वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०३ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००३
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००३
km ९/०३ पृ. २

सेवा सभा आराखडा

सप्टेंबर ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पुढील आठवड्याच्या सेवा सभेची तयारी करताना, गेल्या सेवा वर्षातील विभागीय संमेलन कार्यक्रमाच्या टिपणींची उजळणी करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबर चे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) आणि सप्टेंबर १५ चे टेहळणी बुरूज अंक कशाप्रकारे सादर केले जाऊ शकतात त्याची दोन वास्तविक वाटणारी प्रात्यक्षिके दाखवा. एका प्रात्यक्षिकात, एक विद्यार्थी अथवा पालक शिक्षकाला साक्ष देत असल्याचे दाखवा.

१० मि: शाखेकडून आलेले पत्र. अनेक वर्षांपासून सत्यात असलेल्या एका प्रचारकाबरोबर, शक्यतो वडील आणि एक तरुण प्रचारक यांच्यातील चर्चा. तरुण प्रचारक अनुभवी प्रचारकाला विचारतो: तुम्ही आमची राज्य सेवा यातील शाखा दफ्तराकडून आलेले पत्र पाहिले का? अनुभवी प्रचारक सांगतो, की १९६० च्या व १९७० च्या दशकात शाखेकडून पत्र, हे आमची राज्य सेवा यातील एक वैशिष्ट्य होते. ते दोघे मग पहिल्या पानावर असलेल्या पत्राची चर्चा करतात आणि मुख्य मुद्द्‌यांवर जोर देतात.

२५ मि: “युवकांनो—भवितव्यासाठी भक्कम पाया घाला.”a वडिलांनी हा भाग हाताळावा आणि दिलेल्या प्रश्‍नांचा उपयोग करावा. परिच्छेद ५ वर चर्चा करताना, पूर्ण वेळेच्या सेवेमुळे मिळणाऱ्‍या आनंदावर व आशीर्वादांवर भर द्या.

गीत क्र. २७ (२२१) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ११ (८५)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल.

१० मि: “देवाची उपासना पुस्तकाचा अभ्यास.” पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांचे भाषण. अभ्यास आराखड्याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधा. चवथ्या परिच्छेदाची चर्चा करताना, सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ २८ वरील परिच्छेद १ आणि पृष्ठ ७० वरील मुद्द्‌यांचा समावेश करा.

२५ मि: “परमेश्‍वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग.” (स्तो. ३७:३) पुढील प्रश्‍नांच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा; हे प्रश्‍न, गेल्या सेवा वर्षाच्या विभागीय संमेलन कार्यक्रमातील मुख्य मुद्द्‌यांवर भर देतात. श्रोत्यांना विचारा, की ते व्यक्‍तिगतरीत्या किंवा कौटुंबिक सदस्य या नात्याने मुख्य मुद्दे कशाप्रकारे लागू करू शकले. कार्यक्रमातील या भागांविषयी सांगा. (१) “यहोवावर भरवसा ठेवणे.” जीवनाच्या प्रत्येक पैलूत यहोवावर भरवसा ठेवणे महत्त्वाचे का आहे? (it-२ पृ. ५२१) वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स आपली मदत कसे करू शकेल? (२) “जीवनाच्या व्यर्थतांपासून सावध राहा.” (उप. २:४-८, ११) आपण कोणत्या व्यर्थ कामांपासून सावध असले पाहिजे आणि हे आपण कसे करू शकतो? (३) “वाईटापासून दूर पळा—चांगले करणारे व्हा.” यहोवाच्या दर्जांनुसार चालणे महत्त्वाचे का आहे? (यश. ५:२०) आपण कोणत्या चांगल्या कार्यांत व्यस्त असले पाहिजे? (४) “यहोवावरील आपला भरवसा कायम ठेवणे.” परीक्षा व मोह येतात तेव्हा कोणती गोष्ट आपल्याला दृढ उभे राहण्यास मदत करील? काही बाबतीत आपल्याला यहोवावर विसंबून का राहावे लागेल? (५) “देवाच्या राज्यासाठी तुम्ही पात्र ठराल का?” (कलस्सै. १:१०, NW) बायबलमधील कोणती उदाहरणे आपल्याला यहोवासमोर पात्र भूमिकेत चालत राहण्याची प्रेरणा देतात? (६) “यहोवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवा.” असे केल्याने आपल्या जीवनावर प्रभाव कसा पडेल?

गीत क्र. २६ (२१२) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १७ (१८७)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबर चे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि ऑक्टोबर १ चे टेहळणी बुरूज अंक कसे सादर करावेत त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. एक वडील आणि एक वृद्ध आजारी प्रचारक टेलिफोन साक्षकार्य करत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवा.

१५ मि: गेल्या वर्षी आपण काय साध्य केले? सेवा पर्यवेक्षकांनी २००३ सेवा वर्षाच्या मंडळीच्या रिपोर्टमधील मुख्य गोष्टींची उजळणी करावी. मंडळीने केलेल्या उत्तम कार्याबद्दल तिची प्रशंसा करा. विभागीय पर्यवेक्षकांनी दिलेल्या शेवटल्या रिपोर्टमधून काही उचित मुद्द्‌यांचा समावेश करा. येत्या वर्षात साध्य करता येण्याजोग्या एक अथवा दोन ध्येयांचा उल्लेख करा.

२० मि: सर्व धर्म देवाला स्वीकारयोग्य आहेत का? युक्‍तीवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या आधारावर श्रोत्यांबरोबर चर्चा. या मुद्यावर तर्क कसा करायचा त्याची चर्चा करा. (rs पृ. ३२२-३) खरा धर्म ओळखण्याच्या विविध मार्गांवर भर द्या. (rs पृ. ३२८-३०) आपल्या सेवेमुळे इतरांना, देवाला स्वीकारयोग्य असलेली उपासनापद्धत निवडण्यास मदत होते.—कलस्सै. १:९, १०.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २० (९३)

१० मि: स्थानीय घोषणा. सप्टेंबर महिन्याचा सेवेचा रिपोर्ट देण्यास सर्व प्रचारकांना आठवण करून द्या. ऑक्टोबर महिन्यात कोणते साहित्य सादर केले जाईल ते सांगा. अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल त्याचे एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.

३५ मि: “तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?” प्रोत्साहनदायक भाषण आणि परिच्छेद १३ व १८-२४ मधील प्रश्‍नांवर श्रोत्यांना उत्तरे विचारा. पालकांना आपल्या मुलांना बेथेल सेवेला करिअर म्हणून निवडण्याचे उत्तेजन द्या. कुटुंबांना आपल्या कौटुंबिक अभ्यासादरम्यान या पुरवणीचा अभ्यास करण्याचा सल्ला द्या.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २१ (१९१)

१० मि: स्थानीय घोषणा. या महिन्यात आपण बायबल अभ्यास सुरू करण्याचा विशेष प्रयत्न करणार आहोत. आपली राज्य सेवा मे २००२, पृष्ठ १, परिच्छेद १ ची संक्षिप्त उजळणी करा.

१५ मि: “प्रथम गोष्टींना प्रथम स्थान देण्याची खात्री करा!” टेहळणी बुरूज, सप्टेंबर १, १९९८, पृष्ठे १९-२१ वरील या लेखावर आधारित भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. येत्या अनेक महिन्यांदरम्यान होणाऱ्‍या ईश्‍वरशासित घटनांच्या तारखांबद्दल सांगा आणि या तारखा कॅलेंडरवर लिहून ठेवण्याचे सर्वांना उत्तेजन द्या. श्रोत्यांना विचारा, की ते आध्यात्मिक तरतूदी चुकू नयेत म्हणून काय करतात.

२० मि: “नम्रता परिधान करा.” b शास्त्रवचने कशी लागू होतात हे श्रोत्यांना विचारा.

गीत क्र. २८ (२२४) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा