वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०३ पृ. ७
  • अपंग—तरी फलदायी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अपंग—तरी फलदायी
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा तुम्हाला ताकद देईल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • एप्रिल—‘मेहनत व परिश्रम’ करण्याचा समय
    आमची राज्य सेवा—२००१
  • यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km ७/०३ पृ. ७

अपंग—तरी फलदायी

१ अपंगत्व असलेल्या अनेक यहोवाच्या साक्षीदारांपैकी तुम्ही एक असला तरी तुमची सेवा फलदायी ठरू शकते. खरे तर, तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला साक्ष देण्याच्या व इतरांना उत्तेजन देण्याच्या खास संधी मिळू शकतात.

२ साक्ष देणे: अपंग असलेले अनेकजण सेवेमध्ये पूर्ण सहभाग घेत आहेत. जसे की, एका भगिनीला, एका शस्त्रक्रियेनंतर चालताना किंवा बोलतानाही खूप त्रास व्हायचा; तरीपण, तिच्या पतीने लोकांची रहदारी असलेल्या फुटपाथशेजारी जर गाडी पार्क केली तर तिला नियतकालिक वितरण कार्यात सहभाग घेता यायचा. एके प्रसंगी तिने केवळ दोन तासांत ८० नियतकालिकांचे वाटप केले! तुमच्या खास परिस्थितीमुळे तुम्ही अशाही लोकांच्या संपर्कात येऊ शकता ज्यांना इतर वेळी भेटणे अशक्य असते. तेव्हा, अशा लोकांना तुम्ही आपले खास क्षेत्र समजू शकता.

३ तुमचे प्रचार कार्य खूप प्रभावशाली होऊ शकते! तुमचा दृढनिश्‍चय आणि बायबल सत्यामुळे तुमच्या जीवनावर झालेला चांगला परिणाम पाहून इतर लोक कदाचित राज्य संदेशाकडे आकर्षित होतील. शिवाय, संकटात असलेल्या लोकांना तुम्ही भेटता तेव्हा, तुमच्या अनुभवामुळे तुम्ही त्यांना देवाच्या वचनातील सांत्वन देण्यास सज्ज होता.—२ करिंथ. १:४.

४ इतरांना बळकट करा: ३७ वर्षे कृत्रिम श्‍वासोच्छ्‌वासाच्या यंत्रात झोपून राहावे लागलेल्या लोरलने १७ लोकांना बायबलचे अचूक ज्ञान घेण्यास मदत केली होती, हा अनुभव वाचून तुम्हाला उत्तेजन मिळाले नाही का? तसेच, तुमचेही उदाहरण सहविश्‍वासू बंधूभगिनींना, यहोवाच्या सेवेत अधिक करण्यास प्रेरित करू शकते.—g९३ १/२२ पृ. १८-२१.

५ तुमच्या परिस्थितीमुळे तुम्ही बाहेर जाऊन तुम्हाला करावीशी वाटते तितकी सेवा करू शकत नसला तरीसुद्धा तुम्ही इतरांना बळकट करू शकता. एका बांधवाने म्हटले: “अगदीच अपंग असलेली व्यक्‍तीसुद्धा इतरांना खूप मदत करू शकते, ही गोष्ट मी शिकलो आहे. माझी पत्नी आणि मी मंडळीतील वेगवेगळ्या लोकांसाठी एका खांबाप्रमाणे आहोत. आमच्या परिस्थितीमुळे आम्ही नेहमी इथेच असतो, नेहमी उपलब्ध असतो.” परंतु, तुमच्या अपंगत्वामुळे तुम्ही नेहमी, तुम्हाला जितका आवेश आहे तितके कार्य करू शकणार नाही, हे समजण्याजोगे आहे. तरीपण, तुम्हाला मदत मिळाल्यास तुम्ही सेवेमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकाल. तेव्हा, तुम्हाला काही मदत हवी असेल तर, मदत करू शकणाऱ्‍या वडिलांना किंवा इतरांना हे सांगण्यास कचरू नका.

६ यहोवाची सेवा करण्याकरता तुम्ही जे काही करता ते तो पाहतो आणि तुमच्या पूर्ण मनाने केलेल्या सेवेबद्दल त्याला आनंद वाटतो. (स्तो. १३९:१-४) तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहिल्यास तो तुम्हाला फलदायी व अर्थपूर्ण सेवा करण्याची शक्‍ती देऊ शकतो.—२ करिंथ. १२:७-१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा