वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०३ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२००८
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • कौटुंबिक आराखडा—कौटुंबिक अभ्यास
    आमची राज्य सेवा—२००५
  • योग्य वेळी मदत
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ११/०३ पृ. ३

प्रश्‍न पेटी

▪ कौटुंबिक बायबल अभ्यासाचा मंडळीच्या अहवालात समावेश करावा का?

एक ख्रिस्ती पालक कुटुंबाचा बायबल अभ्यास घेत असेल आणि बाप्तिस्मा न घेतलेली मुले अभ्यास करत असतील तर पालक आठवड्याला जास्तीत जास्त एक तास, आठवड्याला एक पुनर्भेट आणि महिन्याला एक बायबल अभ्यास असा अहवाल देऊ शकतात. अभ्यास एका तासाहून अधिक वेळापर्यंत चालत असला, आठवड्यातून कित्येकदा होत असला किंवा प्रत्येक मुलाबरोबर वेगळा अभ्यास केला जात असला तरी वरीलप्रमाणेच अहवाल दिला जावा.—आपली सेवा पुस्तक, पृ. १०४ पाहा.

घरातील सर्वजण बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार असतील तर अभ्यासाचा वेळ किंवा अभ्यास यांचा क्षेत्र सेवेच्या अहवालात समावेश केला जाऊ नये (बाप्तिस्म्यानंतरही मुलाचा दुसऱ्‍या पुस्तकाचा अभ्यास चालू असल्यास गोष्ट वेगळी आहे). कारण, जे यहोवाचे समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले सेवक नाहीत त्यांच्या संदर्भात सुवार्तेच्या प्रचाराने व बायबल सत्य शिकवण्याने काय साध्य केले जात आहे हे मंडळीच्या क्षेत्र सेवा अहवालात प्रामुख्याने दाखवले जाते. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) परंतु, याचा अर्थ कौटुंबिक अभ्यास नियमितपणे चालवणे महत्त्वाचे नाही असे नाही.

आपल्या मुलांसोबत अभ्यास करण्याची ख्रिस्ती पालकांची जबाबदारी आहे. कौटुंबिक अभ्यास सुरू करून तो सुधारण्याकरता ज्यांना मदत हवी आहे ते वडिलांकडे मदत मागू शकतात. परिस्थितींमुळे जर दुसऱ्‍या एका प्रचारकाला मंडळीत येणाऱ्‍या एका ख्रिस्ती कुटुंबातील बाप्तिस्मा न घेतलेल्या मुलाचा किंवा मुलीचा बायबल अभ्यास घ्यावा लागत असेल तर अध्यक्षीय पर्यवेक्षकांचा किंवा सेवा पर्यवेक्षकांचा सल्ला घ्यावा. असा अभ्यास घेण्याची संमती दिल्यास, अभ्यास घेणाऱ्‍या व्यक्‍तीने इतर कोणत्याही बायबल अभ्यासाप्रमाणे त्याचा अहवाल द्यावा.

यहोवाच्या मार्गांत मुलांना शिक्षित करण्यासाठी क्षेत्र सेवा अहवालावर दिसतो त्यापेक्षा बराच वेळ व शक्‍ती खर्च होत असते. (अनु. ६:६-९; नीति. २२:६) आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याची भारी जबाबदारी पार पाडण्याकरता ख्रिस्ती पालक प्रशंसेस पात्र आहेत.—इफिस. ६:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा