सेवा सभा आराखडा
ऑगस्ट ११ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २८ (२२४)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबर चे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिली सादरता) आणि ऑगस्ट १५ चे टेहळणी बुरूज अंक कशाप्रकारे सादर केले जाऊ शकतात त्याची दोन वास्तविक वाटणारी प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. एका सादरतेत, “मी कामात आहे,” या संभाषणाला खीळ घालणाऱ्या विषयाला कसे हाताळायचे त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या, पुस्तिकेचे पाने ११-२ पाहा.
१५ मि: “यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करा.”a दयाळू कार्यांमुळे साक्ष देण्याची संधी कशी प्राप्त झाली हे सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा. सहविश्वासू बंधूभगिनींना मदत करण्याकरता केलेल्या प्रयत्नांबद्दल मंडळीची प्रशंसा करा.
२० मि: “पायनियर सेवेची प्रतिफळे.”b दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. एक किंवा दोन पायनियरांना, पायनियरींगमुळे त्यांना कोणकोणते आशीर्वाद मिळाले आहेत ते सांगण्यास आमंत्रित करा. पायनियरींग करू इच्छिणाऱ्यांना मंडळीच्या सचिवांकडून अर्ज मिळू शकेल हे सांगा.
गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १० (८२)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. “समाधानी जीवन—कसे मिळवता येईल, माहितीपत्रक कसे सादर करावे याविषयी काही सूचना” या पेटीची उजळणी करा आणि एका सुयोग्य प्रचारकाला यांतील एखाद्या सादरतेचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगा.
१७ मि: “तजेला देणारे काम.”c ख्रिस्ती सेवेमुळे तजेला कसा मिळतो यावर टिपणी देण्यास आधीच एकाची किंवा दोघांची व्यवस्था करा.
१८ मि: “आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या.”d (परिच्छेद १-५) दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. परिच्छेद ३ आणि ४ वर चर्चा करताना, राज्य सभागृहाच्या स्वच्छतेसाठी कोणत्या स्थानीय व्यवस्था करण्यात आल्या आहेत त्यांची उजळणी करा. ज्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे ते सांगा. खऱ्या उपासनेसाठी असलेल्या उचित स्थानाची देखभाल करण्यासाठी मंडळीत सर्व जण करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करा.
गीत क्र. २३ (२००) आणि समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २५ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ५ (४६)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून जुलै-सप्टेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरी सादरता) आणि सप्टेंबर १ चे टेहळणी बुरूज अंक कसे सादर करावेत त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एकाच नियतकालिकावर चर्चा केली जात असली तरी घरमालकाला दोन्ही नियतकालिके सादर करा. प्रत्येक प्रात्यक्षिकात, एक पालक आपल्या किशोरवयीन मुलाबरोबर अथवा मुलीबरोबर, नियतकालिक कार्याची तालीम करत असल्याचे दाखवा. प्रात्यक्षिक दाखवण्याआधी ते सुचवलेल्या सादरतांची संक्षिप्त चर्चा करतात.
१५ मि: तरुण यहोवाची स्तुती करत आहेत! भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा तसेच मुलाखती. सभांमध्ये तरुणांची चांगली तयारी केलेली उत्तरे ऐकायला आपल्याला आवडतात. ईश्वरशासित सेवा प्रशालेतील त्यांचा मनापासूनचा सहभाग आणि प्रगती पाहूनही आपल्याला आनंद वाटतो. सेवेमध्ये ते उत्तम साक्ष देतात तेव्हा त्यांचा खरा विश्वास दिसून येतो. त्यांच्या उत्तम आचरणामुळे यहोवाचा आदर होतो. (yb८८ पृ. ५३-४) त्यांची आध्यात्मिक प्रगती, भवितव्यात त्यांना मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा पाया आहे. मंडळीच्या सभांमध्ये नियमित सहभाग घेण्यात आनंद मानणाऱ्या दोन किंवा तीन ख्रिस्ती युवकांची मुलाखत घ्या. यहोवाची स्तुती करण्याकरता, मंडळीतले तरुण करत असलेल्या उत्तम प्रयत्नांबद्दल त्यांची प्रेमळ प्रशंसा करा.
२० मि: प्रचार करण्यास धैर्य एकवटा. (१ थेस्सलनी. २:२) भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. पुष्कळ जण, इतरांना राज्याचा संदेश सांगायला का घाबरतात त्याचे स्पष्टीकरण द्या. अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्यांना देखील अशी भीती वाटू शकते. टेहळणी बुरूज डिसेंबर १, १९९९, पृष्ठ २५; डिसेंबर १५, १९९९, पृष्ठ २५ आणि एप्रिल १, १९९६, पृष्ठ ३१ वरील काही अनुभव सांगा. श्रोत्यांना विचारा, की काही प्रसंगी त्यांना सुवार्ता सांगायला भीती वाटली तेव्हा धैर्य एकवटून सुवार्ता सांगण्यात त्यांना कशाप्रकारे यश आले. समाप्तीला, टेहळणी बुरूज डिसेंबर १५, १९९९ पृष्ठे २३-४ च्या आधारावर, यहोवाकडून शक्ती मिळवता येईल याचे उत्तेजन द्या.
गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.
सप्टेंबर १ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. ऑगस्ट महिन्याचा सेवेचा रिपोर्ट देण्यास सर्व प्रचारकांना आठवण करून द्या. सप्टेंबर महिन्यात कोणते साहित्य सादर केले जाईल ते सांगा. एक किंवा दोन प्रचारकांना संमेलनांना जाताना-येताना, सुटीवर असताना किंवा उन्हाळ्यातील इतर महिन्यांमध्ये आलेले अनुभव सांगण्याची आधीच व्यवस्था करा.
१५ मि: पुन्हा येऊन भेट देऊ, असे म्हणून दिलेले वचन तुम्ही पाळता का? टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९९९ पृष्ठे १०-११ वरील “दिलेली वचने पाळण्याचे इतर मार्ग” या पोटमथळ्याखालील माहितीच्या आधारावर भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. आस्था दाखवणारे लोक आपल्याला आपल्या क्षेत्रात भेटतात तेव्हा आपण दुसऱ्या वेळेला येऊन चर्चा करण्याचे वचन देतो. हे वचन आपण विश्वासूपणे पाळतो का? वचन पाळण्यास आपल्याला प्रवृत्त करणाऱ्या बायबल तत्त्वांची उजळणी करा. परत येऊन भेटू म्हणून दिलेले वचन पाळल्यामुळे कोणते आशीर्वाद मिळाले त्याबद्दलचे अनुभव सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रित करा.
२० मि: “आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या.”e (परिच्छेद ६-११) दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा. राज्य सभागृहाची देखभाल करण्याच्या महत्त्वावर जोर द्या, पृष्ठ ५ वरील चौकोनावर भर द्या. तुमच्या राज्य सभागृहाच्या स्थितीवर संक्षिप्त रिपोर्ट द्या, दुरुस्ती किंवा सुधारणा करण्याच्या काही योजना असतील तर त्यांच्याविषयी सांगा.
गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.