बहुभाषिक क्षेत्रात साहित्य सादर करणे
१. स्थानीय भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलणाऱ्यांना कशाप्रकारे साहाय्य दिले जात आहे?
१ पुष्कळ प्रमुख शहरांमध्ये, एकाच भाषेत सभा चालवण्याच्या बाबतीत बरीच चांगली प्रगती करण्यात आली आहे. स्थानीय भाषेव्यतिरिक्त इतर भाषा समजणाऱ्यांना, त्यांच्या भाषेच्या मंडळीत जाण्यास सांगितले जाते. विविध भाषेचे लोक असलेल्या क्षेत्रात प्रचार कार्य करण्याच्या संबंधाने कोणत्या योजना करण्यात आल्या आहेत?
२. दोन किंवा त्याहूनही अधिक मंडळ्या विविध भाषा बोलणाऱ्या लोकांच्या क्षेत्रात काम करताना कोणत्या प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे?
२ साहित्य केव्हा सादर करावे: असे असताना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या दोन किंवा अधिक मंडळ्यांनी, या क्षेत्रात नियमित साक्षकार्याची योजना करावी. संबंधित वडील सेवा पर्यवेक्षकांद्वारे, परस्पर स्वीकारलेली एक व्यवस्था करतील जेणेकरून प्रत्येक भाषेच्या लोकांना पूर्ण साक्ष दिली जाईल. अशा क्षेत्रात घरोघरचे कार्य करत असताना प्रचारक सहसा, इतर मंडळ्यांच्या भाषेतील साहित्य सादर करणार नाहीत. परंतु जर केलेच तर, त्यांनी उचित मंडळीतल्या प्रचारकांनी या घरमालकाला पुनर्भेट द्यावी म्हणून त्याचे नाव आणि पत्ता लिहून घ्यावा. सेवा पर्यवेक्षक प्रत्येक टेरिटरी नेमणूक कार्डावरील त्या भाषेच्या घरांविषयी असलेल्या माहितीचे रेकॉर्ड नीटनेटके ठेवण्याची व्यवस्था करतील जेणेकरून, भवितव्यात प्रचारक केवळ त्यांच्याच मंडळीच्या भाषेच्या लोकांना भेटतील.
३. प्रत्येक प्रचारक बहुभाषिक क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी काय करू शकतो?
३ प्रत्येक मंडळीने क्षेत्र चांगल्या प्रकारे व नियमित अवधीनंतर पूर्ण केले आहे याची खात्री करण्याकरता सुव्यवस्थेची आवश्यकता आहे. सर्व प्रचारक, खासकरून आपल्या मंडळीची भाषा बोलणाऱ्या लोकांवर आपले लक्ष एकाग्र ठेवून सहकार्य देऊ शकतात. घरोघरचा रेकॉर्ड सविस्तरपणे भरल्याने साहाय्यक ठरू शकतो. सूचना दिल्याप्रमाणे S-8 या फॉर्मचा उपयोग करा आणि भाषा माहिती त्वरीत सेवा पर्यवेक्षकांना द्या. दोन किंवा तीन भाषा अस्खलितपणे बोलणाऱ्या घरांतील लोकांना कोणत्या मंडळीच्या प्रचारकांनी भेटी दिल्या पाहिजे हे ठरवताना, समजदारीची आवश्यकता आहे. याशिवाय, भाडेकरू वेळोवेळी बदलत असल्यामुळे, रेकॉर्ड देखील वेळोवेळी अद्ययावत केले पाहिजेत.
४. एखादी मंडळी, दुसऱ्या भाषेतील साहित्याचा साठा केव्हा ठेवू शकते?
४ साहित्य केव्हा साठवायचे: एका मंडळीने दुसऱ्या स्थानीय मंडळीच्या भाषेतील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवू नये. एका क्षेत्रात दुसरी भाषा बोलणारे बहुसंख्य लोक असतात, पण त्या क्षेत्रात त्या भाषेची मंडळी नसल्यास काय? अशा परिस्थितींत, मंडळ्यांनी, त्या भाषेत उपलब्ध असलेले महत्त्वाचे साहित्य, जसे की पत्रिका, अपेक्षा माहितीपत्रक, ज्ञान पुस्तक, यांचा मर्यादित साठा ठेवावा. या भाषेचे लोक भेटतात तेव्हा प्रचारक त्यांना हे साहित्य सादर करू शकतात.
५. मंडळीकडे ज्या भाषेतील साहित्य नाही ते साहित्य कसे काय मिळवता येईल?
५ मंडळीकडे, एखाद्या आस्थेवाईक व्यक्तीच्या भाषेत साहित्य नसल्यास, ते साहित्य कसे मिळवता येईल? आस्थेवाईक व्यक्तीला भेट देणाऱ्या प्रचारकाने, त्या व्यक्तीच्या भाषेतील कोणते साहित्य मंडळीकडे उपलब्ध आहे याची साहित्य सेवकाकडे विचारपूस करावी जेणेकरून, आवश्यक ते साहित्य मंडळीच्या पुढील साहित्य मागणीच्या वेळी मागवता येऊ शकेल.
६. ख्रिस्ती प्रकाशने उपलब्ध करण्यामागचा आपला हेतू काय आहे?
६ ‘सर्व माणसांना,’ मग ते कोणतीही भाषा बोलणारे असोत, ‘सत्याचे परिपूर्ण ज्ञान घेऊन तारण’ मिळण्यास मदत करण्याकरता आपण ख्रिस्ती प्रकाशनांचा उपयोग करू या.—१ तीम. २:३, ४.