वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०३ पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००३
आमची राज्य सेवा—२००३
km ११/०३ पृ. ३

घोषणा

▪ साहित्य सादरता नोव्हेंबर: देव आपल्याकडून काय अपेक्षितो? माहितीपत्रक किंवा सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तक सादर करा. लोकांकडे ही प्रकाशने आधीच असली तर त्यांना एकमात्र खऱ्‍या देवाची उपासना करा (इंग्रजी) किंवा इतर कोणतेही जुने प्रकाशन सादर करा. डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. पर्यायी सादरता म्हणून तुम्ही, बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तके सादर करू शकता. जानेवारी: १९८८ च्या आधीचे मंडळीकडे असलेल्या साठ्यातील कोणतेही पुस्तक. यांपैकी एकाचाही साठा तुमच्याकडे नसल्यास, जवळपासच्या मंडळीत जुन्या पुस्तकांचा अधिक साठा आहे का याची विचारपूस करा म्हणजे तुम्ही ती पुस्तके वापरू शकता. ज्या मंडळ्यांकडे जुन्या पुस्तकांचा साठा नाही त्या, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य किंवा तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे ही पुस्तके सादर करू शकतात. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी). हे प्रकाशन उपलब्ध नसल्यास, पर्यायी सादरता म्हणून जीवन—येथे कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? (इंग्रजी) किंवा प्रकटीकरण—त्याचा भव्य कळस जवळ आह! यांचा उपयोग तुम्ही करू शकता.

▪ मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नेमलेल्या एखाद्या बांधवाने डिसेंबर १ तारखेला किंवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीचा जमाखर्च अहवाल तपासून पाहावा. त्यानंतर मंडळीत पुढचा जमाखर्च अहवाल वाचल्यावर याची घोषणा करावी.

▪ मंडळ्यांनी आपल्या पुस्तकालयांकरता वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००१ ची केलेली मागणी पूर्ण करूनही काही मर्यादित प्रती इंग्रजीत उपलब्ध आहेत. ज्या प्रचारकांना व्यक्‍तिगत उपयोगाकरता इंडेक्स हवे असेल त्यांना आता त्यांच्या मंडळीकरवी मागणी करता येईल.

▪ शाखा दफ्तरात, प्रत्येक महिन्याला मंडळीच्या साहित्य मागण्या पुढील पद्धतीने हाताळल्या जातील: पहिल्या आठवड्यादरम्यान कर्नाटक आणि तामीळनाडूच्या मागण्या हाताळल्या जातील; दुसऱ्‍या आठवड्यात आंध्र प्रदेश व महाराष्ट्र येथील मागण्या पूर्ण केल्या जातील; महिन्याच्या तिसऱ्‍या आठवड्यात केरळच्या मागण्या हाताळल्या जातील; आणि भारतातील इतर राज्यातील मागण्यांची हाताळणी महिन्याच्या चवथ्या आठवड्यात करण्यात येईल. साहित्य सहयोजकाने (किंवा सेवकाने) साहित्य मागण्या त्यानुसार पाठवण्याची व्यवस्था करावी जेणेकरून तुमच्या मंडळीच्या नेमलेल्या आठवड्याआधी त्या शाखा दफ्तराला मिळतील.

▪ वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००२ च्या प्रती इंग्रजीत उपलब्ध आहेत. प्रत्येक मंडळी आपल्या पुस्तकालयासाठी इंडेक्सची केवळ एकच प्रत मागवू शकते आणि लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवरील “मंडळीकरता” या रकान्यात ते स्पष्टपणे लिहिले जावे.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स २००२ —इंग्रजी

एकमेव खऱ्‍या देवाची उपासना करा —कन्‍नड, तेलगू

▪ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:

इज देअर अ क्रिएटर हू केअर्स आबाउट यू? —इंग्रजी

लाईफ—हाऊ डीड इट गेट हियर? बाय एव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन (लहान आकाराचे) —इंग्रजी

सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान —बंगाली, नेपाळी

अप्लाई युवरसेल्फ टू रीडिंग ॲण्ड रायटींग —इंग्रजी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा