वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०४ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००४
आमची राज्य सेवा—२००४
km २/०४ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

फेब्रुवारी २३, २००४ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जानेवारी ५ ते फेब्रुवारी २३, २००४ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. सादर केल्या जाणाऱ्‍या माहितीचा अवलंब केल्यावर फायदे मिळतात हे आपल्या श्रोत्यांना स्पष्टपणे सांगण्यासाठी व त्या माहितीचा त्यांना लाभ होण्यासाठी काय केले जाऊ शकते? [be पृ. १५८ परि. २-४]

२. भाषण देताना आपण शब्द विचारपूर्वक का निवडले पाहिजेत? [be पृ. १६० परि. १ व दुसरी पेटी]

३. चांगल्या भाषेसाठी कोणता मूलभूत नियम १ करिंथकर १४:९ येथे ठळकपणे सांगण्यात आलेला आहे, आणि शिकवताना आपण या तत्त्वाचे अवलंबन कसे करू शकतो? [be पृ. १६१ परि. १-४]

४. मत्तय ५:३-१२ आणि मार्क १०:१७-२१ नुसार, येशूची शिकवण्याची कोणती उल्लेखनीय पद्धत आहे जिचे आपण अनुकरण करू शकतो? [be पृ. १६२ परि. ४]

५. सेवेमध्ये किंवा मंडळीच्या सभांमध्ये उत्तर देताना, आपण उत्साह, भावना, जिवंतपणा व्यक्‍त करणाऱ्‍या शब्दांचा उपयोग करण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? (मत्त. २३:३७, ३८) [be पृ. १६३ परि. ३-पृ. १६४ परि. १]

नेमणूक क्र. १

६. भाषणाचा विषय म्हणजे नेमके काय आणि भाषणासाठी माहिती गोळा करून ती क्रमवार मांडताना तो विषय लक्षात ठेवल्यामुळे भाषण प्रभावी कसे ठरू शकेल? [be पृ. ३९ परि. ६-पृ. ४० परि. १]

७. (अ) आध्यात्मिक अर्थाने शुद्ध राहण्याचा काय अर्थ होतो आणि आध्यात्मिक शुद्धता सर्व प्रकारच्या शुद्धतांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण का समजली जाते? (ब) जगात सर्वसामान्य असलेली नैतिक अशुद्धता ख्रिस्ती कशाप्रकारे टाळू शकतात? [w०२-MR २/१ पृ. ५-६]

८. बायबलमधील तत्त्वांपैकी सर्वात प्रमुख तत्त्वे कोणती आहेत? [w०२-MR २/१५ पृ. ५ परि. १, ४, ६]

९. सहानुभूती म्हणजे काय आणि येशूने हा गुण कशाप्रकारे प्रदर्शित केला? [w०२-MR ४/१५ पृ. २५ परि. ४-५]

१०. नीतिसूत्रे ११:११ यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांना कसे काय लागू होते? [w०२-MR ५/१५ पृ. २७ परि. १-३]

साप्ताहिक बायबल वाचन

११. उत्पत्ति २:९ मध्ये उल्लेख करण्यात आलेले “जीवनाचे झाड” कशाला चित्रित करते?

१२. लोटाच्या बायकोने तिचा जीव का गमावला? (उत्प. १९:२६) [w९०-MR १२/१ पृ. २० परि. १०]

१३. उत्पत्ति अध्याय २४ मधील भविष्यसूचक नाटकात (अ) अब्राहाम, (ब) इसहाक, (क) अब्राहामचा सेवक एलियाजर, (ड) दहा उंट, आणि (इ) रिबका कोणा कोणाला चित्रित करतात?

१४. देवाने याकोब आणि एसावाचे भविष्य आधीच ठरवले होते का? (उत्प. २५:२३)

१५. मनापासून प्रयत्न करणाऱ्‍यांवर यहोवाचा आशीर्वाद असतो याबाबतीत राहेल एक उत्तम उदाहरण कशी होती? (उत्पत्ति ३०:१-८) [w०२-MR ८/१ पृष्ठे २९-३०]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा