सेवा सभा आराखडा
डिसेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २७ (२२१)
१० मि: स्थानीय घोषणा आणि आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ६ वरील सूचनांचा उपयोग करून, ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील पहिले) आणि डिसेंबर १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे ते दाखवा. दोन्ही वेळा, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी दोन्ही नियतकालिके सादर केली जावीत.
२० मि: “खरे ख्रिस्ती ऐक्य—कसे?”a परिच्छेद ५ ची चर्चा करताना आंतरराष्ट्रीय अधिवेशने, ईश्वरशासित बांधकाम प्रकल्प किंवा आपत्ती साहाय्य कार्य या संबंधाने आपल्या ख्रिस्ती ऐक्यावर जोर देणारा एखादा व्यक्तिगत अनुभव सांगण्यास आमंत्रित करा.
१५ मि: “सन २००४ साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला.” प्रशाला पर्यवेक्षकांचे भाषण. ऑक्टोबर २००३ च्या आमची राज्य सेवा पुरवणीतील मुद्द्यांचा समावेश करा.
गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ४ (४३)
१० मि: स्थानीय घोषणा. डिसेंबर २९ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील सेवा सभेत होणाऱ्या चर्चेच्या तयारीकरता सर्वांना संक्रमण-पर्यायी वैद्यकीय सेवा—रुग्णाच्या गरजा व हक्क पूर्ण करणे (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहण्याचे उत्तेजन द्या. “कृपया लवकर भेट द्या” असे शीर्षक असलेल्या पेटीची चर्चा करा. उपलब्ध असल्यास, S-70 फॉर्मचा एक नमुना दाखवा. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ या दिवसांसाठी खास क्षेत्र सेवा योजनांविषयी सांगा.
१५ मि: व्यक्तिगत अभ्यास—एक उपासना कृत्य. टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २०००, पृष्ठे १४-१५, परिच्छेद ६-१० वर आधारित भाषण.
२० मि: “‘योग्य प्रवृत्ती असलेल्यांना’ मदत करणे.”b दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. आमची राज्य सेवा मार्च १९९७, पृष्ठ ३ वरील पेटीतील, पुनःभेटी करण्याकरता दिलेल्या सूचनांच्या यादीची उजळणी करा.
गीत क्र. २१ (१९१) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ३ (३२)
१२ मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. पृष्ठ ६ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (नियतकालिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि जानेवारी १ चे टेहळणी बुरूज कसे सादर करावे याचे प्रात्यक्षिक दाखवा. सर्वांना पुढील आठवड्याच्या खास सेवा सभेची आठवण करून द्या ज्यात रुग्णाच्या गरजा व हक्क या व्हिडिओची उजळणी केली जाईल आणि आगाऊ वैद्यकीय सूचना/मुक्तता कार्ड किंवा ओळख पत्र यांची चर्चा व वितरण केले जाईल.
१५ मि: स्थानीय गरजा.
१८ मि: “योग्य असलेल्यांना शोधणे.”c लेखातील माहिती स्थानीय क्षेत्रासाठी लागू करा. क्षेत्रातील लोक सहसा कोणत्या वेळेला घरी असतात? संध्याकाळच्या वेळी प्रचार कार्य केल्यामुळे कोणते परिणाम मिळाले आहेत? फार क्वचित वेळा घरी असलेल्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी कोणत्या पद्धतींचा उपयोग केला जाऊ शकतो?
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २३ (२००)
५ मि: स्थानीय घोषणा. प्रचारकांना डिसेंबरचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करा. जानेवारीची साहित्य सादरता सांगा.
१७ मि: “महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रघाताची वैशिष्ट्ये दाखवणारा व्हिडिओ.” अनुभवी वडिलांनी हा भाग हाताळावा. प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ वाचा आणि ख्रिस्ती जन, रक्ताच्या पावित्र्याविषयी देवाच्या नियमाचा आदर करतात या प्रमुख कारणामुळे ते रक्त संक्रमण नाकारतात हे संक्षिप्तरूपात ठळकपणे सांगा. मग लगेच रुग्णाच्या गरजा व हक्क या व्हिडिओची लेखात दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करून चर्चा करा. समाप्तीला शेवटचा परिच्छेद वाचा.
२३ मि: वैद्यकीय पेचप्रसंगाला पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जाणे. अनुभवी वडिलांचे भाषण; त्यांनी शाखा दफ्तराने दिलेल्या रुपरेषेचा उपयोग करावा. “रक्त वर्ज्य करण्यासाठी आपल्याला साहाय्य करणाऱ्या तरतूदी” या पेटीतील मुख्य मुद्दयांची उजळणी करा.
गीत क्र. २४ (१८५) आणि समाप्तीची प्रार्थना.
जानेवारी ५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ११ (८५)
५ मि: स्थानीय घोषणा.
२० मि: तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. (१ करिंथ. १५:५८) श्रोत्यांबरोबर चर्चा. पूर्वी साक्षकार्य कसे केले जायचे त्याची सविस्तर माहिती सांगण्यासाठी अनेक वर्षांपासून सत्यात सक्रिय असलेल्या प्रचारकांना आधीच सांगा. तेव्हा मंडळीत किती जण होते? मंडळीला किती क्षेत्र नेमण्यात आले होते? लोक तेव्हा राज्य संदेशाला कशाप्रकारचा प्रतिसाद द्यायचे? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या विरोधाला तोंड द्यावे लागले होते? तेव्हापासून आतापर्यंत स्थानीय क्षेत्रातील राज्याचे कार्य कसे वाढले आहे?
२० मि: यहोवाच्या उपासनेमुळे आपले जीवन अर्थपूर्ण कसे होते? श्रोत्यांबरोबर चर्चा. खरी उपासना ही आनंदी, अर्थपूर्ण जीवनाची गुरूकिल्ली आहे. (१) खरी उपासना आपल्याला जीवनातील समस्यांचा व चिंतांचा सामना करण्यास मदत करते. (फिलिप्पै. ४:६, ७) (२) ती आपल्याला देवाला आवडणारे गुण विकसित करण्यास उत्तेजित करते. (२ पेत्र १:५-८) (३) सर्वात फलदायी मार्गाने आपल्या वेळेचा आणि आपल्या साधनसंपत्तीचा उपयोग करण्यास ती आपल्याला मदत करते. (१ तीम. ६:१७-१९) (४) भवितव्यासाठी ती आपल्याला पक्की आशा देते. (२ पेत्र ३:१३) (५) ती आपल्याला यहोवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करते. (याको. ४:८) यहोवाला जे जाणत नाहीत किंवा जे त्याची सेवा करत नाहीत त्यांच्याबाबतीत या सर्व गोष्टी दिसून येत नाहीत ते सांगा.
गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.