वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०३ पृ. १
  • नम्रता परिधान करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नम्रता परिधान करा
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • नम्रतेचे लेणे का परिधान करावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • खरी नम्रता आत्मसात करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • अनुकरण करण्यासाठी लीनतेची उदाहरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ९/०३ पृ. १

नम्रता परिधान करा

१ दावीद नावाचा मेंढपाळ असलेला एक मुलगा यहोवावर भरवसा ठेवतो आणि एका शक्‍तिशाली योद्ध्‌याचा पराजय करतो. (१ शमु. १७:४५-४७) ईयोब नावाचा एक श्रीमंत मनुष्य निमूटपणे संकट सहन करतो. (ईयो. १:२०-२२; २:९, १०) देवाचा पुत्र अर्थात येशू, आपल्या शिकवणींचे सर्व श्रेय आपल्या पित्याला देतो. (योहा. ७:१५-१८; ८:२८) या सर्व उदाहरणांमध्ये, नम्रतेचा मोठा वाटा होता. आजही, आपल्यासमोर येणाऱ्‍या सर्व परिस्थितींमध्ये नम्रता या गुणाची अत्यंत आवश्‍यकता आहे.—कलस्सै. ३:१२.

२ प्रचार करताना: ख्रिस्ती सेवक या नात्याने आपण सर्व प्रकारच्या लोकांना, त्यांच्या जातीच्या, संस्कृतीच्या किंवा पार्श्‍वभूमीच्या आधारावर त्यांच्याविषयी कसलेच मत न बनवता नम्रपणे सुवार्ता सांगतो. (१ करिंथ. ९:२२, २३) काही आपल्याबरोबर असभ्यपणे वागतात किंवा उद्धटपणे राज्याच्या संदेशाचा अव्हेर करतात तेव्हा आपण जशास तसे वागत नाही तर पात्र असलेल्यांना धीराने शोधत राहतो. (मत्त. १०:११, १४) आपल्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा उपयोग करून लोकांना प्रभावित करण्यापेक्षा आपण त्यांचे लक्ष देवाच्या वचनाकडे आकर्षित करतो; कारण, आपण जे काही बोलतो त्यापेक्षा देवाचे वचन अधिक लाघवी आहे, हे आपण ओळखतो. (१ करिंथ. २:१-५; इब्री ४:१२) येशूचे अनुकरण करत आपण सर्व स्तुती यहोवालाच देतो.—मार्क १०:१७, १८.

३ मंडळीत: ख्रिश्‍चनांनी, ‘एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंध देखील बांधला पाहिजे.’ (१ पेत्र ५:५) आपण इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजले तर, त्यांनी आपली सेवा करावी अशी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपल्या बांधवांची सेवा करण्यासाठी मार्ग शोधू. (योहा. १३:१२-१७; फिलिप्पै. २:३, ४) राज्य सभागृह साफ करण्यासारखी कामे ही आपली कामे नाहीत असे आपल्याला वाटणार नाही.

४ नम्रता आपल्याला ‘एकमेकांना प्रीतीने वागवण्यास’ व मंडळीत शांती व ऐक्याला बढावा देण्यास मदत करेल. (इफिस. ४:१-३) नम्रतेमुळे, पुढाकार घेण्यासाठी ज्यांना नेमण्यात आले आहे त्यांच्या अधीन राहण्यास आपल्याला मदत होते. (इब्री १३:१७) आपल्याला दिला जाणारा कोणताही सल्ला किंवा शिस्त स्वीकारण्यास नम्रता आपल्याला प्रवृत्त करेल. (स्तो. १४१:५) आणि मंडळीत आपल्याला मिळणाऱ्‍या कोणत्याही नेमणुका सांभाळताना यहोवावर विसंबून राहण्यास नम्रता आपल्याला प्रवृत्त करेल. (१ पेत्र ४:११) दावीदाप्रमाणे आपणही हे ओळखतो की यश मिळणे हे मानवी क्षमतेवर नव्हे तर देवाच्या आशीर्वादावर अवलंबून आहे.—१ शमु. १७:३७.

५ देवासमक्ष: सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन” झाले पाहिजे. (१ पेत्र ५:६) आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा राज्याद्वारे येणाऱ्‍या सुटकेची आपल्याला उत्कंठा लागेल. तरीपण आपण नम्र होऊन धीर धरतो, यहोवाने आपल्या नियुक्‍त वेळी आपली वचने पूर्ण करेपर्यंत थांबून राहतो. (याको. ५:७-११) सचोटी राखणाऱ्‍या ईयोबाप्रमाणे आपल्याला देखील, ‘परमेश्‍वराचे नाम धन्य’ करण्याची प्रमुख चिंता आहे.—ईयो. १:२१.

६ संदेष्टा दानीएल याने स्वतःला “देवापुढे नम्र” केले व यामुळे त्याला यहोवाची मर्जी प्राप्त झाली व त्याला अनेक विशेषाधिकार मिळाले. (दानी. १०:११, १२) आपणही मग नम्रता परिधान करू या, कारण, “नम्रता व परमेश्‍वराचे भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन” आहे हे आपल्याला माहीत आहे.—नीति. २२:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा