रकटी. १९:११, १४, १५) त्या दिवसाची वाट पाहत असताना, आपण धैर्याने यहोवाची स्तुती करीत राहू या आणि असे करत असताना, ख्रिस्ताच्या अधिकाराखाली असलेल्या स्वर्गीय सैन्यांच्या शक्‍तिशाली पाठिंब्याची पूर्ण खात्री बाळगू या.—१ पेत्र ३:२२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा