वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०२ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह
  • डिसेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह
  • जानेवारी ६ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००२
km १२/०२ पृ. २

सेवा सभा आराखडा

डिसेंबर ९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. १८ (१६२)

१२ मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील पहिले) आणि डिसेंबर १५ चे टेहळणी बुरूज कसे सादर करायचे त्याची दोन प्रात्यक्षिके दाखवा.

१५ मि: “राज्य संदेशाची घोषणा करा.”a परिच्छेद ३ ची चर्चा करताना, सुवार्ता सांगताना थेट बायबलमधून वचन कसे वाचून दाखवायचे त्यावर श्रोत्यांना आपले मत विचारा.—km १२/०१ पृ. १, परि. ३.

१८ मि: प्रत्येक भल्या कार्यात फलदायी व्हा. भाषण आणि श्रोत्यांबरोबर चर्चा. वडिलांनी हा भाग हाताळावा. स्थानीय मंडळीची सुरवात होऊन तिची प्रगती कशी होत गेली याची उजळणी करा आणि ही मंडळी स्थापन करण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नांबद्दलही सांगा. त्या वेळी उपस्थित असलेल्या काहींना उत्तेजनात्मक अनुभव सांगण्यास आधीच सांगा. वाढ होण्याच्या शक्यतेची चर्चा करा आणि मंडळीच्या सर्व कार्यांना आवेशाने सहकार्य देण्यास सर्वांना उत्तेजन द्या.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल. डिसेंबर २५ आणि जानेवारी १ या दिवशी खास क्षेत्र सेवेच्या योजनांविषयी सांगा.

१५ मि: सूक्ष्मदृष्टी असलेल्यांना समजेल. (दानी. १२:३, १०) प्रात्यक्षिक. आस्थेवाईक व्यक्‍ती विचारते: “बायबलच्या शिकवणीबद्दल तुम्हाला बरोबर समज आहे, यावर मी कसा विश्‍वास ठेवू?” प्रचारक, बायबलवर संशोधन करताना विषयवार अभ्यासाच्या पद्धतीविषयी समजावून सांगतो. (w-MR९६ ५/१५ पृ. १९-२०) युक्‍तीवाद (इंग्रजी) पुस्तकातील ११२-१७ पृष्ठांवरील एक किंवा दोन उदाहरणांचा उपयोग करून प्रचारक दाखवतो, की शास्त्रवचनांचे बारकाईने परीक्षण केल्याने आपल्याला पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे हे समजले आहे. बायबलच्या इतर शिकवणी अचूकपणे समजण्यासाठी याच पद्धतीचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे प्रचारक सांगतो आणि आस्थेवाईक व्यक्‍तीला बायबल अभ्यास करण्याविषयी सांगतो.

२० मि: “विश्‍वासू वयोवृद्धांची आठवण ठेवा.”b ऑगस्ट १, १९९४, टेहळणी बुरूज, पृष्ठ २९ वरील मुद्यांवर विवेचन मांडा. आजारी असलेले बांधव १५-१५ मिनिटांचा अहवाल घालू शकतात या व्यवस्थेबद्दल त्यांना सांगा. अशा बंधू-बहिणींसोबतच्या सहवासामुळे परस्परांना मिळालेल्या आशीर्वादांविषयी एक-दोन अनुभव सांगण्याची व्यवस्था करा.

गीत क्र. १ (१३) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २३ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ६ (४५)

१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सुचनांचा उपयोग करून ऑक्टोबर-डिसेंबरचे सावध राहा! (मासिक सादरता रकान्यातील तिसरे) आणि जानेवारी १ चा, टेहळणी बुरूज अंक कसा सादर करावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. जानेवारी ६ ने सुरू होणाऱ्‍या सेवा सभेच्या आठवड्यात होणाऱ्‍या चर्चेच्या तयारीकरता रक्‍ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते हा व्हिडिओ पाहण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि: स्थानीय गरजा.

२० मि: “अचूक अहवाल देण्यात तुम्ही तुमचा भाग पूर्ण करता का?”c परिच्छेद २ ची चर्चा करताना आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे १०६-८ वरील मुद्द्‌यांचा समावेश करा.

गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर ३० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २६ (२१२)

८ मि: स्थानीय घोषणा. सर्व प्रचारकांना डिसेंबर महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. नवीन वर्षात तुमच्या मंडळीच्या सभांच्या वेळात बदल होणार असल्यास सर्वांना नवीन वेळेप्रमाणे नियमित उपस्थित राहण्याचे प्रोत्साहन द्या. जानेवारी महिन्यात कोणते साहित्य सादर केले जाणार त्याविषयी सांगा आणि मंडळीच्या साठ्यात कोणती पुस्तके आहेत त्याकडे खास लक्ष वेधा.

१२ मि: इतका अविश्‍वास का? श्रोत्यांसोबत चर्चा. विश्‍वास नसणाऱ्‍या अनेक लोकांबरोबर आपला संपर्क येतो. (२ थेस्सलनी. ३:२) त्यांना यहोवाविषयी शिकवण्याआधी देवाविषयी त्यांची अशी धारणा का बनली आहे हे आपण आधी ठरवले पाहिजे. युक्‍तीवाद (इंग्रजी) पुस्तकाच्या १२९-३० पृष्ठांवरील चार मुद्द्‌यांचा विचार करा ज्यांमुळे लोक विश्‍वास ठेवत नाहीत. प्रत्येक बाबतीत कोणती प्रस्तावना वापरली जाऊ शकते याविषयी श्रोत्यांना विचारा. प्रभावकारी प्रस्तावनेचा एखादा अनुभव सांगा, किंवा ऑगस्ट २२, १९९३, सावध राहा! (इंग्रजी), मधील पृष्ठे १४-१५ वर दिलेला अनुभव सांगा.

२५ मि: “स्थानिक प्रथा आणि खरी उपासना.”d हा भाग योग्यताप्राप्त वडिलांनी हाताळावा. दोन संक्षिप्त प्रात्यक्षिके दाखवा. एका प्रात्यक्षिकात, एक बहीण सत्य न मानणाऱ्‍या आपल्या पतीला बाळाचे बारसे किंवा अन्‍नप्राशन या विधींविषयी चांगली संधी शोधून कुशलतापूर्वक सांगते असे दाखवा. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात, एक सेवा सेवक सत्य न मानणाऱ्‍या आपल्या आईवडिलांना तो अंत्यसंस्कार किंवा श्राद्ध घालण्याशी संबंधित असणाऱ्‍या विधींमध्ये भाग का घेऊ शकत नाही, हे सांगत असल्याचे दाखवा.

गीत क्र. ५ (४६) आणि समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ६ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ९ (३७)

१३ मि: स्थानीय घोषणा. सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक कसे सादर करायचे त्याचे, चांगले तयारी केलेले एक प्रात्यक्षिक दाखवा. स्वतःची ओळख करून दिल्यावर प्रचारक म्हणू शकतो, “येशू ख्रिस्ताचा उल्लेख करताच, पुष्कळ लोकांच्या डोळ्यांसमोर तो बाळ असल्याचे किंवा मरणाला टेकलेल्या मनुष्याचे चित्र उभे राहते. त्यांना येशूच्या फक्‍त जन्म आणि मृत्यूबद्दलची माहिती असते. पृथ्वीवर असताना त्याने दिलेल्या अद्‌भुत उपदेशाकडे किंवा कार्यांकडे कोणाचेही लक्ष जात नाही. परंतु येशूने जे काही केले त्याचा परिणाम या पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्‍तिवर पडतो. म्हणूनच, आपल्यासाठी त्याने केलेल्या अद्‌भुत गोष्टींविषयी आपण होता होईल तितके शिकून घेणे महत्त्वाचे आहे.” योहान १७:३ वाचा. सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाची प्रस्तावना उघडून चौथा परिच्छेद वाचा. घरमालकाने खरोखरच आस्था दाखवली असेल तर प्रचारक म्हणू शकतो: “तुम्ही हे प्रकाशन घेऊन वाचावे आणि तुम्हाला ते नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते ठेवू शकता.” घरोघरी व अनौपचारीक साक्षकार्य करताना लोक आस्था दाखवतात तेव्हा त्यांना सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि: रक्‍तासंबंधी असलेल्या देवाच्या नियमाचे पालन करण्यासाठी साहाय्य. शाखा दफ्तराकडून मिळालेल्या रूपरेषेच्या आधारे कार्यक्षम वडिलांचे भाषण. सचिवांकडे आगाऊ वैद्यकीय सूचना/जबाबदारीतून मुक्‍तता कार्ड, ओळख पत्र यांचा पुरेसा साठा असावा. हे कार्ड बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकांना सभेनंतर देण्यात येतील परंतु ते तेव्हाच भरण्यात येऊ नये. या कार्डांवर सही करणे, साक्षीदारांच्या सह्‍या घेणे आणि तारीख टाकणे, पुढील मंडळीच्या पुस्तक अभ्यासात केले जाऊ शकते आणि आवश्‍यक असल्यास, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांची मदत घेता येऊ शकते. [मुलांसाठी असलेले ओळख पत्र त्यांच्या पालकांना देण्यात यावे.] साक्षीदार म्हणून सह्‍या करणाऱ्‍यांनी प्रत्यक्षात त्या व्यक्‍तीला कार्डावर सही करताना पाहिले पाहिजे. बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक आपापल्या परिस्थितींनुसार आणि विश्‍वासानुसार या कार्डांमधील भाषेत फेरबदल करून स्वतःकरता तसेच आपल्या मुलांकरता स्वतःहून ओळख पत्र बनवू शकतात.

१७ मि: “रक्‍ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते आवर्जून पाहण्याजोगा व्हिडिओ.” हा भाग कार्यक्षम वडिलांनी हाताळावा. पृष्ठ ७ वरील कोष्टकात देण्यात आलेले प्रश्‍न विचारून रक्‍ताविना या व्हिडिओची श्रोत्यांबरोबर थेट चर्चा सुरू करा. शेवटी, कोष्टकातील शेवटचा परिच्छेद वाचा.

गीत क्र. २ (१५) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा