मासिके कशी सादर कराल?
सावध राहा! जाने.-मार्च
“आपल्यातील बहुतेक जण, मधुमेह असलेल्या व्यक्तींना ओळखतात. या आजाराविषयी तुम्हाला माहिती आहे का? [नियतकालिकाचे मुखपृष्ठ दाखवा आणि उत्तर ऐका.] या नियतकालिकात, मधुमेहाच्या कारणांविषयी आणि उपचाराविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व आजारांवरील कायमच्या तोडग्याविषयी बायबलमध्ये दिलेले अभिवचन सांगितले आहे.” यशया ३३:२४ वाचून संभाषण समाप्त करा.
टेहळणी बुरूज जाने.१५
“आजकाल, दिलेले वचन पूर्ण न करणे ही सर्वसामान्य गोष्ट झाली असल्यामुळे कोणावरही भरवसा ठेवायला कठीण वाटते. पण ज्याच्या वचनावर आपण भरवसा ठेवू शकतो असे कोणी आहे का? [उत्तर ऐका. मग यहोशवा २३:१४ वाचा.] या नियतकालिकात सांगितले आहे, की आपण बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या देवाच्या वचनांवर भरवसा वाढवू शकतो.”
सावध राहा! जाने.-मार्च
“तुमच्या जवळची एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत यशस्वी होते तेव्हा तुमच्या मनात तिच्याविषयी राग किंवा कमीपणाची भावना येते का? [उत्तर ऐका आणि पृष्ठ १३ वरील लेख दाखवा.] अशा भावनांवर तुम्ही मात कशी करू शकाल ते या नियतकालिकात सांगितले आहे.”
टेहळणी बुरूज फेब्रु.१
“आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, अलीकडील अभ्यासांत असे दिसून आले आहे, की आपल्या आध्यात्मिकतेचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. हे शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका. मग मत्तय ५:३, NW वाचा.] आपण आपल्या आध्यात्मिक गरजा कशा भागवू शकतो, हे टेहळणी बुरूजच्या या अंकात सांगण्यात आले आहे.”