वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०३ पृ. १
  • योग्य असलेल्यांना शोधणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य असलेल्यांना शोधणे
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
  • टेलिफोनवरून साक्षकार्य करणे परिणामकारक ठरू शकते
    आमची राज्य सेवा—२००९
  • यशस्वी टेलिफोन साक्षकार्य
    आमची राज्य सेवा—२००१
  • तुम्ही सायंकाळचे साक्षकार्य करून पाहिले आहे काय?
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १२/०३ पृ. १

योग्य असलेल्यांना शोधणे

१ प्रचार कार्याविषयी येशूने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, ही कदाचित आपल्यासाठी सोपी गोष्ट नसेल. तो म्हणाला होता: “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा.” (मत्त. १०:११) आज लोक फार कमी वेळ घरात असतात, तेव्हा आपण ही शोध मोहीम परिणामकारकपणे कशी पूर्ण करू शकतो?

२ तुमच्या क्षेत्राचे परीक्षण करा: तुमच्या क्षेत्राचे परीक्षण करण्याद्वारे तुम्ही या शोध मोहिमेची सुरवात करू शकता. लोक बहुधा कोणत्या वेळी घरी असतात? दिवसा ते आपल्याला कोठे भेटू शकतील? आठवड्यांतील एखाद्या विशिष्ट दिवशी किंवा समयी, आपण त्यांना भेट द्यायला जातो तेव्हा ते अगदी निश्‍चिंत होऊन आपला संदेश ऐकतील, असे आहे का? स्थानीय क्षेत्रांतील लोकांच्या दिनक्रमानुसार व परिस्थितीनुसार आपल्या सेवेत फेरबदल केल्याने आपल्याला उत्तम परिणाम मिळू शकतील.—१ करिंथ. ९:२३, २६.

३ अनेक प्रचारकांना संध्याकाळच्या वेळी लोक घरी भेटतात. अशा वेळी काही घरमालक निश्‍चिंत व ऐकण्यास उत्सुक असतात. विशिष्ट ठिकाणी, थंडीच्या महिन्यांमध्ये संध्याकाळी लगेच अंधार पडत असल्यामुळे, टेलिफोनवरील साक्षकार्य (जेथे परवानगी आहे तेथे) देखील प्रभावी ठरू शकते. व्यापारी क्षेत्रांत व सार्वजनिक ठिकाणी साक्षकार्य केल्याने देखील लोकांपर्यंत आपण सुवार्ता पोहंचवू शकतो.

४ खास कार्याच्या एका महिन्यादरम्यान, एका मंडळीने शनिवार रविवारच्या दिवशी, आणि बुधवार व शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या साक्षकार्याची योजना केली. याशिवाय त्यांनी टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याची व व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्याची देखील व्यवस्था केली. या व्यवस्थांमुळे सर्वांमध्ये इतका उत्साह निर्माण झाला, की त्या मंडळीने नेहमीसाठीच ही व्यवस्था करून टाकली.

५ तत्परतेने पुनःभेट द्या: तुमच्या क्षेत्रांतील लोकांना पुनःभेट द्यायला गेल्यावर ते घरी भेटत नसतील तर पहिल्या भेटीच्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक भेटीच्या शेवटी, एक निश्‍चित वेळ ठरवा. आणि मग दिलेल्या वेळेवर त्या व्यक्‍तीला भेटा. (मत्त. ५:३७) उचित असेल, तर तुम्ही घरमालकाचा फोन नंबर विचारू शकता. यामुळे तुम्हाला घरमालकाशी पुन्हा संपर्क साधता येईल.

६ योग्य असलेल्यांना शोधण्यासाठी आणि आवड दाखवणाऱ्‍या लोकांना पुन्हा भेटण्यासाठी आपण मनापासून करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद नक्कीच असतील.—नीति. २१:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा