समाधानी जीवन—कसे मिळवता येईल माहितीपत्रक कसे सादर करावे याविषयी काही सूचना
▪ “आपल्या दररोजच्या समस्या पाहिल्यावर तुम्हाला वाटते का, की समाधानी जीवन जगणे शक्य आहे? [उत्तर ऐका.] मत्तय ५:५ मध्ये एक सुज्ञ सूचना देण्यात आली आहे. [वाचा] अशाप्रकारची सौम्यता आपण कशी विकसित करू शकतो आणि आपल्या रागावर नियंत्रण कसे मिळवू शकतो? या प्रकाशनाच्या पृष्ठ ९ वरील हे चित्र आणि त्या खाली काय लिहिले आहे ते पाहा.” आता, पृष्ठ ८ वरील परिच्छेद ११ कडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करा.
▪ “अहितकारक प्रभावाने भरलेल्या जगात आपल्या मुलांचे संगोपन करण्याविषयी अनेक पालकांना चिंता लागून आहे याजशी तुम्ही सहमत नाही का? [उत्तर ऐका.] अशा हानीकारक वातावरणापासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी पालक काय करू शकतात?” नीतिसूत्रे २२:६ वाचा. मग, पृष्ठ ५ उघडून त्यावरील चित्र व परिच्छेद २ ची चर्चा करा.
▪ “आज, पुष्कळ लोक सुख-शांती मिळवण्यास झटत आहेत पण ते प्राप्त करणे त्यांना कठीण वाटते. तुम्हाला काय वाटते, सुख-शांती इतक्या सहजासहजी का मिळत नाही? [उत्तर ऐका.] ईयोब १४:१, २ मानवजातीच्या अवस्थेविषयी काय म्हणते ते पाहा. खरोखर सुखी होण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकेल?” पृष्ठ २२ उघडा आणि परिच्छेद २ कडे घरमालकाचे लक्ष वेधा आणि या पृष्ठावरील चित्रांवर देखील चर्चा करा.